Bulldozer in Shaheen Bagh: हायकोर्टात जा, पीडीतांच्याऐवजी नेते का? शाहिनबाग सुनावणीवर सुप्रीम कोर्टाचे सीपीएमला सवाल

न्यायालय म्हणाले की, आम्ही जहांगीरपुरीमध्ये हस्तक्षेप केला कारण इमारती पाडल्या जात होत्या. फेरीवाले रस्त्यावर माल विकतात. दुकानांचे नुकसान होत असेल तर त्यांनी न्यायालयात यावे. रस्त्यावरील फेरीवाले का आले?

Bulldozer in Shaheen Bagh: हायकोर्टात जा, पीडीतांच्याऐवजी नेते का? शाहिनबाग सुनावणीवर सुप्रीम कोर्टाचे सीपीएमला सवाल
शाहिनबागImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 09, 2022 | 3:19 PM

Bulldozer in Shaheen Bagh : देशाचे राजकारण हे हनुमान चालिसा (Hanuman Chalisa), बुल्डोजर मॉडेल आणि भोंग्यांच्यावर फिरत असताना आता परत शाहीन बागेत बुल्डोजर आल्याने एकच खळबळ उडाली. त्यानंतर दिल्ली महानगरपालिकेला (एमसीडी) अतिक्रमणावरील कारवाई करताना स्थानिक नागरिकांच्या रोषाचा सामना करावा लागला. तर अतिक्रमण पाडण्यासाठी बुलडोझर (Bulldozer) येताच त्याच्या समोर बसून निषेध केला. अतिक्रमण काढण्याच्या नावाखाली महापालिकेकडून मुस्लिम बहुल भागांना टार्गेट केले जात असल्याचा आरोप स्थानिक तसेच विरोधकांनी केला आहे. दरम्यान दक्षिण दिल्लीतील अतिक्रमण हटवण्याच्या मोहिमेविरोधात सीपीआयएम पक्षाची याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुनावणी सुरू होती. त्यावेळी ती याचिका न्यायालयाने फेटाळून लावली. तसेच सर्वोच्च कोर्टाने सीपीआयएम पक्षाला फटकारले. तसेच या प्रकरणी पीडितांऐवजी राजकीय पक्ष कोर्टात का धाव घेत आहेत, असा सवालही केला. भारतीय कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्सिस्ट (CPIM) ने दक्षिण दिल्लीतील बेकायदेशीर बांधकामाविरोधात MCD ची कारवाई थांबवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

कोणी पीडित नाही का?

दक्षिण एमसीडीमधील अतिक्रमण प्रकरणी आज दुपारी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. सीपीआयएम पक्ष याप्रकरणी याचिका का दाखल करत आहे, असा सवाल न्यायालयाने केला. न्यायालयाने म्हटले की, जर कोणी पीडित पक्ष आमच्याकडे आला तर ते समजण्यासारखे आहे. कोणाला त्रास होतो का? यावर वरिष्ठ अधिवक्ता पी सुरेंद्रनाथ म्हणाले की, रस्त्यावरील विक्रेत्यांच्या संघटनेचीही याचिका आहे. पुढे न्यायमूर्ती राव म्हणाले की, तुम्ही उच्च न्यायालयात जायला हवे होते. त्याचबरोबर रस्त्यावरील फेरीवालेही नियम मोडत असतील तर त्यांनाही हटवण्यात येईल, असेही सांगण्यात आले.

न्यायालय म्हणाले की, आम्ही जहांगीरपुरीमध्ये हस्तक्षेप केला कारण इमारती पाडल्या जात होत्या. फेरीवाले रस्त्यावर माल विकतात. दुकानांचे नुकसान होत असेल तर त्यांनी न्यायालयात यावे. रस्त्यावरील फेरीवाले का आले? न्यायालयाने याचिकाकर्त्याला विचारले की दक्षिण दिल्लीत काय तोडले आहे? त्यावर अधिवक्ता सुरेंद्रनाथ म्हणाले की, दुकाने हटवली जात आहेत.

हे सुद्धा वाचा

शाहीन बागेत बुलडोझर बेरंग परतला

दक्षिण एमसीडीच्या योजनेनुसार आज शाहीन बागेतील अतिक्रमण हटवायचे होते. सकाळी 11 वाजता बुलडोझर तेथे पोहोचला, मात्र त्याला तसेच परतावे लागले. शाहीन बागेत एमसीडीच्या कारवाईचा मोठा निषेध करण्यात आला. तिथे एमसीडीने फक्त घरासमोर उभ्या असलेल्या लोखंडी सळ्या काढून टाकल्या ज्याचा वापर सेंटरींगच्या कामासाठी केला जात होता. मात्र यावर स्थानिकांनी सांगितले की, नूतनीकरणानंतर ते कसेही काढले जाणारच होते.

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.