हे काळे दाणे आहेत सापाचा सर्वात मोठे शत्रू; घरात ठेवा, साप परिसरात सुद्धा फिरकणार नाही
साप म्हटलं की आपल्या अंगावर भीतीनं काटा उभा राहातो. मात्र सापाला घाबरण्याचं कारण नाही, असे काही उपाय आहेत, ज्याद्वारे तुम्ही सापला तुमच्या घरापासून दूर ठेवू शकतात.

साप म्हटलं की आपल्या अंगावर भीतीनं काटा उभा राहातो. याला कारण म्हणजे आपले सापांबाबत असलेले अनेक गैरसमज कारणीभूत आहेत. दिसणारा प्रत्येक साप हा विषारीच असतो हा सापांबाबतचा आपल्या मनातील सर्वात मोठा गैरसमज आहे. मात्र खरी परिस्थिती अशी आहे की भारतामध्ये सापाच्या हजारो प्रजाती आहेत, त्यातील केवळ हाताच्या बोटावर मोजण्या इतक्याच प्रजाती या विषारी आहेत. भारतामध्ये नाग ज्याला आपण कोब्रा असं देखील म्हणतो, फुरसे, मण्यार आणि घोणस या चारच प्रमुख विषारी जाती आहे, या जातींना बीग फोर असं देखील म्हटलं जातं. तर इतर अनेक बिनविषारी जाती आढळून येतात. त्यामुळे साप दिसला तर घाबरून जाऊ नका.
साप दिसला तर घाबरू नका, मात्र त्याला पकडण्याचा किंवा मारण्याचा प्रयत्न करू नका, असं करण तुमच्या जीवावर देखील बेतू शकतं. त्यामुळे तुम्हाला जर तुमच्या घरात किंवा परिसरात साप दिसला तर त्याची माहिती सर्पमित्रांना द्या, ते तो साप पकडू त्याला सुरक्षितस्थळी सोडतील, त्याचाही जीव वाचेल आणि तुम्हीही सुरक्षीत राहाल.
आज आपण काळ्या तिळाच्या उपयांबाबत जाणून घेणार आहोत. उत्तराखंडच्या पर्वतीय भागात जिथे सापाच्या अनेक प्रजाती मोठ्या संख्येनं आढळून येतात, तेथील लोक हा उपाय करतात. हा उपाय सापांना घरापासून दूर ठेवण्यासाठी फारच उपयोगी असल्याचा दावा या लोकांकडून करण्यात येतो. हे लोक काळे तीळ जाळतात त्यातून निघणारा धूर आणि वास यामुळे साप या परिसरात फिरकत नाही असा दावा या लोकांकडून करण्यात येतो.
तीळ ही एक उत्तम प्रकारचं तेल बियाणं आहे, काळे तीळ जाळल्यास साप घराच्या आसपास फिरकत नाही. आम्ही काळे तीळ एका विशिष्ट भाड्यांमध्ये घेऊ जाळतो. त्याचा धूर आम्ही आमच्या घरात आणि जनावरांच्या गोठ्यात सर्वत्र फिरवतो . त्यामुळे जर त्या ठिकाणी कुठे साप जरी लपून बसला असेल तर तो घरातून निघून जातो. कधी-कधी तर आम्ही गोवरी जाळून तिच्यावर देखील हे तीळ टाकतो अशी माहिती तेथील स्थानीक लोकांनी दिली आहे.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
