AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ईराणचे केसर, अफगाणिस्तानचा सुकामेवा आणि… ‘टीव्ही9’च्या इंडिया फेस्टिव्हलमध्ये काय काय?

या फेस्टिव्हलमध्ये मिटेल्स स्नॅक्सचाही एक स्टॉल आहे. भारतीय सैन्याने मिलेट्सला जवानांच्या भोजनात समाविष्ट करण्याचा नुकताच निर्णय घेतला आहे. सैनिकांचं आरोग्य चांगलं राहावं या हेतूने हा निर्णय घेतला आहे.

ईराणचे केसर, अफगाणिस्तानचा सुकामेवा आणि... 'टीव्ही9'च्या इंडिया फेस्टिव्हलमध्ये काय काय?
TV9 Festival Of IndiaImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 09, 2024 | 8:54 PM
Share

दुर्गा पूजेच्या पवित्र दिनानिमित्त टीव्ही9 नेटवर्कने इंडिया फेस्टिव्हलचं आयोजन केलं आहे. दिल्लीतील मेजर ध्यानचंद स्टेडियमवर हा महोत्सव पाच दिवस चालणार आहे. या महोत्सवाला देशातूनच नव्हे तर जगभरातून व्यापारी आले आहेत. या महोत्सवात 250 हून अधिक स्टॉल लागले आहेत. त्यामुळे दिल्लीत अवघं जग अवतरल्याचं दिसून येत आहे. 9 ऑक्टोबरपासून ते 13 ऑक्टोबरपर्यंत हा महोत्सव सुरू राहणार असून आजपासूनच या महोत्सवात प्रचंड गर्दी झाली आहे.

या महोत्सवात प्रत्येक स्टॉल अत्यंत खास आहे. सर्वच स्टॉल्स आकर्षित करणारे आहेत. त्यामुळे या स्टॉलला जाऊ की त्या स्टॉलला अशी प्रत्येकाची अवस्था होताना दिसत आहे. घरातील सजावटीच्या सामानापासून ते खेळणी आणि खाद्यपदार्थांची रेलचेल या महोत्सवात आहे. अफगाणिस्तानातील काबूल येथील खास दगडांनी बनलेल्या वस्तूही तुमचं लक्ष आकर्षित करून घेतल्याशिवाय राहणार नाही.

केसर तर केसर आहेत

टीव्ही9 नेटवर्कने हा महोत्सव सुरू करून जगभरातील व्यापाऱ्यांना एक कॉमन प्लॅटफॉर्म निर्माण करून दिला आहे. या महोत्सवातील केसर सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. ईराणच्या स्टॉलवरचे हे खास प्रकारचे केसर मोहून टाकत आहेत. जगातील चार देशांमध्ये केसर सर्वाधिक पसंत केले जाते. त्यापैकी भारत एक आहे. भारताच्या काश्मीरमधील केसर आणि ईराणी केसरला जगभरात मोठी मागणी आहे. मात्र, तुम्हाला हे केसर थेट दिल्लीत भरलेल्या या महोत्सवात सहज उपलब्ध होणार आहे.

अफगाणिस्तानातील सुकामेवा

अफगाणिस्तानसोबत भारताचं सांस्कृतिक नातं आहे. भारता आणि अफगाणिस्तानची संस्कृती, इतिहास एकमेकांशी संलग्न आहे. टीव्ही9च्या या फेस्टिव्हल ऑफ इंडियामध्ये अफगाणिस्तानच्या व्यापाऱ्यांनाही इथे येण्याची संधी देण्यात आली आहे. या अफगाणिस्तानच्या व्यापाऱ्यांनी या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे ड्रायफ्रुट्स या ठिकाणी विक्रीला ठेवले आहेत. अफगाणिस्तानचे ड्रायफ्रूट्स तर जगभरात प्रसिद्ध आहेत. उच्च गुणवत्तेसाठी हे ड्रायफ्रूट्स ओळखले जातात. विशेष करून पाकिस्तान, भारत, मध्य पूर्व, यूरोप आणि उत्तर अमेरिकेत या ड्रायफ्रूट्सची प्रचंड मागणी असते. तसेच हेच ड्रायफ्रुट्स अफगाणिस्तानच्या अर्थव्यवस्थेचा कणाही आहेत.

दांडियाचं आयोजन

या फेस्टिव्हलमध्ये मिटेल्स स्नॅक्सचाही एक स्टॉल आहे. भारतीय सैन्याने मिलेट्सला जवानांच्या भोजनात समाविष्ट करण्याचा नुकताच निर्णय घेतला आहे. सैनिकांचं आरोग्य चांगलं राहावं या हेतूने हा निर्णय घेतला आहे. मिलेट्सची गुणवत्ता पाहता या प्रदर्शनात मिलेट्सचाही एक खास स्टॉल लावण्यात आला आहे. या कार्यक्रमात दुर्गादेवीची पूजा अर्चा करण्यासाठी एक खास पंडाल उभारण्यात आला आहे. या महोत्सवात अनेक रंगारंग कार्यक्रम होणार आहेत. दांडिया नृत्याचं आयोजनही यावेळी करण्यात आलं आहे.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.