फेस्टिव्हल ऑफ इंडिया 2024
'टीव्ही9 फेस्टिव्हल ऑफ इंडिया'च्या दुसऱ्या पर्वाला सुरुवात झाली आहे. हा महोत्सव उत्साह, सांस्कृतिक वैविध्यतेचं दर्शन घडवणारा आहे. यंदा हा उत्सव 9 ऑक्टोबर ते 13 ऑक्टोबर 2024पर्यंत चालणार आहे. तब्बल पाच दिवस हा उत्सव चालणार आहे. पाच दिवस चालणारा हा महोत्सव दिल्लीकरांसाठी मोठी पर्वणीच ठरणार आहे. दिल्लीच्या इंडिया गेटजवळील मेजर ध्यानचंद स्टेडियममध्ये या उत्सवाचा आनंद लुटता येणार आहे. हा महोत्सव अनेक लाइव्ह परफॉर्मन्स आणि संस्मरणी मनोरंजक क्षणांचा ठेवा ठरणारा आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून तुम्हाला वैश्विक लाइफस्टाईलशीही परिचित होता येणार आहे. या महोत्सवात मनाजोग्या खरेदीचा आनंदही लुटता येणार आहे. सोबतच आंतरराष्ट्रीय प्रदर्शने, रुचकर पदार्थ, लाइव्ह संगीत आणि 250 हून अधिक स्टॉलवर बरंच काही पाहायला, खरेदी करायला मिळणार आहे. गेल्या वर्षी या महोत्सवाची संपूर्ण शहरात प्रचंड क्रेझ निर्माण झाली होती. यावेळी पुन्हा एकदा हा महोत्सव धुमाकूळ घालण्यासाठी आला आहे. टीव्ही9 फेस्टव्हल ऑफ इंडिया पुन्हा एकदा दिल्लीतील सर्वात उंच दुर्गा पूजा मंडपा उभारणार आहे. या ठिकाणी दुर्गा पूजेचा सार आणि माँ दुर्गेची महिमा दाखवली जाणार आहे.
TV9 फेस्टीव्हल ऑफ इंडिया 2024: पाचवा दिवस गाजला, अंतिम पूजा, सिंदुर खेला तसेच मनोरंजक कार्यक्रमाची मेजवानी
दिल्लीत पाच दिवसीय TV9 फेस्टीव्हल ऑफ इंडिया 2024 मध्ये दसऱ्याच्या दिवशी शनिवारी मोठा उत्साह होता. गरबा नाईटमध्ये प्रसिद्धी हस्तींचा सहभाग आणि अनेक रंगारंग कार्यक्रमाची रेलचेल होती
- Atul Kamble
- Updated on: Oct 13, 2024
- 5:02 pm
टीव्ही9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा आज चौथा दिवस; दसऱ्याच्या निमित्ताने खास कार्यक्रम काय?
टीव्ही9 नेटवर्कच्या फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा आज चौथा दिवस आहे. या फेस्टिव्हलमध्ये 250हून अधिक स्टॉल लावण्यात आले आहेत. देश विदेशातील व्यापाऱ्यांच्या या स्टॉलवर जगातील वस्तू खरेदी करण्याचा हा उत्तम योग आहे. आज चौथ्या दिवशी फेस्टिव्हलमध्ये लहान मुले आणि बुजुर्गांवर अधिक फोकस करण्यात आला आहे.
- भीमराव गवळी
- Updated on: Oct 12, 2024
- 11:45 am
टीव्ही9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाला केंद्रीय मंत्र्यांसह दिग्गजांची हजेरी, देवीचं घेतलं दर्शन
टीव्ही9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचं भव्य आयोजन करण्यात आलं आहे. आज तिसऱ्या दिवशी महाअष्टमीचं आयोजन करण्यात आलं होतं. टीवी9 नेटवर्कचे एमडी आणि सीईओ बरुण दास आणि न्यूज डायरेक्टर हेमंत शर्मा यांनी संधी पूजा आणि भोग आरती केली. आज तिसऱ्या दिवशीही या फेस्टिव्हलला दिग्गजांनी हजेरी लावली आहे. केंद्रीय मंत्र्यांसहित विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या फेस्टिव्हलला हजेरी लावली.
- भीमराव गवळी
- Updated on: Oct 11, 2024
- 8:32 pm
TV9 फेस्टिव्हलमध्ये खाद्यसंस्कृतीची रेलचेल; नागरिकांचा तुफान प्रतिसाद
TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियामध्ये सांस्कृतिक पर्वणीसह खाद्यसंस्कृतीची रेलचेल आहे. या कार्यक्रमात अनेक देशांचे 250 हून अधिक स्टॉल लागले आहेत. TV9 नेटवर्कने आयोजित केलेला हा उत्सव 13 ऑक्टोबरपर्यंत सुरू असेल
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Oct 11, 2024
- 6:40 pm
या खा… खरेदी करा… संगीताचा आनंद घ्या आणि… ‘टीव्ही9’च्या इंडिया फेस्टिव्हलचा धूमधडाका
या महोत्सवाला देशभरातूनच नव्हे तर जगभरातून व्यापारी आले आहेत. या महोत्सवात 250 हून अधिक स्टॉलवर विविध गोष्टी विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत.
