AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुम्ही खोटं बोलता तेव्हा शरीराचा हा अवयव गरम होतो; 99 टक्के लोकांना माहीत नसेल

अनेकजण असा दावा करतात की मी माझ्या आयुष्यात कधीच खोटं बोललो नाही, परंतु सर्वच जण कधीनं कधी तरी खोटं बोललेलेच असतात. पण तुम्हाला माहित आहे का, की तुम्ही जेव्हा खोटं बोलता तेव्हा तुमच्या शरीरातील एक अवयव गरम होतो.

तुम्ही खोटं बोलता तेव्हा शरीराचा हा अवयव गरम होतो;  99 टक्के लोकांना माहीत नसेल
Lying PersonImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Apr 02, 2026 | 5:11 PM
Share

अनेकजण असा दावा करतात की मी माझ्या आयुष्यात कधीच खोट बोलत नाही, परंतु प्रत्येक जण हा आपल्या आयुष्यात कधी न कधी खोटं बोलतोच. एखादा व्यक्ती खोटं का बोलतो? तर त्यामागे वेगवेगळी कारणं असू शकतात. एखादा व्यक्ती एखाद्या विशिष्ट परिस्थितीमुळे खोटं बोलू शकतो, तर काही जण एखाद्याची फसवणूक करायची म्हणून देखील खोटं बोलतात. काही -काही लोक तर एवढ्या सफाईने खोटं बोलतात की ते खोटं बोलत आहेत, हे समोरच्या व्यक्तीच्या लक्षात देखील येत नाही. एखादा व्यक्ती खोटं बोलत आहे, हे कसं ओळखायचं याच्या विविध युक्त्या आहेत. मात्र तुम्हाला हे माहीत आहे का? जर एखादा व्यक्ती खोटं बोलत असेल तर त्याच्या शरीराचे काही अवयव गरम होतात.

जेव्हा एखादा व्यक्ती खोटं बोलतो किंवा तसा प्रयत्न करतो तेव्हा त्याचं डोक अधिक सक्रिय होतं. जेव्हा तो असा विचार करतो की आता मी समोरच्या व्यक्तीसोबत खोटं बोलणार आहे, किंवा जेव्हा तो प्रत्यक्ष खोटं बोलण्याची कृती करत असतो, तेव्हा तो आपल्या मेंदूवर जास्त जोर देतो, त्यामुळे त्याच्या शरीरातील ब्लड सर्कुलेशन वाढतं आणि त्यामुळे त्याच्या शरीरातील काही अवयव हे तात्पुरत्या स्वरुपात गरम होतात. जेव्हा कोणी खोटं बोलत असेल तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव बदललेले असतात, त्यावरून देखील तुम्ही समोरचा व्यक्ती खोटं बोलत आहे की खरं हे ओळखू शकता.

एखादा व्यक्ती खरं बोलतोय की खोटं कसं ओळखायचं?

जेव्हा एखादा व्यक्ती तुमच्यासोबत खोटं बोलण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याचा आत्मविश्वास हा कमी झालेला असतो. खरं बोलणारा व्यक्ती हा नेहमी तुमच्यासोबत आत्मविश्वासानेच बोलणार. त्यावरून तुम्ही ठरू शकता की समोरचा व्यक्ती हा खरं बोलतोय की खोटं बोलत आहे. तसेच जो व्यक्ती तुमच्याशी खोटं बोलतो तेव्हा असा व्यक्ती कधीही तुमच्या डोळ्यात डोळे घालून बोलणार नाही, तो नेहमी जमिनीकडे बघून तुमच्याशी संवाद साधतो. तसेच मानशास्त्र असं देखील सांगतं की जर एखादा व्यक्ती तुमच्याशी खोटं बोलत असेल तर तो आपल्या शरीराची अनावश्यक हालचाल जास्त प्रमाणात करतो. तसेच एखादा व्यक्ती जर खोटं बोलत असेल तर असा व्यक्ती त्याकाळात सरासरीपेक्षा जास्त आपल्या पापण्यांची उघड झाप करतो.

Follow Us
लेकाला डॉक्टर करण्यासाठी कांड, 10 दिवसाआधीच...मोटेगावकरने असा फोडला...
लेकाला डॉक्टर करण्यासाठी कांड, 10 दिवसाआधीच...मोटेगावकरने असा फोडला....
ठाकरेंच्या जवळचा खासदार शिंदेंच्या गळाला? थेट नंदनवन बंगल्यावर...
ठाकरेंच्या जवळचा खासदार शिंदेंच्या गळाला? थेट नंदनवन बंगल्यावर....
एकच खळबळ! शिवराज मोटेगावकरांचा काँग्रेस नेत्यांच्या प्रचार सभेत Video
एकच खळबळ! शिवराज मोटेगावकरांचा काँग्रेस नेत्यांच्या प्रचार सभेत Video.
विदर्भात शेतकऱ्याला किडनी विकावी लागते, हे दुर्दैव...
विदर्भात शेतकऱ्याला किडनी विकावी लागते, हे दुर्दैव....
आमदार अमित साटम यांच्या कन्येचा आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेतून माघार
आमदार अमित साटम यांच्या कन्येचा आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेतून माघार.
राष्ट्रवादीनंतर शिवसेनेत मोठी खळबळ, बड्या नेत्याने फिरवली पाठ?
राष्ट्रवादीनंतर शिवसेनेत मोठी खळबळ, बड्या नेत्याने फिरवली पाठ?.
कोल्हापूरकरांचा नादच खुळा; जावयाला दीड किलो चांदीची चप्पल.....
कोल्हापूरकरांचा नादच खुळा; जावयाला दीड किलो चांदीची चप्पल......
NEET पेपरफुटी प्रकरणातील शिवराज मोटेगावकरचा 2 दिवसांपूर्वीचा व्हिडीओ..
NEET पेपरफुटी प्रकरणातील शिवराज मोटेगावकरचा 2 दिवसांपूर्वीचा व्हिडीओ...
बापरे! शौचालयाच्या पाण्याने बनवली इडली? दादर स्टेशनबाहेर गंभीर प्रकार
बापरे! शौचालयाच्या पाण्याने बनवली इडली? दादर स्टेशनबाहेर गंभीर प्रकार.
मी तुला सोडतो.. सुनसान रस्त्यात कार थांबवली अन्... महिला वकिलसोबत नको
मी तुला सोडतो.. सुनसान रस्त्यात कार थांबवली अन्... महिला वकिलसोबत नको.