AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हैदराबाद बलात्कार आरोपींचा एन्काऊंटर, उदयनराजेंकडून आधी अभिनंदन, नंतर ट्वीट डिलीट

उदयनराजे भोसले यांनी ट्वीट करुन तेलंगण पोलिस दलाचं अभिनंदन केलं होतं, परंतु हे ट्वीट त्यांनी काही वेळातच डिलीट केलं.

हैदराबाद बलात्कार आरोपींचा एन्काऊंटर, उदयनराजेंकडून आधी अभिनंदन, नंतर ट्वीट डिलीट
Anish Bendre
Anish Bendre | Updated on: Dec 06, 2019 | 10:19 AM
Share

मुंबई : हैदराबादमधील डॉक्टर तरुणीवरील सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चारही आरोपींचा एन्काऊण्टर करण्यात आला. हैदराबाद पोलिसांच्या तावडीतून आरिफ, शिवा, नवीन आणि चिन्ना केशवुलू हे चारही आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करत होते, त्यावेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ते जागीच ठार झाले. त्यानंतर माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी ट्वीट करुन (Udayanraje on Hyderabad Rape Case) तेलंगण पोलिस दलाचं अभिनंदन केलं होतं, परंतु हे ट्वीट त्यांनी काही वेळातच डिलीट केलं.

‘हैदराबाद बलात्कार प्रकरणात ताब्यात घेण्यात आलेले 4 आरोपी पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये मारले गेले. तेलंगणा पोलिस दलाचे मनःपूर्वक अभिनंदन!’ असं ट्वीट उदयनराजे यांनी सकाळीच केलं होतं. परंतु काही वेळातच त्यांनी हे ट्वीट डिलीट केलं. ट्वीट डिलीट करण्याचं नेमकं कारण काय असावं, हे अद्याप समजलेलं नाही.

हैदराबाद पोलिस चारही आरोपींना 5 डिसेंबरच्या मध्यरात्री साडेतीन वाजता घटनास्थळी घेऊन गेले होते. गुन्ह्याच्या पद्धतीची पुनर्निर्मिती करत असताना चौघांनी पोलिसांच्या हातावर तुरी देत पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांनी आरोपींवर गोळ्या झाडल्या. गोळीबारात चौघांचाही जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.

ज्या ठिकाणी गुन्हा घडला, तिथून जवळच हैदराबाद-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर ही चकमक घडली. हैदराबादमधील डॉक्टर तरुणीवर 27 नोव्हेंबरच्या रात्री सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. त्यानंतर चौघांनी तिची हत्या करुन मृतदेह पेटवला होता.

काय आहे प्रकरण?

हैदराबादमधील शासकीय रुग्णालयातील पशुवैद्यक तरुणीवर गेल्या आठवड्यात सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. बलात्कारानंतर तिची हत्या करुन चौघांनी तिचा मृतदेह पेटवून दिला होता. 28 नोव्हेंबरला सकाळी 26 वर्षीय पीडितेचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत सापडला होता. त्यानंतर 29 तारखेला चारही आरोपींना अटक झाली होती. या घटनेविरोधात अख्ख्या देशभरात संतापाची लाट उसळली होती.

माझ्या मुलाला जाळून टाका, हैदराबाद गँगरेप प्रकरणातील आरोपीच्या आईची मागणी

हैदराबादमधील शमशाबाद परिसरात बुधवार 27 नोव्हेंबरला संध्याकाळी डॉक्टर तरुणीला टोल प्लाझाजवळ स्कूटी पार्क करुन जाताना चारही आरोपींनी पाहिलं होतं. त्यावेळी त्यांच्या डोक्यात कट शिजू लागला. त्यांनी तिच्या स्कूटीमधली हवा काढली. रात्री नऊ वाजताच्या सुमारास जेव्हा ती स्कूटी नेण्यासाठी तिथे पुन्हा आली, तेव्हा तिला टायर पंक्चर झाल्याचं लक्षात आलं.

