PM Modi: पंडित नेहरूंना मागे टाकण्यात मोदींच्या यशाचे रहस्य हेच की… माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी आकेडवारीच मांडली

PM Modi-Pandit Nehru: भारतात सर्वाधिक काळ पंतप्रधान पदी राहण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इतिहास घडवला. या निमित्ताने माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी मोदी यांच्या कामगिरीचे एक विस्तृत आणि रंजक विश्लेषण केले आहे.

PM Modi: पंडित नेहरूंना मागे टाकण्यात मोदींच्या यशाचे रहस्य हेच की... माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी आकेडवारीच मांडली
पंडित नेहरू, पंतप्रधा नरेंद्र मोदी, माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा
Image Credit source: एजन्सी
| Updated on: Jun 09, 2026 | 1:53 PM

PM Modi-Pandit Nehru: देशात सर्वाधिक काळ पंतप्रधान पदी राहण्याचा बहुमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिळवला आणि इतिहास घडला. लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या पंतप्रधानांमध्ये सर्वाधिक वेळा काम करण्याचा विक्रम त्यांनी केला. त्यांनी देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा विक्रम मागे टाकला. या निमित्ताने माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी मोदींच्या कामगिरीचे एक विस्तृत विश्लेषण केले आहे. त्यांनी दोघांच्या कामगिरीवर प्रकाशजोत टाकला आहे.

मोदी यांच्या यशाचे रहस्य काय?

सातत्यपूर्ण विचारसरणी, अथक कार्यशैली आणि राष्ट्रीय हितासाठी अढळ बांधिलकी या मोदी यांच्या जमेच्या बाजू असल्याचे देवगौडा म्हणाले. त्यांनी पंडित नेहरू आणि मोदी यांच्या युगातील राजकीय परिस्थितीचे तुलनात्मक विश्लेषण केले. त्यांनी दोन्ही काळातील फरक, अंतर आणि तफावत समोर आणली. देश स्वतंत्र झाला. तेव्हा 1947 मध्ये महात्मा गांधी यांच्या नैतिक पाठिंब्यामुळे आणि त्याकाळी कोणीही राजकीय स्पर्धक नसलेल्या वातावरणात पंडित नेहरू देशाचे पंतप्रधान झाले. देशातील पहिली सार्वत्रिक निवडणूक 1952 साली झाली. त्या निवडणुकीत 53 राजकीय पक्ष सहभागी झाले होते. मतदारांची संख्या 17 कोटी होती. तर 2024 मधील लोकसभा निवडणुकीवेळी राजकीय पक्षांची संख्या 2,593 इतकी होती आणि मतदारांची संख्या 146 कोटींच्या घरात पोहचली होती.

ही मोठी असामान्य कामगिरी

जेव्हा मी 1996 मध्ये पंतप्रधान झालो. तेव्हा राजकीय परिस्थिती पूर्णपणे बदलली होती. नेहरू आणि गांधी कुटुंबाबाहेरील पंतप्रधानांना कोणतेही राजकीय संरक्षण आणि विशेष सामाजिक पाठिंबा नव्हता. अशा वातावरणात अखंडपणे देशाचे नेतृत्व करत मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान होणे ही एक आसामान्य कामगिरी असल्याचे देवेगौडा यांनी स्पष्ट केले.

नेहरू मंत्रिमंडळ विरुद्ध मोदी मंत्रिमंडळ

नेहरूंच्या मंत्रिमंडळात उच्चवर्णीयांना प्राधान्य होते. या मंत्रिमंडळाने मागासवर्गीयांना आरक्षण देण्याची शिफारस करणाऱ्या काकासाहेब कालेलकर आयोगाच्या अहवालाला केराची टोपली दाखवली होती. त्यामानाने पंतप्रधान मोदींचे मंत्रिमंडळ हे अधिक व्यापक आणि सर्व समाज घटकांना प्रतिनिधीत्व देणारे असल्याचा देवेगौडा यांचा दावा आहे. सध्याचे मोदी मंत्रिमंडळ भारताच्या सामाजिक विविधतेचे जणू प्रतिबिंब आहे. सध्याच्या केंद्रीय मंत्रिमंडळात 27 ओबीसी, 10 अनुसूचित जाती (SC) आणि 5 अनुसूचित जमाती (ST) घटकातील प्रतिनिधी आहेत. तर आता महिला आरक्षण विधेयकासाठी मोदी सरकार प्रयत्न करत असल्याचे, लोकसभेत महिलांचा टक्का वाढवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे कौतुकही देवेगौडा यांनी केले आहे.

सोशल मीडियाचा सरकारवर वॉच

नेहरु यांच्या काळात मोजकीच वृत्तपत्रे होती. दूरदर्शन माध्यम नव्हते. अथवा विविध वृत्तवाहिन्या, सोशल मीडिया नव्हता. सार्वजनिक अथवा व्यापक टीकेला सरकारला सामोरे जावे लागले नव्हते. पण आता 24 तास चालणाऱ्या वृत्तवाहिन्या आणि सोशल मीडिया आहे. त्यातून पंतप्रधान मोदींना प्रत्येक क्षणी वैयक्तिक आणि कठोर टीकेला सामोरे जावे लागत आहे. तरीही मोदी या सर्वांचा सामना करत देशाचे कणखरपणे नेतृत्व करत असल्याचे देवेगौडा यांनी नमूद केले.


मोदींच्या यशाचे ते रहस्य काय?

जागतिक आणि देशातंर्गत आव्हानांचा हा काळ आहे. मोदींनी अशा काळात ठाम निर्णय घेतले आहेत. भारतीय अर्थव्यवस्थेला जगातील सर्वात वेगवान अर्थव्यवस्था करण्यात त्यांचे नेतृत्वक्षमतेचे द्योतक आहे, असे देवेगौडा म्हणाले. तर आपण मोदींचा मन की बात हा कार्यक्रम कधीच चुकवत नाही. जनतेची टीका स्वीकारून सतत आत्मपरीक्षण करणे आणि पुढे जाणे हेच मोदींच्या यशाचे मोठे रहस्य असल्याचा दावा देवेगौडा यांनी केला आहे.

Follow Us