नरेंद्र मोदी भारताचे मोठे ब्रँड ॲम्बेसेडर; केंद्रीय पर्यटन मंत्री जी किशन रेड्डी ; ताजमहालाचे कोणतेही काम आमच्या अजेंड्यावर नाही
नवी दिल्लीः केंद्रीय पर्यटन मंत्री जी किशन रेड्डी (Union Tourism Minister G Kishan Reddy) देशांतर्गत पर्यटनाबद्दल बोलताना म्हणाले की, भारतीय संस्कृतीच्या दृष्टिकोनातून पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pantpradhan Narendra Modi) हे भारताचे सर्वात मोठे ब्रँड ॲम्बेसेडर (brand ambassador) आहेत. ज्यावेळी पंतप्रधान मोदी यांनी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला त्यावेळी त्यांनी सगळ्यांना सांगितले भारत पाहण्याचे आवाहन केले. याशिवाय पर्यटनाचा जीडीपीमध्ये […]

नवी दिल्लीः केंद्रीय पर्यटन मंत्री जी किशन रेड्डी (Union Tourism Minister G Kishan Reddy) देशांतर्गत पर्यटनाबद्दल बोलताना म्हणाले की, भारतीय संस्कृतीच्या दृष्टिकोनातून पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pantpradhan Narendra Modi) हे भारताचे सर्वात मोठे ब्रँड ॲम्बेसेडर (brand ambassador) आहेत. ज्यावेळी पंतप्रधान मोदी यांनी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला त्यावेळी त्यांनी सगळ्यांना सांगितले भारत पाहण्याचे आवाहन केले. याशिवाय पर्यटनाचा जीडीपीमध्ये 5 टक्के, रोजगारात 10 टक्के वाटा असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. त्याबरोबरच ते म्हणाले की, कोरोनामुळे केवळ भारतातच नाही तर जगभरातील पर्यटनाला मोठा फटाका बसला आहे.
जी किशन रेड्डी यांनी देशांतर्गत पर्यटनाबाबत बोलताना म्हणाले की, देशांतर्गत पर्यटनाबाबत आपण पुढे जात आहोत. सध्या आपल्याकडे 4 लाख विदेशी पर्यटक आले असून विदेशी पर्यटकांमध्येही वाढ होत आहे. यावेळी त्यांनी ताजमहालाविषयी आमच्या पक्षाकडे कोणताही अजेंडा नाही असंही यावेळी त्यांनी स्पष्ट केले.
केंद्र सरकारची सकारात्मक पावले
पर्यटन विकासाबरोबरच त्यांनी सांगितले की, त्याविकासासाठी केंद्र सरकार सकारात्मक अनेक पावले उचलत आहेत, त्याचबरोबर सरकार लवकरच राष्ट्रीय पर्यटन धोरण घेऊन येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. याबाबत राज्य सरकारांबरोबरही याबाबत चर्चा झाली असल्याचेही त्यांनी सांगितले. पर्यटन विकासाबाबत देश-विदेशातील अनेक लोकांबरोबर संवाज साधला जात असल्याचेही त्यांनी सांगितले. पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी मसुदा तयार करण्यात आला असून त्यानंतर पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली तो मसूदा मंत्रिमंडळात ठेवणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या मसुद्यानंतर व मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर पर्यटनाला चालना मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
स्वतंत्र क्रुझमध्ये पर्यटन
जी किशन रेड्डी यांनी सांगितले की, दोन महिन्यांत हे धोरण कॅबिनेटसमोर येणार आहे. या स्वतंत्र क्रुझमध्ये पर्यटन आणि इतर गोष्टींचाही प्रचार केला जाणार आहे. जे सार्वजनिक खासगी भागीदारीला प्रोत्साहन मिळणार आहे. यामध्ये खासगी भागीदारांनी सहभागी व्हावे यासाठी बैठक घेणार आहोत. यामध्ये देश-विदेशातूनही गुंतवणूक यायला हवी. परदेशी दूतावासात पर्यटनाचे काम पाहणाऱ्यांनाही ऑनलाईन प्रशिक्षण दिले जात आहे.
रामायण सर्किट या नावावरच देशात ट्रेन
पर्यटन विभाग पहिल्यांदाच रेल्वे विभागाबरोबर एकत्रित काम करत आहे. रामायण सर्किटवरही काम केले जात आहे. त्यानुसारच रामायण सर्किट या नावावरच देशात ट्रेन चालवल्या जाणार आहेत, ज्या ट्रेन भारतभर फिरणार आहेत त्या रेल्वेना भारत गौरव असं नाव दिले जाणार असल्याची माहितीही देण्यात आली आहे. या रेल्वेच्या माध्यमातूनच भगवान श्रीरामाची जी ठिकाणं आहेत, त्या ठिकाणं या माध्यमातून पाहता येणार आहेत. देशातील विविध भागात या रेल्वे सफर करणार आहेत. रेल्वेच्या या विकासाबरोबच देशातील विमानतळंही दुप्पटीने वाढली आहेत. आमचे सरकार ईशान्य भारतातील लोकांना इतर भागातील लोकांना जोडण्याचे काम करत आहे. ट्रेन कनेक्टिव्हिटी, रेल्वे कनेक्टिव्हिटी वाढवून ते सर्वांना जोडत असल्याचेही त्यांनी सांगितले.
रेल्वे डब्यात जिम, डायनिंग हॉल
रेल्वे विभागाच्या पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी महत्वाचे पाऊल उचललेले जात असल्याचे सांगत एका डब्यात जिम, डायनिंग हॉल आदींचीही सोय केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी रेल्वेचे अशा पद्धतीचे 3500 डबे बनवण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले. यासाठी आम्ही ईशान्येला ट्रेन कनेक्टिव्हिटीने जोडण्याचे काम करत आहोत आणि ईशान्य भागात अनेक बोगद्यांची कामे सुरू आहेत. हे काम करत असतानाच सगळ्यात महत्वाचे म्हणजे प्रत्येक राजधानी राष्ट्रीय महामार्गाला जोडली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
ताजमहाल, कुतुबमिनारवर काय म्हणाले रेड्डी?
रेड्डी यांनी ताजमहाल, कुतुबमिनार याविषयी बोलताना सांगितले की, या अशा वादावर कोणतेही वादग्रस्त काम आमच्या पक्षाच्या अजेंड्यात नाही. त्यामुळे आम्ही कोणतेही काम गुप्तपणे करत नाही. जसे आपण अयोध्येत रामजन्मभूमी मंदिर बांधत आहोत, मात्र इतर कामाबाबत आम्ही कोणत्याही विषयात अडकणार नसल्याचे सांगत त्यांनी आपल्या पक्षाचा आणि आपल्या कामाची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
