माझ्या मुलाला जाळून टाका, हैदराबाद गँगरेप प्रकरणातील आरोपीच्या आईची मागणी

हैदराबाद सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चौघाही आरोपींच्या आईंनी आपल्या मुलाला कोणतीही शिक्षा द्या, ती आपल्या मंजूर असेल, अशी भूमिका घेतली.

माझ्या मुलाला जाळून टाका, हैदराबाद गँगरेप प्रकरणातील आरोपीच्या आईची मागणी
Follow us
| Updated on: Dec 01, 2019 | 4:28 PM

हैदराबाद : हैदराबादमध्ये पशुवैद्यक तरुणीवर सामूहिक बलात्कार करुन तिची हत्या झाल्यानंतर देशभरात तीव्र पडसाद उमटत आहेत. फक्त तेलंगणातच नाही, तर अनेक राज्यांमध्ये या घृणास्पद घटनेविरोधात सर्वसामान्य नागरिक रस्त्यावर उतरले. त्यानंतर आरोपी चिन्ना केशवुलूच्या आईने ‘माझ्या मुलाला जाळून टाका’ अशी मागणी (Hyderabad Rape Accuse Mother) केली आहे.

आरिफ, शिवा, नवीन आणि चिन्ना केशवुलू या चौघा आरोपींना पशुवैद्यक तरुणीवर सामूहिक बलात्कार करुन तिची हत्या केल्याप्रकरणी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यानंतर चौघाही आरोपींच्या आईशी ‘टीव्ही9 भारतवर्ष’ने बातचित केली. त्यावेळी चौघांच्याही आईंनी आपल्या मुलाला कोणतीही शिक्षा द्या, ती आपल्या मंजूर असेल, अशी भूमिका घेतली.

‘मलाही एक मुलगी आहे. त्यांनी (आरोपी) त्या पीडित मुलीला ज्याप्रकारे पेटवलं, त्याचप्रमाणेच माझ्या मुलालाही जाळून टाका. मला काही त्रास होणार नाही’ अशी खंबीर भूमिका चिन्ना केशवुलूच्या आईने घेतली.

‘ही वेदनादायक घटना ऐकून आम्हालाही अतिशय वाईट वाटलं. नवीन माझा एकुलता एक मुलगा आहे. पण त्याला कोणतीही शिक्षा द्या, माझी काही हरकत नाही’ असं नवीनची आई म्हणाली.

‘मी माझा मुलगा तुमच्या आणि देवाच्या हवाली करत आहे. त्यांना पाहिजे ती शिक्षा द्या’ असं शिवाची आई म्हणाली. अशीच भूमिका मोहम्मद आरिफच्या आईनेही घेतली.

डॉक्टर तरुणीचा सामूहिक बलात्कार आणि हत्या, आईची दोषींना जिवंत जाळण्याची मागणी

डॉक्टर तरुणीवर बलात्कार करण्यापूर्वी आरोपींनी तिला बळजबरी मद्य पाजलं होतं. तिने मदतीसाठी याचना केली, मात्र नराधमांना पाझर फुटला नाही. किळसवाणी बाब म्हणजे तिने प्राण सोडल्यानंतर तिच्या मृतदेहासोबतही आरोपी बलात्कार करत राहिले.

बुधवारी संध्याकाळी डॉक्टर तरुणीला टोल प्लाझाजवळ स्कूटी पार्क करुन जाताना चारही आरोपींनी पाहिलं होतं. त्यावेळी त्यांच्या डोक्यात कट शिजू लागला. त्यांनी तिच्या स्कूटीमधली हवा काढली. रात्री नऊ वाजताच्या सुमारास जेव्हा ती स्कूटी नेण्यासाठी तिथे पुन्हा आली, तेव्हा तिला टायर पंक्चर झाल्याचं लक्षात आलं.

आरोपी मोहम्मद आरिफ तिच्याजवळ मदतीच्या बहाण्याने पोहचला. तर शिवा स्कूटी दुरुस्त करतो, असं सांगून ती दूर घेऊन गेला. त्यानंतर आरिफ, शिवा आणि नवीन तिला बळजबरी एका मोकळ्या जागेवर घेऊन गेले. तिथे तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. स्कूटी दूरवर नेऊन सोडल्यानंतर शिवा परत आला आणि त्यानेही तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर गळा दाबून तिची हत्या केल्याचा आरोप आहे.

हत्येनंतर आरोपी तिचा मृतदेह ट्रकवर टाकून निघाले. वाटेत पेट्रोल आणि डिझेल विकत घेतलं. रंगारेड्डी जिल्ह्यातील शादनगरमध्ये एका निर्जनठिकाणी त्यांनी तिचा मृतदेह टाकला. त्यानंतर पेट्रोल ओतून तिचा मृतदेह जाळला. दुसऱ्या दिवशी तिचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळल्यानंतर एकच खळबळ (Hyderabad Rape Accuse Mother) उडाली होती.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.