AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

झाड एक काम अनेक; या छोट्याशा रोपट्यामुळे साप तर घरात येतच नाहीत, पण डास अन् झुरळांपासून देखील होते कायमची सुटका

भारतामध्ये अशी काही विशिष्ट झाडं आहेत, ज्याच्या वासामुळे साप घरात प्रवेश करत नाहीत. परंतु त्यामध्ये एक झाडं असं देखील आहे, ते जर घरात लावलं तर घरात सापच नाही पण झुरळ आणि डासं सुद्धा येत नाहीत.

झाड एक काम अनेक; या छोट्याशा रोपट्यामुळे साप तर घरात येतच नाहीत, पण डास अन् झुरळांपासून देखील होते कायमची सुटका
snakeImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Apr 02, 2026 | 8:59 PM
Share

अनेकांना आपल्या घरात किंवा घराच्या परिसरात झाडं लावण्याची आवड असते. सुंदर, सुंदर फुलं देणारी झाडं, फळं देणारी झाडं अनेकजण लावतात. मात्र तुम्ही कधी विचार केला आहे का? की तुम्ही तुमच्या घरात किंवा परिसरात जी झाडं लावतात, त्या झाडांचा उपयोग केवळ शोभेची वस्तू किंवा फळ, फूल देण्यापुरताच उपयोग होत नाही. तर यातील असे काही झाडं आहेत, जे जर तुम्ही घरात लावले तर या झाडांच्या विशिष्ट वासामुळे साप घरात येत नाहीत. आज आपण अशा एका झाडाची माहिती घेणार आहोत, हे झाड सापांना तर घरात येऊच देत नाही, मात्र हे झाडं जर तुमच्या घरात असेल तर पाली, झुरळं आणि डास देखील घरात प्रवेश करत नाहीत. या झाडाचा वास देखील खूपच सुवासिक असतो.

सध्या उन्हाळा सुरू झाला आहे. उन्हाळा आणि पावसाळ्याच्या दिवसात घरात विषारी कीटक तसेच साप घरात येण्याच्या प्रमाणामध्ये वाढ होते. या काळात डासांचं प्रमाण देखील अधिक असतं. आपण डासांच्या बचावासाठी विविध उपाय करतो. मात्र हे एक झाड जर तुम्ही लावलं तर डासांचा कायम स्वरुपी बंदोबस्त होऊ शकतो. तसेच या झाडांमुळे पाल आणि झुरळापासून देखील घराची सुटका होते.

झेंडूचं झाड – झेंडूच्या झाडाला येणारं फूल हे खूप आकर्षक असतं, या फुलांमधून विशिष्ट अशा प्रकारचा सुवासिक वास येतो. घराला तोरणं लावण्यासाठी देखील झेंडूच्या फुलांचाच वापर करतात. मात्र या झाडाचा आणखी एक फायदा असा की झेंडूच्या झाडाच्या पानाला आणि फुलांना जो विशिष्ट प्रकारचा वास असतो, त्या वासाचा सापांना त्रास होतो. त्यामुळे जिथे झेंडूचं झाडं असतं तिथे साप येत नाही, तसेच या वासांचा त्रास इतरही किटकांना होतो, त्यामुळे ते देखील घरात घुसत नाहीत. झेंडूच्या झाडामुळे पाली आणि डासांपासून देखील घराच्या संरक्षण होते. झेंडू प्रमाणेच लव्हेंडरचं देखील झाड लावू शकता. याच्या वासामुळे देखील डास घरात येत नाहीत.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