जिच्या रेप-मर्डर केसमध्ये तिघांना झाला तुरुंगवास, ती पीडिता 18 महीन्यानंतर जीवंत परत आली, धक्कादायक मर्डर मिस्ट्री
जिचा बलात्कारातून खून झाला, त्या तरुणीच्या मृत्यू प्रकरणात तिघांना अटक झाली आहे. मात्र आता १८ महिन्यांनी ही तरुणी चालत घरी आल्याने तिचे नातेवाईक आणि आजूबाजूचे लोक हादरले आहे.

एका युवतीचे 2023 मध्ये अपहरण झाले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याचा मृतदेह सापडल्याची बातमी आली. नातलगांनी मृतदेहाची ओळख पटवली आणि बलात्कारातून हत्येचा गुन्हा दाखल झाला. तपास पूर्ण होऊन तरुणांची कोठडीत रवानगी झाली. आणि खटला सुरु आहे. आता 18 महिन्यानंतर ती तरुणी जींवत परत आल्याने आता खळबळ उडाली आहे. या प्रकरणात कोठडीत असलेल्या तिघा आरोपींचे आता काय करायचं असा सवाल पोलिसांसमोर निर्माण झाला आहे. तसेच ज्या तरुणीवर अंत्यसंस्कार झाले ती तरुणी कोण होती.? याचे कोडे पोलिसांना पडले आहे.
मध्य प्रदेशच्या झाबुआत हा हादरवून टाकणारा प्रकार घडला आहे. एका युवतीचे साल २०२३ मध्ये अपहरण झाले होते. दुसऱ्या दिवशी तिची बॉडी सापडली होती. कुटुंबियांनी मृतदेहाची ओळख पटवून ती ताब्यात घेतली आणि अंत्यसंस्कार केले. त्यानंतर या प्रकरणात तिघांना अटक झाली. त्यांना तुरुंगवास झाला. परंतू ही तरुणी १८ महिन्यांनी पुन्हा घरी आली तेव्हा तिच्या घरातील लोकांना धक्का बसला. पोलिसांना देखील ही बातमी कळल्यानंतर धक्का बसला आहे.
पोलिसांना प्रश्न पडला आहे की एवढे दिवस ही तरुणी होती तर कुठे ? दुसरा प्रश्न असा निर्माण झाला की मग जिचा मृत्यू होऊन तिच्या पालकांनी अत्यंसंस्कार केले ती कोण होती ? तिचे मृतदेह नातेवाईकांना स्वीकारला कसा ? हे तीन प्रश्न आवासून उभे असल्याने पोलिसांनी ही फाईल पुन्हा ओपन केली आहे. ही माहीती कळल्यानंतर मध्य प्रदेशातील इंदूर बेंचने या प्रकरणात अटक केलेल्या तिघा आरोपींपैकी एकाला जामीन मंजूर केला आहे.
पोलीस स्थानकात ही तरुणी स्वत: ओळख पटविण्यासाठी आधारकार्ड आणि मतदान ओळखपत्र घेऊन पोहचली. तिने सांगितले की तिचे एका तरुणासोबत प्रेम होते. त्यामुळे घरच्यांना न सांगता ती ऑगस्ट २०२३ मध्ये प्रियकरासोबत पळून गेली. तिच्या प्रियकराने एक वर्ष तिला कोटा येथून डांबून ठेवले आणि तिच्यावर बलात्कार केला. तिला तिच्या घरच्यांशी बोलू दिले जात नव्हते. त्यानंतर तिला ५ लाख रुपयांत विकण्यात आले. आपण मोठ्या मुश्कीलीने दलालाच्या तावडीतून पळून आल्याचे तिने पोलिसांना सांगितले.
घरी आल्यावर आपल्याला कळाले की माझे अंत्यसंस्कारही झाले आहेत. १८ महिन्यांपूर्वी जिचे शव सापडले तिच्याकडे माझे कपडे कसे पोहचले हे देखील तिला मला माहिती नाही. आपण मेलेलो नसून जीवंत आहोत आणि स्वत: पीडित आहोत असे या तरुणीने म्हटले आहे.
निर्णायक टप्प्यावर खटला
दुसरीकडे बलात्कार आणि खून झालेल्या या युवतीच्यावरी खटला आता निर्णयात टप्प्यावर आहे. केवळ एक साक्षीदार तपासायचा आहे.आता पोलिसांकडून आलेला ताजा अहवाल पाहिल्यानंतरच या खटल्याचा एका आरोपीला मध्य प्रदेश हायकोर्टाच्या इंदूर बेंचने एका आरोपीला जामीन दिला आहे.तपासाचे आदेश पोलिसांना दिले आहेत.
