Serial Killer: फेमस होण्यासाठी केले 6 दिवसांत 4 मर्डर, सीरियल किलरचे महाराष्ट्र कनेक्शनही उघड, ऐकाल तर हादराल. आईला सांगायचा.

शिवच्या आईने सांगितले की तो आल्यापासूनच विचित्र वाटत होता. निरपराध लोकांचे प्राण तो घेत असावा असे जाणवत होते. त्याने आईला सांगितले होते की, लवकरच त्याला लोकं ओळखायला लागतील. शिव या कुटुंबातील सर्वात लहान मुलगा होता. त्याचा मोठा भाऊ पुण्यात मजुरीचे काम करतो

Serial Killer: फेमस होण्यासाठी केले 6 दिवसांत 4 मर्डर, सीरियल किलरचे महाराष्ट्र कनेक्शनही उघड, ऐकाल तर हादराल. आईला सांगायचा.
सीरियल किलरचे महाराष्ट्र कनेक्शन Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Sep 02, 2022 | 10:27 PM

भोपाळ – नाव शिव गौड उर्फ हल्कू, वय 19 वर्षे, ओळख- सीरियल किलर (Serial Killer)..

सहा दिवसांत चार हत्या, तीन मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh)सागरमध्ये एक तिथेच भोपाळमध्ये. खून करण्याची पद्धती सारखीच. झोपलेल्या सुरक्षा रक्षांवर वार करुन, एकसाऱख्या पद्धतीने हे सगळे खून करण्यात आले. आता शिवला पोलिसांनी अटक केली आहे. भोपाळमध्ये सुरक्षारक्षकाची हत्या केल्यानंतर, पोलिसांनी मोबाईल लोकेशनच्या (Mobile location)आधारावर शिवला अटक केली आहे. ज्या सुरक्षा रक्षकाचा मोबाील त्याने चोरी केला होता, त्याच मोबाईलच्या लोकेशनवर त्याला अटक करण्यात आली. या सगळ्या हत्यांमागे उद्देश होतो तो फक्त आणि फक्त प्रसिद्ध होण्याचा.

कोण होता हा सीरियल किलर?

सीरियल किलर असलेल्या शिवचे शिक्षण 8 वीपर्यंत झाले होते. लहानपाणापासून तो भांडखोर वृत्तीचा होता. गावात शाळेत असताना तो इतर मुलांना छोट्याछोट्या कारमांवरुन मारहाण करीत असे. त्याची गावात कुणाशीच मैत्री नव्हती. सहा वर्षांपूर्वी 13 वर्षे वयाचा असताना तो सागर या ठिकाणी पळून आला. तिथून ट्रेनने तो पुण्याला गेला आणि एका हॉटेलात नोकरी करु लागला. मध्ये आखद दिवस तो गावी यायचा, पण तो कुणालाही भेटत नसे. एके दिवशी त्याचे हॉ़टेलमालकाशी भांडण झाले. शिवने त्या मालकाला जबर मारहाण केली. त्यानंतर त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली. वडिलांनी त्याची सुटका केली. त्यानंतर शिव गोव्याला गेला. तिथे गेल्यावकर काम करता करता इंग्रजी शिकू आणि बोलू लागला.

हे सुद्धा वाचा

रक्षाबंधनासाठी आला होता गावी

रक्षाबंधनासाठी तो सात आठ दिवसांसाठी त्याच्या केकरा या गावी आला होता. त्यानंतर कुठे गेला याची माहिती घरा कुणालाच नव्हती. त्याच्याशी कधीही फोनवर बोलणे झाले नाही आणि तो कुठे राहतो, कुठे नोकरी करतो याचीही माहिती नसल्याचे त्याच्या वडिलांनी सांगितले.

आईला म्हणाला लवकरच सगळे ओळखतील..

