बालासोर दुर्घटनेनंतर तब्बल 51 तासानंतर पु्न्हा रेल्वे सुरू, रेल्वेमंत्र्यांच्या उपस्थितीत मालगाडी रवाना

या अपघातात आतापर्यंत 275 जणांचा मृत्यू झाला आहे. तर एक हजाराहून अधिक लोकं जखमी झाली आहेत. त्यामुळे या प्रकरणात दोषी असणाऱ्यांवर कडकर कारवाई केली जाणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले आहे.

बालासोर दुर्घटनेनंतर तब्बल 51 तासानंतर पु्न्हा रेल्वे सुरू, रेल्वेमंत्र्यांच्या उपस्थितीत मालगाडी रवाना
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Jun 05, 2023 | 1:03 AM

ओडिशा : ओडिशातील बालासोर येथे शनिवारी संध्याकाळी झालेल्या रेल्वे अपघातानंतर अनेकांना त्याचा धक्का बसलेला आहे. त्या अपघातात आतापर्यंत 275 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातानंतर आता या प्रकरणाचा तपास सीबीआयकडून करण्यात येणार आहे. आता या अपघातानंतर आता महत्वाची गोष्ट म्हणजे बालासोरमध्ये दोन्ही डाऊन लाईन सुरू झाल्या आहेत. या अपघातानंतर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव घटनास्थळी उपस्थित असून त्यांच्या उपस्थितीत आज एक मालगाडी डाऊन लाईनवरून सोडण्यात आली आहे. याच ठिकाणाहून मालगाडी गेल्यानंतर रेल्वेमंत्र्यांनी हात जोडून आभार मानले आहेत.

अपघात ठिकाणाहून मालगाडी निघून गेल्यानंतर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी प्रसारमाध्यमांबरोबर बोलताना सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी येथे आले होते.

त्यानंतर त्यांनी सांगितले की, सर्वांनी पूर्ण तत्परतेने काम करण्याच्या सूचना त्यांना दिल्या आहेत. त्यामुळे आता रेल्वे कर्मचाऱ्यानीही आता जोरदार पणे काम सुरु केले आहे.

अपघातानंतर आता या दोन्ही ट्रॅकची दुरुस्ती करण्यात आली असून अपघातानंतर 51 तासामध्ये रेल्वेची वाहतूक सुरू करण्यात आली आहे.

अपघातानंतर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव 51 तासांहून अधिक काळ घटनास्थळी तळ ठोकून आहेत. त्यांच्या देखरेखीखाली बचाव आणि मदतकार्यही सुरू करण्यात आले आहे.

या अपघाताची सीबीआयमार्फत चौकशी करण्याच्या सूचना करण्यात आल्याची माहितीही रेल्वेमंत्री वैष्णव यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. यावेळी त्यांना सांगितले की, रेल्वे अपघाताला जबाबदार असलेल्यांची आता खात्री पटली आहे. त्यामुळे या प्रकरणातील कोणत्याही दोषीला सोडणार नसून त्यांच्यावर कडक कारवाई केली जाणार आहे.

बालासोरजवळ कोरोमंडल एक्स्प्रेसची अप लूप लाइनमध्ये उभ्या असलेल्या मालगाडीला येऊन धडक बसली आहे. त्यानंतर रुळावरून घसरलेल्या बोगी एकाच वेळी डाऊन मार्गावरून जाणार्‍या बेंगळुरू-हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेसच्या दोन मागील बोगींवर आदळल्या आहेत.

त्यामुळेच या अपघातात आतापर्यंत 275 जणांचा मृत्यू झाला आहे. तर एक हजाराहून अधिक लोकं जखमी झाली आहेत. त्यामुळे या प्रकरणात दोषी असणाऱ्यांवर कडकर कारवाई केली जाणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले आहे.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.