- Namrata Patil
- Updated on: Oct 11, 2024
- 3:54 pm
टीव्ही9च्या फेस्टिव्हल ऑफ इंडियामध्ये दांडिया आणि गरब्याचा धुमाकूळ… आजही कार्यक्रमांची रेलचेल
TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा आज तिसरा दिवस आहे. आज तिसऱ्या दिवशीही या फेस्टिव्हलला लोकांची प्रचंड गर्दी झाली आहे. उद्या दसरा असल्याने आज खरेदीसाठी नागरिकांची मोठी झुंबड उडाली आहे. पाय ठेवायला जागा नाही एवढी गर्दी या ठिकाणी झाली आहे. आजही दिल्लीकरांसाठी या फेस्टिव्हलमध्ये रंगारंग कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.
- भीमराव गवळी
- Updated on: Oct 11, 2024
- 1:26 pm
कलेचा मिनी कुंभच आहे..TV9च्या फेस्टीव्हल ऑफ इंडियात म्हणाले नकवी
कलेचा मिनी कुंभच आहे..TV9च्या फेस्टीव्हल ऑफ इंडियात म्हणाले नकवी दुर्गा पूजेच्या निमित्ताने TV9 भारतवर्षचा पाच दिवसीय 'फेस्टीव्हल ऑफ इंडिया' सुरु आहे
- Atul Kamble
- Updated on: Oct 10, 2024
- 9:42 pm
कुणाला ज्वेलरी हवीय, तर कुणाला दर्दनाशक बाम… टीव्ही9 नेटवर्कच्या इंडिया फेस्टिव्हलला तुफान गर्दी
तुम्हाला थायलंडची सुवासिक आयुर्वेदी अगरबत्ती आणि धूपबत्ती घरात लावायची आहे? पण थायलंडहून ही आयुर्वेदिक अगरबत्ती आणि धूपबत्ती मागवायची कशी असा प्रश्न तुम्हाला पडलाय? आता टेन्शन घेऊ नका. दिल्लीतील इंडिया गेटच्या बाजूला असलेल्या मेजर ध्यानचंद स्टेडियममध्ये या. या ठिकाणी टीव्ही9 नेटवर्कचा सर्वात मोठा इंडिया फेस्टिव्हल सुरू आहे. या फेस्टिव्हलमध्ये देशविदेशातील 250 हून अधिक स्टॉल लागले आहेत. त्यात थायलंडच्या आयुर्वेदिक अगरबत्ती आणि धूपबत्तीचाही स्टॉल लागला असून तुम्हाला इथे खरेदी करता येणार आहे.
- भीमराव गवळी
- Updated on: Oct 10, 2024
- 8:48 pm
ईराणचे केसर, अफगाणिस्तानचा सुकामेवा आणि… ‘टीव्ही9’च्या इंडिया फेस्टिव्हलमध्ये काय काय?
या फेस्टिव्हलमध्ये मिटेल्स स्नॅक्सचाही एक स्टॉल आहे. भारतीय सैन्याने मिलेट्सला जवानांच्या भोजनात समाविष्ट करण्याचा नुकताच निर्णय घेतला आहे. सैनिकांचं आरोग्य चांगलं राहावं या हेतूने हा निर्णय घेतला आहे.
- भीमराव गवळी
- Updated on: Oct 9, 2024
- 8:54 pm
TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाची दुर्गा पुजेने दणक्यात सुरूवात, पाच दिवस उत्सवाचे
TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाची दुर्गा पुजेने एकदम दमदार सुरूवात झाली. या कार्यक्रमात अनेक देशांचे 250 हून अधिक स्टॉल लागले आहेत. TV9 नेटवर्कने आयोजित केलेला हा उत्सव 13 ऑक्टोबरपर्यंत सुरू असेल.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Oct 9, 2024
- 5:44 pm
काय साड्या, काय अत्तर, काय खेळणी… संमदं ओक्केमध्ये… ‘टीव्ही9 महोत्सवा’ला प्रचंड गर्दी
नवी दिल्लीकरांना पुन्हा एकदा देशविदेशातील कला आणि संस्कृतीचा अनोखा संगम पाहायला मिळणार आहे. टीव्ही9 नेटवर्कने इंडिया फेस्टिव्हलचं आयोजन केलं आहे. आजपासून 13 ऑक्टोबरपर्यंत म्हणजे तब्बल पाच दिवस हा फेस्टिव्हल चालणार आहे. त्यामुळे दिल्लीकरांसाठी एक मोठी पर्वणीच ठरणार आहे. दुपारी या फेस्टिव्हलला सुरुवात झाली आणि नागरिकांनी फेस्टिव्हलला भेटण्यासाठी मोठी गर्दी करण्यासही सुरुवात केली आहे.
- भीमराव गवळी
- Updated on: Oct 9, 2024
- 5:07 pm
टीव्ही9 फेस्टिव्हलची दणक्यात सुरुवात; दिल्लीकरांसाठी 5 दिवस खास पर्वणी; यंदा काय आहे विशेष ?
दुर्गा पूजेच्या निमित्ताने टीव्ही9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाची सुरुवात झाली आहे. राजधानी दिल्लीतील मेजर ध्यानचंद स्टेडियममध्ये भारतातील सर्वात मोठं लाइफस्टाईल एक्सपो सुरू झालं आहे. TV9 नेटवर्कचा हा बहुचर्चित फेस्टिव्हल 5 दिवस चालणार आहे
- manasi mande
- Updated on: Oct 9, 2024
- 3:11 pm