हे छोटसं रोपटं सापांना घरापासून दूर पळून लावतं; साप पुन्हा कधीच येणार नाहीत, प्रत्येक शेतकरी आवर्जून लावतो
साप आपल्या शिकारीच्या शोधात बिळातून बाहेर पडतात. अनेकदा असंही होतं की शिकारीच्या शोधात असताना ते आपल्या घरात देखील घुसू शकतात. जर आपल्या घरात कुठे अंधारी आणि अडचण असलेली जागा असेल तर तिथे ते लपून देखील बसू शकतात. त्यामुळे अशा पद्धतीने साप घरात येऊ नयेत, यासाठी काळजी घेणं गरजेचं असतं.

साप दिसताच आपल्याला भीती वाटते, कारण सापांबद्दल आपण अनेक गोष्टी ऐकलेल्या असतात. अनेकजण तर साप घरात दिसताच त्याला थेट मारून टाकतात. सापांबद्दल एक सर्वात मोठा गैरसमज असतो, ते म्हणजे प्रत्येक साप हा विषारीच असतो, त्यामुळे साप विनाकारण मारले जातात. परंतु सत्य हे आहे की भारतामध्ये सापांच्या जेवढ्या काही प्रजाती आढळून येतात, त्यातील अगदी हाताच्या बोटावरच मोजण्या इतक्याच प्रजाती या विषारी आहेत, त्यामुळे तुम्हाला कुठेही साप दिसला तर त्याला मारू नका, त्याची माहिती सर्पमित्रांना द्या, ते सापांना पकडून सुरक्षित जागी सोडतील. जंगली भागात मानवाने केलेल्या अतिक्रमणामुळे आता सापांची आश्रयस्थाने देखील धोक्यात आली आहेत, त्यामुळेच आता साप हे मानवी वस्त्यात शिरत असल्याचं पहायला मिळत आहे.
दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे सध्या घोणस सारख्या विषारी सापांची संख्या ही प्रचंड प्रमाणात वाढली आहे. हे साप ठिक ठिकाणी आढळून येत आहेत. शेतात, गर्डनमध्ये घरात, सोसायटीमध्ये अशा सर्वच ठिकाणी हे साप आढळून येत आहेत. त्यामुळे सापांपासून बचाव करणं गरजेचं असतं. घराच्या परिसरात स्वच्छता ठेवणं, कुठेही अडच निर्माण होऊ न देणं हेच सापांपासून बचावाचा सोपा उपाय आहे. परंतु ग्रामीण भागांमध्ये सापांपासून बचावासाठी इतरही अनेक पारंपरीक उपाय केले जातात. अशा काही वनस्पती, झाडं आहेत, जे आपल्याला सापांपासून वाचवू शकतात.
शेतकरी ही झाडं आपल्या घराच्या परिसरात आवर्जून लावतात. त्यातीलच एक झाडं आहे, ते म्हणजे बिलायताचं झाडं. हे एक छोटसं पिवळ्या फुलांचं झाडं असतं. ज्याला काटे असतात. या झाडाचं वैशिष्ट म्हणजे याचे काटे आजूबाजुच्या परिसरात पसरतात. या काट्यांमुळे मानवाला कुठलीही इजा होत नाही. परंतु सापांची त्वचा ही खूप सेंसेटिव्ह असल्यामुळे त्याचा त्रास त्याला होतो. त्यामुळे ज्या परिसरात बिलायत आहे, अशा परिसरात साप येत नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागामध्ये शेतकरी आपल्या घराशेजारी आवर्जून हे बिलायताचं झाडं लावतात.
