डॉक्टर तरुणीचा सामूहिक बलात्कार आणि हत्या, आईची दोषींना जिवंत जाळण्याची मागणी

हैदराबाद शहराच्या बाहेरील शादनगर परिसरात एका 26 वर्षीय डॉक्टर तरुणीचा जळालेला मृतदेह सापडला आहे (Gang rape and murder of veterinary doctor in Hyderabad).

डॉक्टर तरुणीचा सामूहिक बलात्कार आणि हत्या, आईची दोषींना जिवंत जाळण्याची मागणी

हैदराबाद : निर्भया प्रकरणानंतरही देशभरात बलात्काराच्या घटना सुरुच आहेत (Gang rape and murder of veterinary doctor in Hyderabad). यात घट तर नाहीच मात्र, वाढच होताना दिसत आहे. कायद्याचा धाकही नसल्याचं या घटनांमधून वारंवार समोर येत आहे. तेलंगणातही माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली. हैदराबाद शहराच्या बाहेरील शादनगर परिसरात एका 26 वर्षीय डॉक्टर तरुणीचा जळालेला मृतदेह सापडला आहे (Gang rape and murder of veterinary doctor in Hyderabad). ही तरुणी कोल्लुरु येथील एका पशु वैद्यकीय दवाखान्यात काम करत होती.

बुधवारी (27 नोव्हेंबर) पीडित तरुणीने शादनगरमधील टोल प्लाझाजवळ आपली स्कुटी पार्क केली आणि कॅबने कामावर पोहचली. रात्री ती जेव्हा स्कुटी लावलेल्या ठिकाणी पोहचली, तेव्हा तिची स्कुटी पंक्चर असल्याचं तिच्या लक्षात आलं. त्यानंतर पीडित तरुणीने आपल्या बहिणीला फोन करत याची माहिती दिली. तसेच आजुबाजूला लोडिंग ट्रक आणि अनोळखी लोक असल्यानं भीती वाटत असल्याचंही सांगितलं.

पीडितेने माहिती दिल्यानंतर तिच्या बहिणीने तिला तात्काळ जवळील टोल प्लाझावर जाण्यास किंवा स्कुटी तेथेच ठेऊन कॅबने येण्यास सांगितले. दरम्यान पीडित तरुणीने काही लोक स्कुटीचा पंक्चर काढण्यासाठी मदत करत असल्याचं आणि नंतर कॉल करते म्हणून सांगितलं. मात्र, त्यानंतर कुटुंबीयांनी अनेकदा फोन करुनही पीडितेचा फोन स्विच ऑफच येत राहिला.

मदत करणाऱ्या ट्रक चालकांवर संशय

शमशाबादचे विभागीय पोलीस आयुक्त प्रकाश रेड्डी म्हणाले, “ब्रिजखाली मिळालेला मृतदेह डॉक्टर तरुणीचा आहे. तिचं शेवटी तिच्या बहिणीशी बोलणं झालं होतं. या बोलण्याचं रेकॉर्डिंग आम्ही ऐकलं आहे. त्याप्रमाणे पीडित तरुणीच्या स्कुटीचा टायर पंक्चर होता. तेथे काही ट्रक चालक उभे होते. ते पीडितेला पंक्चर काढण्यासाठी मदतीसाठी गेले. याच लोकांनी तरुणीची हत्या केली असावी.”

तरुणीचे अंतर्वस्त्र मृतदेहापासून 100 मीटर अंतरावर

पोलिसांच्या सुरुवातीच्या तपासात तरुणीचे अंतर्वस्त्र मृतदेहापासून 100 मीटर अंतरावर आढळली आहेत. त्यामुळे आरोपींनी पीडित तरुणीवर सामूहिक बलात्कार केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास देखील सुरुवात केली आहे. तसेच डॉक्टर तरुणीला कोणी मदत देऊ केली होती याचाही तपास केला जात आहे. पोलिसांनी आज (29 नोव्हेंबर) 4 संशयितांना अटक केली आहे. यात एका ट्रक चालकाचा आणि एका क्लीनरचा समावेश आहे. आरोपींनी पीडितेवर सामुहिक बलात्कार करुन नंतर गळा दाबून हत्या केली. त्यानंतर मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला असावा, असा पोलिसांना संशय आहे.

पोलिसांवर निष्काळजीपणाचा आरोप

या घटनेनंतर पीडित तरुणीच्या आईने पोलिसांवर निष्काळजीपणा केल्याचा आरोप केला आहे. पीडित तरुणीची आई म्हणाली, “माझ्या निरागस मुलीवर अत्याचार करणाऱ्या दोषींना जिवंत जाळावे, अशी माझी इच्छा आहे.’ मुलीचा फोन आल्यानंतर माझी छोटी मुलगी तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशनला पोहचली. मात्र, पोलिसांनी तात्काळ कारवाई करण्याऐवजी तिला ते क्षेत्र आपल्याकडे नसल्याचं सांगत शमशाबाद पोलिस ठाण्याला जाण्यास सांगितलं, असंही पीडितेच्या आईने सांगितलं आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *