AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कुणाला ज्वेलरी हवीय, तर कुणाला दर्दनाशक बाम… टीव्ही9 नेटवर्कच्या इंडिया फेस्टिव्हलला तुफान गर्दी

तुम्हाला थायलंडची सुवासिक आयुर्वेदी अगरबत्ती आणि धूपबत्ती घरात लावायची आहे? पण थायलंडहून ही आयुर्वेदिक अगरबत्ती आणि धूपबत्ती मागवायची कशी असा प्रश्न तुम्हाला पडलाय? आता टेन्शन घेऊ नका. दिल्लीतील इंडिया गेटच्या बाजूला असलेल्या मेजर ध्यानचंद स्टेडियममध्ये या. या ठिकाणी टीव्ही9 नेटवर्कचा सर्वात मोठा इंडिया फेस्टिव्हल सुरू आहे. या फेस्टिव्हलमध्ये देशविदेशातील 250 हून अधिक स्टॉल लागले आहेत. त्यात थायलंडच्या आयुर्वेदिक अगरबत्ती आणि धूपबत्तीचाही स्टॉल लागला असून तुम्हाला इथे खरेदी करता येणार आहे.

कुणाला ज्वेलरी हवीय, तर कुणाला दर्दनाशक बाम... टीव्ही9 नेटवर्कच्या इंडिया फेस्टिव्हलला तुफान गर्दी
TV9 Festival of IndiaImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 10, 2024 | 8:48 PM
Share

टीव्ही9 नेटवर्कच्या इंडिया महोत्सवाला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. दिल्लीच्या मेजर ध्यानचंद स्टेडियमवर हा फेस्टिव्हल आयोजित करण्यात आला आहे. काल सुरू झालेल्या या महोत्सवाला भेट देण्यासाठी आज तुफान गर्दी लोटली होती. तरुण आणि तरुणींची या महोत्सवात झुंबड उडाली होती. देशविदेशातील वस्तू आणि खाद्यपदार्थ खरेदी करण्यासााठी प्रत्येक स्टॉलवर तोबा गर्दी उसळली होती. त्यामुळे व्यापाऱ्यांचाही मोठा फायदा झाला. यावेळी तरुणाईनी संगीत आणि मनोरजंक कार्यक्रमांचा अस्वाद घेतला.

काल बुधवारी टीव्ही9 नेटवर्कच्या इंडिया महोत्सवाला दिल्लीत दणक्यात सुरुवात झाली. दुर्गा पूजेने ही सुरुवात झाली. यावेळी रंगारंग कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. टीव्ही9 नेटवर्कच्या इंडिया महोत्सवाची माहिती असल्याने दिल्लीकरांनी दुपारीच महोत्सवात हजेरी लावून खरेदी करण्यास सुरुवात केली होती. संध्याकाळी तर तोबा गर्दी झाली होती. आज दिवसभर महोत्सवात प्रचंड गर्दी झाली. हजारो लोक ये-जा करून होते. कुणी खरेदीसाठी येत होते, तर कोणी प्रत्येक स्टॉल न्याहाळण्यासाठी येत होते. कुणी खाद्यपदार्थांवर ताव मारण्यासाठी, कुणी कपडे खरेदी करण्यासाठी तर कुणी संगीताचा आनंद लुटण्यासाठी आले होते. बघावं तिकडे गर्दीच गर्दी दिसत होती.

बापरे… या स्टॉलवर महिलांची तुफान गर्दी

कोरियाच्या एका स्टॉलकडे महिलांची नजर पडली नसती तर नवलच. या स्टॉलवर महिलांसाठी खास आर्टिफिशियल ज्वेलरी विकण्यात येत होत्या. तसेच महिलांच्या सौंदर्याला चार चांद लावतील असे सौंदर्य प्रसाधनेही विकण्यात येत होते. त्यामुळे या स्टॉलवर महिलांची प्रचंड गर्दी झाली होती.

या ठिकाणी बुजुर्ग का जमलेत?

एक स्टॉल असाही दिसला, तिथे फक्त ज्येष्ठ नागरिक आणि काही पोक्त माणसे दिसली. त्याचं कारणही तसंच होतं. कारण हा थायलंडचा स्टॉल होता. या स्टॉलवर एक बाम मिळत होता. गुडघे, पायदुखीवर हा बाम जालीम असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे हा थायलंड बाम खरेदी करण्यासाठी बुजुर्गांनी या स्टॉलवर गर्दी केली होती. वेगवेगळ्या साईजच्या बॉटलचा वेगवेगळा रेट लावण्यात आला होता. या स्टॉलचा मालक आणि थायलंडचा व्यापारी फेकचीन याच्या मतानुसार हा बाम लावल्याने शरीरात गंभीरपणे होणाऱ्या वेदना थांबतील. डोकेदुखी, अंगदुखी आणि गुडघ्यांचे दुखणे थांबेल.

पितळनगरी थेट दिल्लीत

घराच्या सजावटीचं सामान घ्यायचं असेलत र मुरादाबादच्या पितळनगरीतून घेतलं पाहिजे, असं सांगितलं जातं. पण एवढ्या लांब जायचं कसं? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर उत्तर सोप्पं आहे. थेट पितळनगरीचा हा स्टॉल टीव्ही9 नेटवर्कच्या सर्वात मोठ्या इंडिया फेस्टिव्हलमध्ये लागला आहे. या ठिकाणी तुम्हाला हवं ते सामान घेता येणार आहे. पितळेचे सुंदर कंदिल खरेदी करता येणार आहे. या कंदिलाची किंमत 500 रुपयांपासून ते 5000 रुपयांपर्यंत आहे, असं मुरादाबादचे व्यापारी मोहम्मद बिलाल यांनी सांगितलं.

पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.