AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काय साड्या, काय अत्तर, काय खेळणी… संमदं ओक्केमध्ये… ‘टीव्ही9 महोत्सवा’ला प्रचंड गर्दी

नवी दिल्लीकरांना पुन्हा एकदा देशविदेशातील कला आणि संस्कृतीचा अनोखा संगम पाहायला मिळणार आहे. टीव्ही9 नेटवर्कने इंडिया फेस्टिव्हलचं आयोजन केलं आहे. आजपासून 13 ऑक्टोबरपर्यंत म्हणजे तब्बल पाच दिवस हा फेस्टिव्हल चालणार आहे. त्यामुळे दिल्लीकरांसाठी एक मोठी पर्वणीच ठरणार आहे. दुपारी या फेस्टिव्हलला सुरुवात झाली आणि नागरिकांनी फेस्टिव्हलला भेटण्यासाठी मोठी गर्दी करण्यासही सुरुवात केली आहे.

काय साड्या, काय अत्तर, काय खेळणी... संमदं ओक्केमध्ये... ‘टीव्ही9 महोत्सवा’ला प्रचंड गर्दी
TV9 Festival of India Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 09, 2024 | 5:07 PM
Share

दिल्लीच्या मेजर ध्यानचंद स्टेडियममध्ये टीव्ही9 नेटरवर्कचा इंडिया फेस्टिव्हल सुरू झाला आहे. दुर्गा पूजेच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेला हा महोत्सव पाच दिवस चालणार आहे. या महोत्सवात केवळ देशातीलच नव्हेतर विदेशातूनही व्यापारी आले आहेत. देशातीलच नव्हे तर परदेशातील व्यापाऱ्यांचे मिळून एकूण 250 स्टॉल्स या महोत्सवात लावण्यात आले आहेत. लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाटी एकापेक्षा एक सुंदर दागिने, पर्स, साडी, सूट या ठिकाणी उपलब्ध आहेत. बुजुर्गांसाठी गुडघ्यांच्या दुखण्यासाठी थायलंडचा बाम, घर सजवण्यासाठी एकापेक्षा एक वस्तू या ठिकाणी मिळणार आहेत. आजपासून सुरू झालेल्या या फेस्टिव्हलचा समारोप 13 ऑक्टोबर रोजी होणार आहे. आज दुपारी 12 वाजता दुर्गा पूजेनंतर हा महोत्सव सुरू झाला असून पहिल्याच दिवशी महोत्सवाला प्रचंड गर्दी झाली आहे.

दुर्गा पूजा आणि दसऱ्यासाठी कुटुंबासह फिरायला जाण्याचा प्लान करणार असाल तर दिल्लीतील मेजर ध्यानचंद स्टेडियमला जरूर भेट द्या. नवरात्रीच्या निमित्ताने इंडियन फेस्टिव्हलची आज विधिवत सुरुवात झाली आहे. या फेस्टिव्हलमध्ये मुलांच्या आवडीनिवडींवर विशेष लक्ष देण्यात आलं आहे. त्यातील स्लॉटमध्ये दिल्लीचा मॅजिक इन्स्टॉल आहे. रुमालातून गायब करने, रुमालातून पाणी पडू न देणं, दोरी कापून तिची गाठ गायब करने अशा अनेक गोष्टी या जादूतून दाखवण्यात आल्या आहेत. या स्टॉलवर तुम्ही एका जादूई किटमधून जादू शिकू शकता. आणि या जादूई किटद्वारे मुलांचं मनोरंजनही करू शकता.

tv9 festival of India

tv9 festival of India

आला तर साड्या न्याव्या लागतात लगा

आसाममधून आलेल्या साड्यांना महिलांची खास पसंती आहे. हे सर्व हँडलूम प्रोडक्ट आहे. या साड्यांवर कास्तकरी अत्यंत चांगली दाखवण्यात आली आहे. या साड्या फक्त एक हजार रुपयांपासून 18 हजार रुपयांपर्यंतच्या आहेत, असं आसाममधील व्यापारी चेतन यांनी सांगितलं.

पिकनिकला जाताय? ही चटई न्याच राव!

कुटुंबासोबत जर तुम्ही कुठे पिकनिकला जाण्याचा प्लान करत असाल तर इंडियन फेस्टिव्हलमध्ये अर्बन मेट्सचा स्टॉलवर लाकडाची चटई आहे. या चटईची एक किट घेऊ शकता. ही चटई अत्यंत हलकी आणि गद्देदार आहे. विशेष म्हणजे एका जागेहून दुसरीकडे घेऊन जाण्यास ती सोपी आहे. फक्त 400 ग्रॅमच्या आसपास या चटईचं वजन आहे. ही चटई तुम्ही सहजपणे कुठेही घेऊन जाऊ शकता, असं अर्बन मेट्सचे विक्रेते टीटी गुलफाम यांनी सांगितलं.

अत्तराच्या स्टॉलवर या तर खरं…

या ठिकाणी एक दुबईचा व्यापारी आला आहे. जुहेद खान असं त्याचं नाव आहे. मी पहिल्यांदाच इंडियन फेस्टिव्हलमध्ये माझा स्टॉल लावत आहे. मला चांगला रिस्पॉन्स मिळत आहे. आम्ही अत्तराच्या वेगवेगळ्या व्हरायटी या ठिकाणी ठेवल्या आहेत. या अत्तरांची किंमत 500 रुपयांपासून सुरू होते. या ठिकाणी आम्ही फ्रेंच आणि दुबईचे अत्तरही ठेवले आहेत, असं जुहेद खान यांनी सांगितलं. विशेष म्हणजे जुनेद हे बसल्या जागी अत्तर बनवून देत आहेत.

ड्रायफ्रूट्सची रेलचेल

या शिवाय थायलंडचा एक व्यापारी वसीम खान महिला आणि मुलांसाठी खास वस्तू घेऊन आला आहे. वसीमच्या स्टॉलवर अगणित खेळणी आहेत. एकदा या स्टॉलला भेट दिली तर तुमचा पायही निघणार नाही, इतकी व्हरायटी या ठिकाणी मिळत आहे. अफगाणिस्तानचा व्यापारी मायीम सुल्तानी यांनी आणलेलं ड्रायफ्रुट्सही लोकांच्या आकर्षणाचं केंद्र आहे. गेल्यावर्षीही सुल्तानी यांनी या फेस्टिव्हलमध्ये स्टॉल लावला होता. त्यावेळी त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे त्यांनी या वर्षीही आपला स्टॉल लावला आहे. अंजीर, बादाम, खजूर, काजू, किशमिश आदींची विक्री त्यांनी सुरू केली आहे. त्यांच्याकडील शाही मेमरो अत्यंत खास आहे. त्यात तेलाचं प्रमाण अधिक असल्याने थोडं महागडं आहे.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.