
टीव्ही 9 नेटवर्कच्या What India Thinks Today Summit 2026 या समिटची चौथी आवृत्ती लवकरच आयोजित केली जाणार आहे. 23-24 मार्च रोजी देशाची राजधानी नवी दिल्ली येथे होणाऱ्या या समिटचे मुख्य आकर्षण म्हणजे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मुख्य भाषण असेल. ते या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा या समिटमध्ये सहभागी होत आहेत, यावरूव ‘What India Thinks Today’ या मंचाचे वाढते महत्त्व दिसून येते. येथे देशातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर सखोल चर्चा आणि विचारमंथन केले जाते.
‘What India Thinks Today Summit 2026’ हा समिट भारताच्या आर्थिक महत्त्वाकांक्षा, राजकीय बदल, तांत्रिक प्रगती आणि सामाजिक चिंतन या महत्त्वाच्या टप्प्याचे प्रतिनिधित्व करतो. ‘भारत आणि विश्व’ या विषयावर आधारित हा शिखर संमेलन भारताच्या विकासाच्या प्रवासातील सध्याच्या आणि भविष्यातील संधींचा निष्पक्ष आढावा घेणार आहे. तसेच, विचारवंत, उद्योग क्षेत्रातील नेते आणि सिव्हिल सोसायटीतील अग्रगण्य व्यक्तींच्या सहभागातून विकसित भारताचा आराखडा तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
मागील आवृत्तीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसमावेशक विकासावर आधारित नव्या भारताची दृष्टी मांडली होती. या परंपरेनुसार, विविध क्षेत्रांतील प्रतिष्ठित आणि प्रभावशाली व्यक्ती या समिटमध्ये सहभागी होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुख्य भाषणासोबतच केंद्रीय मंत्री पियूष गोयल, ज्योतिरादित्य सिंधिया आणि अश्विनी वैष्णव हे देखील उपस्थित राहणार आहेत.
तसेच, विविध राज्यांचे मुख्यमंत्रीही या चर्चेत सहभागी होण्याची अपेक्षा आहे, ज्यामध्ये मोहन यादव (मध्य प्रदेश), पुष्कर सिंह धामी (उत्तराखंड), भजन लाल शर्मा (राजस्थान), नायब सिंह सैनी (हरियाणा), भगवंत मान (पंजाब) आणि डीके शिवकुमार (कर्नाटक) यांचा समावेश आहे.
या शिखर संमेलनात इतर प्रमुख राजकीय नेत्यांमध्ये स्मृती इराणी, अखिलेश यादव आणि असदुद्दीन ओवैसी यांचा समावेश आहे. तसेच जागतिक स्तरावरील मान्यवरांमध्ये प्रो. राम चरण आणि मार्कस वामबाक तसेच बर्नड ओ. होर्मन (MHP India – A Porsche Company चे ग्रुप COO आणि CEO) यांचाही सहभाग अपेक्षित आहे.