शिवच्या आईने सांगितले की तो आल्यापासूनच विचित्र वाटत होता. निरपराध लोकांचे प्राण तो घेत असावा असे जाणवत होते. त्याने आईला सांगितले होते की, लवकरच त्याला लोकं ओळखायला लागतील. शिव या कुटुंबातील सर्वात लहान मुलगा होता. त्याचा मोठा भाऊ पुण्यात मजुरीचे काम करतो, त्याच्या इतर दोन बहिणींची लग्नेही झालेली आहे. वडिलांकडे एक-दीड एकर जमीन आहे, त्यातून त्यांचा संसार सुरु आहे.

65 किलोमीटर सायकल चालवून सागरमध्ये आला

शिव केकरा गावातून 65 किमी अंतर सायकलवर कापत सागरमध्ये आला होता. 25 ऑगस्ट रोजी कटारा परिसरात एका घर्मशाळेत तो राहिला. तिथेच 27  ऑगस्ट रोजी त्याने कल्याण लोधी नावाच्या सुरक्षा रक्षकाची हत्या केली. त्यानंतर 29 ऑगस्ट रोजी ६० वर्षीय शंभूदयाल दुबेची त्याने हत्या केली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी 30 ऑगस्ट रोजी 40 वर्षीय मंगल अहिरवार याची झोपलेला असताना फावड्याने हत्या केली. या तिन्ही हत्यात्याने सागरमध्ये केल्या होत्या. त्यानंतर भोपाळमध्ये 1 सप्टेंबर रोजी 27 वर्षांच्या सोनू वर्मा याची त्याने हत्या केली. ही घटना सीसीटीव्हीत रेक़ॉर्ड झाली.

मोबाईल लोकेशनमुळे शिव अटकेत

सागरमध्ये तीन हत्या झाल्यानंतर दहशत निर्माण झाली, राज्याच्या गृहमंत्र्यांनी या प्रकरणाची दखल घेत सीरियल किलरला अटक करण्याचे आदेश दिले. शिवला याची कुणकुण लागली आणि तो 30 ऑगस्टला हत्या केल्यानंतर तो ट्रेनने भोपाळमध्ये आला. सागरमध्ये असताना त्याने ज्या शंभूदयालची हत्या केली होती, त्याचा मोबाईल त्याने स्वताकडे ठेवला होता. तो बंद करुन ठेवला होता. पोलीस या मोबाईल नंबरच्या लोकेशनच्या प्रतीक्षेत होते. शिवने गुरुवारी रात्री 11 वाजता मोबाील चालू केला. सागर पोलिसांना लोकेशनची माहिती मिळाल्यानंतर ते भोपाळला रवाना झाले. पोलीस भोपाळला येईपर्यंत त्याने पुन्हा मोबाईल स्वीच ऑफ करुन ठेवला. अखेरीस पहाटे साडे तीनच्या सुमारास त्याने मोबाईल पुन्हा सुरु केला. त्यानंतर त्याचेलोकेशन सापडले आणि त्याला पहाटे पाचच्या सुमारास अटक करण्यात आली.

भोपाहळून पोलीस त्याला घेऊन जात असताना रस्त्यातच त्याने आणखी एक हत्या केल्याची माहिती पोलिसांना दिली. त्याच्याकडे या गार्डचाही मोबाील पोलिसांना सापडला. त्यानंतर या हत्येचा तपासही लागला

प्रसिद्ध होण्यासाठी खून केल्याची कबुली

शिवने हे कबूल केले आहे की, प्रसिद्ध होण्यासाठी त्याने चार सुरक्षारक्षकांचे प्राण घेतले. तो हे सगळे मध्यरात्री करीत होता. झोपलेल्या सुरक्षारक्षकांना तो टार्गेट करीत असे. त्याला पुढे पोलिसांना मारण्याचीही इच्छा होती. या सीरियल किलरच्या तपासासाठी 10टीम तैनात करण्यात आल्या होत्या, त्यात 250 पोलिसांचा समावेश होता.

Non Stop LIVE Update
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?.
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत.
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य.
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल.
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली.
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?.
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ.
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट.
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट.
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले...
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले....