AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ट्रेनमध्ये सीलबंद दारूच्या बाटल्या नेता येतात का? नेमका नियम काय? वाचा…

Train Liquor Rule : ट्रेनमध्ये सीलबंद दारूच्या बाटल्या कायदेशीररित्या नेता येतात का? आणि नेता येत असतील तर किती? आज आपण याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

ट्रेनमध्ये सीलबंद दारूच्या बाटल्या नेता येतात का? नेमका नियम काय? वाचा...
train sealed liquor bottles rulesImage Credit source: Google
| Updated on: Sep 08, 2026 | 11:07 PM
Share

भारतातील अनेक राज्यांमध्ये दारुबंदी आहे. याच बिहारचाही समावेश आहे. बिहारमध्ये दारूबंदी असतानाही तस्कर दारूची वाहतूक करण्यासाठी नवनवीन मार्ग शोधत आहेत. समस्तीपूरमध्ये एसी कोचमधून प्रवास करणाऱ्या एका तरुण आणि तरुणीच्या सामानातून सुमारे 75 लिटर इंडियन मेड फॉरेन लिकर जप्त करण्यात आली. या घटनेनंतर सामान्य प्रवाशांच्या मनात एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे की ट्रेनमध्ये सीलबंद दारूच्या बाटल्या कायदेशीररित्या नेता येतात का? आणि नेता येत असतील तर किती? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

ट्रेनमध्ये दारू नेण्यास परवानगी आहे का?

भारतीय रेल्वेचा असा कोणताही एक देशव्यापी नियम नाही, ज्यात दारू नेण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. दारू नेणे कायदेशीर आहे की नाही, हे मुख्यतः प्रवासादरम्यान येणाऱ्या राज्यांच्या उत्पादन शुल्क म्हणजेच आबकारी कायद्यांवर अवलंबून असते. ज्या राज्यांमध्ये दारूला परवानगी आहे, तिथे राज्याच्या नियमांनुसार वैयक्तिक वापरासाठी मर्यादित प्रमाणात दारू नेता येऊ शकते. याचा अर्थ असा नाही की प्रवास सुरू करण्याच्या ठिकाणी दारू कायदेशीररित्या खरेदी केली असेल तर संपूर्ण प्रवासात ती आपोआप कायदेशीर ठरते. तुमच्याकडे दारू सापडल्यास तुमच्यावर कारवाई होऊ शकते.

किती बाटल्या नेता येतात?

ज्या राज्यांमध्ये दारूबंदी नाही, तिथे स्थानिक नियमांनुसार प्रवाशांना वैयक्तिक वापरासाठी साधारण 1 ते 2 लिटर किंवा दोन सीलबंद बाटल्या नेण्याची परवानगी मिळू शकते. मात्र, हे प्रमाण प्रत्येक राज्याच्या नियमांनुसार वेगळे असू शकते. दारूच्या बाटल्या पूर्णपणे सीलबंद असाव्यात आणि प्रवाशाच्या मुख्य सामानामध्ये व्यवस्थित पॅक केलेल्या असाव्यात. उघडी बाटली सोबत असल्यास कायदेशीर अडचणी निर्माण होऊ शकतात. दारू खरेदी केल्याचे मूळ बिल किंवा पावतीही प्रवाशांनी जवळ ठेवणे आवश्यक आहे. रेल्वे, पोलीस किंवा आबकारी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सामानाची तपासणी केल्यास दारू कायदेशीररित्या खरेदी केल्याचे सिद्ध करण्यासाठी ही पावती उपयोगी ठरू शकते.

दारूबंदी असलेल्या राज्यातून ट्रेन गेल्यास काय?

ट्रेनचा प्रवास अशा राज्यातून होत असेल, जिथे दारूवर पूर्णपणे किंवा कडक निर्बंध आहेत, तर परिस्थिती बदलते. बिहार, गुजरात आणि नागालँड यांसारख्या राज्यांमध्ये दारूबाबत कडक नियम आहेत. तसेच लक्षद्वीपमध्येही दारूच्या साठवणुकीवर आणि वाहतुकीवर निर्बंध आहेत. त्यामुळे एखाद्या राज्यात कायदेशीररित्या खरेदी केलेली सीलबंद दारूची बाटली दारूबंदी असलेल्या राज्याच्या हद्दीत नेल्यास कायदेशीर अडचण निर्माण होऊ शकते.

बिहारमध्ये ट्रेनमधून दारू नेता येते का?

बिहारमध्ये दारूबंदी लागू आहे. या कायद्यानुसार दारू बाळगणे, तिची वाहतूक करणे आणि सेवन करणे यावर कडक निर्बंध आहेत. त्यामुळे रस्त्याऐवजी ट्रेनने प्रवास करत असल्यामुळे सीलबंद दारूच्या बाटल्या नेता येतील, असा समज प्रवाशांनी करून घेऊ नये. समस्तीपूरमध्ये झालेली 75 लिटर दारूची जप्ती याचे उदाहरण आहे. 75 लिटर हे वैयक्तिक वापरासाठी मानल्या जाणाऱ्या मर्यादेपेक्षा खूपच अधिक प्रमाण असल्याने अशा प्रकरणांमध्ये कडक तपासणी आणि कायदेशीर कारवाई होऊ शकते.

ट्रेनमध्ये दारू पिण्याबाबत काय नियम आहेत?

कायदेशीररित्या परवानगी असलेल्या दारूच्या बाटल्या सोबत नेणे आणि ट्रेनमध्ये दारू पिणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. ट्रेनमध्ये किंवा रेल्वे परिसरात दारूची बाटली उघडणे अथवा दारू पिणे, विशेषतः एखादी व्यक्ती नशेत जाऊन इतर प्रवाशांना त्रास देत असल्यास, रेल्वे कायदा, 1989 मधील कलम 145 अंतर्गत कारवाईचे कारण ठरू शकते. परिस्थितीनुसार अशा प्रकारच्या वर्तनासाठी 6 महिन्यांपर्यंत कारावास आणि दंडाची शिक्षा होऊ शकते. त्यामुळे लागू असलेल्या आबकारी नियमांनुसार सीलबंद दारू सोबत नेण्याची परवानगी असली, तरी ट्रेनच्या डब्यात बाटली उघडून दारू पिण्याची परवानगी आहे, असा अर्थ होत नाही.

Follow Us
संतोष पंडितांना मोठा धक्का! 21 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी
Santosh Pandit Case | संतोष पंडितांना मोठा धक्का! 21 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी
धनुष्यबाण गोठवा! उद्धव ठाकरेंची मागणी; उदय सामंतांचा सणसणीत पलटवार...
Uday Samant on Uddhav Thackeray | धनुष्यबाण गोठवा! उद्धव ठाकरेंची मागणी; उदय सामंतांचा सणसणीत पलटवार, म्हणाले काँग्रेसच्या मांडीवर...
MPSC अध्यक्षांनी राजीनामा द्यावा! पवारांची मोठी मागणी; नाही दिला तर...
MPSC अध्यक्षांनी राजीनामा द्यावा! रोहित पवारांची मोठी मागणी; नाही दिला तर...
भरती परीक्षांतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सरकार ॲक्शन मोडमध्ये!
Devendra Fadnavis | भरती परीक्षांतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सरकार ॲक्शन मोडमध्ये! मुख्यमंत्र्यांनी काय दिले आदेश?
दहिहंडीतलं उत्तान नृत्य नव हिंदुत्ववाद्यांना मान्य आहे का?
Uddhav Thackeray | दहिहंडीतलं उत्तान नृत्य नव हिंदुत्ववाद्यांना मान्य आहे का? असा सवाल करत उद्धव ठाकरेंनी सरकारला घेरलं
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर नंबर प्लेटचा खेळ! दंडापासून वाचण्यासाठी...
Mumbai-Pune Expressway | मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर नंबर प्लेटचा खेळ! दंडापासून वाचण्यासाठी अनोखी शक्कल; एकाच गाडीवर तब्बल...
PM मोदींच्या मुंबई दौऱ्यात सुरक्षा भेदण्याचा प्रयत्न? BKCमध्ये बनावट..
मोठी बातमी! PM मोदींच्या मुंबई दौऱ्यात सुरक्षा भेदण्याचा प्रयत्न? BKCमध्ये बनावट PMO IDसह तरुण ताब्यात
उद्धव ठाकरेंची मोठी मागणी! धनुष्यबाण चिन्ह गोठवा; शिवसेना....
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंची मोठी मागणी! धनुष्यबाण चिन्ह गोठवा; शिवसेना पक्षचिन्हाच्या लढाईला नवं वळण
एकाच्या ताटातलं काढून दुसऱ्याच्या ताटात टाकणारे आम्ही नाही!
CM Devendra Fadnavis | एकाच्या ताटातलं काढून दुसऱ्याच्या ताटात टाकणारे आम्ही नाही! मराठा आरक्षणावर मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य
शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! कांद्याला मिळतोय विक्रमी भाव; पिंपळगावात...
Onion Price Hike | शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! कांद्याला मिळतोय विक्रमी भाव; पिंपळगावात 6600, तर लासलगावात दर किती?