आरोपी मोहम्मद आरिफ तिच्याजवळ मदतीच्या बहाण्याने पोहचला. तर शिवा स्कूटी दुरुस्त करतो, असं सांगून ती दूर घेऊन गेला. त्यानंतर आरिफ, शिवा आणि नवीन तिला बळजबरी एका मोकळ्या जागेवर घेऊन गेले. तिथे तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. स्कूटी दूरवर नेऊन सोडल्यानंतर शिवा परत आला आणि त्यानेही तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर गळा दाबून तिची हत्या केल्याचा आरोप आहे.

डॉक्टर तरुणीवर बलात्कार करण्यापूर्वी आरोपींनी तिला बळजबरी मद्य पाजलं होतं. तिने मदतीसाठी याचना केली, मात्र नराधमांना पाझर फुटला नाही. किळसवाणी बाब म्हणजे तिने प्राण सोडल्यानंतर तिच्या मृतदेहासोबतही आरोपी बलात्कार करत राहिले.

हत्येनंतर आरोपी तिचा मृतदेह ट्रकवर टाकून निघाले. वाटेत पेट्रोल आणि डिझेल विकत घेतलं. रंगारेड्डी जिल्ह्यातील शादनगरमध्ये एका निर्जनठिकाणी त्यांनी तिचा मृतदेह टाकला. त्यानंतर पेट्रोल ओतून तिचा मृतदेह जाळला. दुसऱ्या दिवशी तिचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळल्यानंतर एकच खळबळ उडाली होती.

चौघाही आरोपींच्या आईशी ‘टीव्ही9 भारतवर्ष’ने बातचित केली. त्यावेळी चौघांच्याही मातांनी आपल्या मुलाला कोणतीही शिक्षा द्या, ती आपल्या मंजूर असेल, अशी भूमिका घेतली होती. ‘मलाही एक मुलगी आहे. त्यांनी (आरोपी) त्या पीडित मुलीला ज्याप्रकारे पेटवलं, त्याचप्रमाणेच माझ्या मुलालाही जाळून टाका. मला काही त्रास होणार नाही’ अशी खंबीर भूमिका चिन्ना केशवुलूच्या आईने घेतली होती.

Udayanraje on Hyderabad Rape Case

Follow Us
आम्ही लढणार, जिंकणार आणि लोकशाही वाचवणार इंडिया आघाडीचा निर्धार
India Alliance PC : आम्ही लढणार, जिंकणार आणि लोकशाही वाचवणार इंडिया आघाडीचा निर्धार
साताऱ्याच्या सुपुत्राची सुवर्ण कामगिरी; साहिल जाधवने आशियाई स्पर्धेत..
साताऱ्याच्या सुपुत्राची सुवर्ण कामगिरी; साहिल जाधवने आशियाई स्पर्धेत दोन गोल्ड जिंकून रचला इतिहास!
दुष्काळाची दाहकता संत्रा पिकाला मोठा फटका; शेतकऱ्यांवर मोठं संकट
Dry Drought | दुष्काळाची दाहकता संत्रा पिकाला मोठा फटका; शेतकऱ्यांवर मोठं संकट
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी तातडीने बोलवली विभागप्रमुखांची बैठक; नेमकं
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी तातडीने बोलवली विभागप्रमुखांची बैठक; नेमकं काय घडलं?
मेट्रो कधी सुरू होणार? हिंजवडीच्या IT कर्मचाऱ्यांचा संताप, म्हणाले...
मेट्रो कधी सुरू होणार? हिंजवडीच्या IT कर्मचाऱ्यांचा संताप, म्हणाले...
दुष्काळग्रस्त शेतकरी मदतीवरून रोहित पवार आक्रमक; सरकारला दिला...
दुष्काळग्रस्त शेतकरी मदतीवरून रोहित पवार आक्रमक; सरकारला दिला आंदोलनाचा इशारा
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या...
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या नेत्यांना अटक
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या...
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ, मनसे आक्रमक
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया सुरू
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया पुन्हा सुरू; अतिरिक्त...