News9 Global Summit: महिलांसाठी TV9 चा हा उपक्रम कौतुकास्पद, दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्याकडून ‘न्यूज9 ग्लोबल समिट यूएई एडिशनचे कौतुक

दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता TV9 न्यूज नेटवर्कच्या 'न्यूज9 ग्लोबल समिट' या यूएईतील समिटला उपस्थित होत्या. यावेळी त्यानी TV9 च्या महिलांसाठीच्या या उपक्रमाचे खास कौतुक केले.

News9 Global Summit: महिलांसाठी TV9 चा हा उपक्रम कौतुकास्पद, दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्याकडून न्यूज9 ग्लोबल समिट यूएई एडिशनचे कौतुक
rekha gupta
| Updated on: Aug 27, 2025 | 9:29 PM

TV9 न्यूज नेटवर्कने ‘न्यूज9 ग्लोबल समिट’चे यूएईत आयोजन केले आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता या समिटला ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होत्या. आपल्या भाषणात रेखा गुप्ता यांनी महिला सक्षमीकरणाला संभाषणातून जागतिक चळवळीत रूपांतरित करण्याची गरज असल्याचे विधान केले. तसेच त्यांनी ‘SHEeconomy Agenda’ अंतर्गत निर्णायक पावले उचलण्याचेही आवाहन केले.

पुढे बोलताना मुख्यमंत्री रेखा गुप्ता म्हणाल्या की, ‘अबू धाबीमध्ये TV9 नेटवर्कने आयोजित केलेला महिला सन्मान कार्यक्रम खूप कौतुकास्पद आहे. यात अनेक यशस्वी महिलांनी सहभाग घेतला आहे. महिलांच्या सन्मानार्थ असा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल मी TV9 नेटवर्कचे एमडी आणि सीईओ बरुण दास आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे मनापासून अभिनंदन करते. मी सर्वांना शुभेच्छा देते आणि आशा करतो की पुढील काळात महिला समाजाचा अभिमान वाढवतील आणि यामुळे त्यांचा आदरही होईल.

रेखा गुप्ता यांचा प्रवास प्रेरणादायी

दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता या अनेकांसाठी प्रेरणा आहेत. त्यांनी विद्यार्थी नेत्या म्हणून आपल्या कामाला सुरुवात केली होती. मेहनत आणि अथक परिश्रमाच्या जोरावर त्या दिल्लीच्या मुख्यमंत्री बनणाऱ्या तिसऱ्या महिला ठरल्या. हे केवळ राजकारण नव्हे तर महिलांना प्रशासनाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल होते.

रेखा गुप्ता यांच्या मुख्य भाषणाने अबू धाबीमध्ये सकारात्मक वातावरणाची निर्मिती झाली. या समिटला लेमर कॅपिटलने स्पॉन्सर केले आहे, तसेच Shunya.AI हे को-स्पॉन्सर होते. त्याचबरोबर FICCI बिजनेस पार्टनर, IPF डायस्पोरा पार्टनर आणि हार्वर्ड बिझनेस स्कूल GCC माजी विद्यार्थी क्लब माजी एल्युमनी पार्टनर होते.

न्यूज 9 ग्लोबल समिटमध्ये या मान्यवरांची उपस्थिती

टीव्ही 9 नेटवर्कचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ बरुण दास, जे या समिटचे मॉडरेटर देखील आहेत. त्यांनी SHEeconomy ला आधुनिक विकासाचे प्रमुख स्वप्न म्हणून वर्णन करून कार्यक्रमाची सुरुवात केली. भारताचे युएईमधील राजदूत संजय सुधीर हेही या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी प्रसिद्ध अभिनेत्री रिचा चढ्ढा यांना SHEstar Award for Cinema ने सन्मानित करण्यात आले. इतर प्रमुख मान्यवरांमध्ये लेमर कॅपिटलमधील वेल्थ लीडर अंकुर अत्रे, गेलमधील एचआर स्ट्रॅटेजिस्ट आयुष गुप्ता आणि SILQ परमनंट मेकअपमधील ब्युटी एंटरप्रेन्योर सँड्रा प्रसाद यांचा समावेश होता.