AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Parliament Attack |लोकसभेच्या सुरक्षेबाबत झाली चूक! तरुणांनी घातला धुडगूस, लोकसभा अध्यक्ष म्हणाले की…

Parliament Smoke Attack | संसदेवर 22 वर्षांपूर्वी हल्ला झाला होता. त्याच दिवशी 13 डिसेंबर रोजी तीन तरुणांनी संसदेत गदारोळ माजवला. यातील दोघांनी तर प्रेक्षक गॅलरीतून उड्या मारत स्मोक गॅसचा वापर केला. त्यामुळे सभागृहात पिवळा धूर पसरला. त्यामुळे नाकाला झिणझिण्या आल्याचे खासदारांनी माध्यमांना सांगितले.

Parliament Attack |लोकसभेच्या सुरक्षेबाबत झाली चूक! तरुणांनी घातला धुडगूस, लोकसभा अध्यक्ष म्हणाले की...
| Updated on: Dec 13, 2023 | 2:54 PM
Share

संदिप राजगोळकर, प्रतिनिधी, टीव्ही 9 मराठी, नवी दिल्ली : आज नवीन संसदेत तरुणांनी धुडगूस घातला. तानाशाही नही चलेगी अशा घोषणा यातील दोन तरुणांनी दिल्या. संसदेच्या प्रेक्षक गॅलरीतून दोघांनी उड्या मारल्या. त्यांनी लोकसभा सभागृहात लक्ष वेधण्यासाठी स्मोक कॅडलचा वापर केला. त्यामुळे सभागृहात पिवळा धूर पसरला. त्यामुळे नाकाला झिणझिण्या आल्याचे खासदारांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. कामकाज सुरु असतानाच या तरुणांनी संसदेच्या आत आणि बाहेर गोंधळ घातला. ही सुरक्षा व्यवस्थेतील घोडचूक असल्याचे समोर येत आहे. आता प्रकरणी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मत मांडले.

ही चूक झाली

लोकसभेच्या या गोंधळानंतर काही काळासाठी सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले. या चार तरुणांपैकी एक तरुणी आहे. प्राथमिक अहवालानुसार हा फक्त धूर होता पण चिंता करण्याचं कारण नाही. लोकसभेच्या सुरक्षेबाबत जी काही चूक झाली त्याबाबत पूर्णपणे चौकशी केली जाईल. यासंदर्भात दिल्ली पोलिसांनाही योग्य ते निर्देश देण्यात आले आहे. याप्रकरणात सखोल चौकशी करण्यात येईल असे आश्वासन लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दिले.

लातूरमधील तरुण ताब्यात

या प्रकरणात लातूरमधील अमोल शिंदे याला ताब्यात घेण्यात आलं आहे. संसदेच्या बाहेर निदर्शनं करणारी नीलम नावाची महिला पोलिसांच्या ताब्यात आहे. हरयाणातील महिला पोलिसांच्या ताब्यात आहे. ज्या लोकांनी गोंधळ घातला. ते मैसूरचे प्रतापराव सिंह खासदाराच्या पासवर हे लोक संसदेत आले होते. तर मध्यप्रदेशमधील खासदारांच्या मदतीने हे पास बनवण्यात आले होते. या प्रकरणाची आता आयबी टीमकडून चौकशी होत आहे. काही वेळासाठी संसदेचं कामकाज स्थगित केलं गेलं .

Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना