TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडिया 2025: खाद्यपदार्थ, संस्कृती आणि संगीताची एक भव्य झलक
देशभरातील नागरिकांच्या मनावर राज्य करत हजारो प्रेक्षकांना आकर्षित करणाऱ्या दोन अत्यंत यशस्वी आवृत्त्यांनंतर, 'TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडिया' पुन्हा एकदा अधिक भव्य, तेजस्वी स्वरूपात परतला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

देशभरातील नागरिकांच्या मनावर राज्य करत हजारो प्रेक्षकांना आकर्षित करणाऱ्या दोन अत्यंत यशस्वी आवृत्त्यांनंतर, ‘TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडिया’ पुन्हा एकदा अधिक भव्य, तेजस्वी स्वरूपात परतला आहे. TV9 नेटवर्कने मोठ्या उत्साहात फेस्टिव्हल ऑफ इंडियाच्या तिसऱ्या आवृत्तीची घोषणा केली आहे. हा एक पाच दिवसांचा सांस्कृतिक कार्यक्रम आहे, जो 28 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 202 दरम्यान नवी दिल्लीतील मेजर ध्यानचंद राष्ट्रीय स्टेडियम येथे आयोजित केला जाणार आहे.
TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडिया बाबत बोलताना TV9 नेटवर्कचे मुख्य कार्यकारी अधिकारी के विक्रम म्हणाले की, ‘TV9 भारताच्या प्रत्येक कोपऱ्यात पसरलेले आहे. भारताला एकत्र करणारे सर्वात शक्तिशाली माध्यम म्हणजे आपले सण. त्यामळे आपल्या भारताला उत्सवांची राजधानी म्हटले जाते आणि TV9 अभिमानाने हा विविध उत्सव सादर करत आहे. यंदाच्या फेस्टिव्हलमध्ये आम्ही उत्सवाचा दर्जा वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. आम्हाला विश्वास आहे की दिल्ली-एनसीआरमधील लोक या भव्य कार्यक्रमावर प्रेम करतील.
यंदाच्या फेस्टिव्हलमधील महत्वाचे मुद्दे
TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडिया हा उत्सव भारताच्या समृद्ध वारशाचा आणि आधुनिक उर्जेचा संगम आहे. यात संगीत प्रेमींसाठी, खाद्यप्रेमींसाठी आणि शॉपिंगची आवड असणाऱ्यांसाठी नक्कीच काहीतरी खास असणार आहे.
दुर्गापूजा पंडाल
दिल्लीतील सर्वात उंच आणि आकर्षिक डिझाइन केलेला दुर्गा पूजा पंडाल, याची मंत्रमुग्ध करणारी सजावट, विधी आणि दैवी उर्जेसह तुम्हाला येथे एक सकारात्मक अनुभव मिळेल.
संगीतप्रेमींसाठी खास नियोजन
या फेस्टिव्हलमध्ये संगीत प्रेमींसाठी खास कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत. यात भारतातील आघाडीचे गायक बॉलिवूड साँग्स, लोकसंगीत सादर करणार आहेत.
दांडिया आणि गरबा
तुम्हाला या फेस्टिव्हलमध्ये दांडिया आणि गरब्याचा आनंद घेता येणार आहेत. पारंपारिक पोशाख घाला आणि मित्र आणि कुटुंबासह गरबा-दांडियाचा आनंद लुटा.
शॉपिंग
या फेस्टिव्हलमध्ये अनेक दुकाने असणार आहेत. यात हस्तकलेपासून ते हाय-स्ट्रीट फॅशनपर्यंत सर्वकाही मिळेल.
अन्न पदार्थ
या फेस्टिव्हलमध्ये काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत विविध प्रादेशिक खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे.
फेस्टिव्हलची माहिती
हा फेस्टिव्हल 28 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीत मेजर ध्यानचंद राष्ट्रीय स्टेडियम, नवी दिल्ली येथे आयोजिक केला जाणार आहे. या कार्यक्रमाची वेळ सकाळी 10 ते रात्री 10 पर्यंत असणार आहे. तुम्ही अधिक माहितीसाठी www.tv9festivalofindia.com या वेबसाईटला भेट देऊ शकता.
