AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चोर चोरी करून पळत होता, हवेत गोळीबार, पुढे जे घडलं त्याने…

ज्या घरात चोर चोरी करण्यासाठी घुसले होते ते घर माजी सरपंच बलेंद्र सिंह यांचे होते. चोर पळताना दिसताच बलेंद्र यांनी आपली रायफल रोखली. हवेत गोळीबार केला. त्याने गावकरी जागे झाले, त्यांनीही चोराचा पाठलाग केला.

चोर चोरी करून पळत होता, हवेत गोळीबार, पुढे जे घडलं त्याने...
KANPUR THIEF CASE
| Updated on: Dec 07, 2023 | 8:13 PM
Share

कानपूर | 7 डिसेंबर 2023 : एका चोरट्याने गावच्या माजी सरपंचाचे घरात चोरी करण्याचा प्रयत्न केला. त्याचा तो प्रयत्न यशस्वी झाला. लाखो रुपयांचे दागिने, काही रोख रोकड त्याने बॅगेत भरली. पण, त्याचे नशीब इथे आडवे आले. चोरी करून घराबाहेर पडताना त्याला सरपंचाने पाहिले. त्यांनी चोराला थांबण्याचा इशारा दिला. सरपंच यांनी आरडाओरड केली. तोपर्यंत चोर शेताच्या बांधाजवळ पोहोचला होता. पण इथेच त्या चोराची फसगत झाली. कानपुर जिल्ह्यातील बिथूर गावात ही घटना घडली.

रात्री एक चोर गावात घुसला. गावचे माजी सरपंच बलेंद्र सिंह यांच्या घरात तो घुसला. त्या चोरट्याने त्यांच्या घरात मोठा डल्ला मारला. पण, याचवेळी गच्चीत झोपलेल्या बलेंद्र सिंह यांना जाग आली. त्यांनी आपल्या जवळची रायफल त्या चोरट्यावर रोखून धरली. त्याला थांबण्याचा इशारा दिला. मात्र, तो चोर घाबरून पळू लागला. तेव्हा बलेंद्र सिंह यांनी आपल्या रायफलमधून हवेत गोळीबार केला.

गोळीबाराच्या आवाजाने गाव जागे झाले. सरपंच बलेंद्र सिंह यांनी मोठ्याने ओरडायला सुरवात केली. गावकऱ्यांनी चोराचा पाठलाग केला. तो शेताजवळ आला आणि शेताभोवती लावण्यात आलेल्या काटेरी तारांमध्ये अडकला. आपल्या हातातला चोरीचा माल तिथेच टाकला. काटेरी तारांच्या कुंपणातून आपली सुटका करून घेत त्याने तेथून धूम ठोकली.

लोक घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांना बॅगमध्ये चोरीचा सर्व माल आढळून आला. लाखोंचे दागिने, एक नेकलेस, मंगळसूत्र, टॉप्स, पायल, सोन्याची चेन आदी वस्तू त्यात होत्या. यानंतर गावकऱ्यांनी बिथूर पोलिसांना झालेली घटनेची माहिती दिली. पोलीस स्टेशनचे प्रभारी अनुपकुमार सिंह यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. गावकऱ्यांनी ज्या वस्तू जप्त केल्या त्या पोलिसांनी आपल्या ताब्यात घेत पंचनामा केला. यानंतर पोलिसांनी आजूबाजूच्या परिसरात छापा टाकला. मात्र, चोर सापडला नाही.

गावातील भटक्या प्राण्यांपासून आपल्या पिकांचे रक्षण करण्यासाठी शेतकरी आपल्या शेताभोवती काटेरी कुंपण बांधतात. पण, या काटेरी तारांच्या जाळ्यात चोरसुद्धा अडकू शकतात, असा विचार शेतकऱ्याने कधी केला नसेल. पण, असाच काहीसा प्रकार बिथूरमध्ये घडल्याने या चोरीची चर्चा कानपूरमध्ये होतेय.

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.