युके-जर्मनीचा दौरा प्रचंड यशस्वी, मध्य प्रदेशातील गुंतवणूकीला चांगला प्रतिसाद – मुख्यमंत्री मोहन यादव

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी युके आणि जर्मनीतील दौरात गुंतवणूकदारांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याचे म्हटले आहे. राज्याचा विकास करण्यासाठी आणि युवकांना रोजगार मिळण्यासाठी आपण सतत प्रयत्नशील राहू असेही मोहन यादव यांनी म्हटले आहे.

युके-जर्मनीचा दौरा प्रचंड यशस्वी, मध्य प्रदेशातील गुंतवणूकीला चांगला प्रतिसाद - मुख्यमंत्री मोहन यादव
Follow us
| Updated on: Nov 30, 2024 | 8:53 PM

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ.मोहन यादव यांनी नुकताच युके आणि जर्मनीचा दौरा केला . सहा दिवसांच्या आंतरराष्ट्रीय दौऱ्यात मध्य प्रदेशात गुंतवणूक वाढविण्यासाठी प्रमुख उद्योगपतींशी चर्चा केली. दोन्ही देशांचा दौरा नक्कीच राज्यासाठी फलदायी ठरणार आहे.पुढच्या वर्षी मध्य प्रदेशाची राजधानी भोपाळमध्ये होणाऱ्या ग्लोबल इंन्व्हेस्टर्स समिटसाठी हा दौरा नक्कीच महत्वाचा ठरणार असल्याचे यादव यांनी म्हटले आहे.

युनायटेड किंगडम येथे उद्योग जगतातील प्रमुख हस्तींनी मध्य प्रदेशातील एनआरआय मंडळींशी जोडले गेल्याने आनंद व्यक्त केला आहे. राज्याच्या शिक्षित आणि कुशल विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि जॉब देण्यात येणार असल्याचे मध्य प्रदेशाचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी म्हटले आहे. तसेच आर्थिक समृद्धीत योगदान देण्यासाठी रज्याच्या विकासावर लक्ष केंद्रीत करायला हवे असेही यादव म्हणाले.

दौऱ्याचा काय फलीत ?

– युकेतील गुंतवणकूदारांकडून ६०,००० कोटींहून अधिक गुंतवणूकीचे प्रस्ताव मिळाले

हे सुद्धा वाचा

– कौशल्य विकास भागीदारी आणि तंत्रज्ञान हस्तांतरणावर लक्ष केंद्रित करणे

– विकासाच्या संधी ओळखणे आण त्यावर काम करण्यासाठी प्रत्येक निवडणूक क्षेत्रात विभागीय परिषदा घेतल्यानंतर फेब्रुवारीत भोपळीमध्ये एक जागतिक शिखर परिषदेची तयारी

– पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली परदेश सहकार्याने अनुकूल परिस्थिती बनविण्याचे धोरण

म्युनिच आणि  बव्हेरिया : जर्मनी बरोबर भागीदारी

युद्धानंतर पुन्हा उभारी घेत जर्मनीचे जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था बनणे प्रेरणादायी आहे. मुख्यमंत्री यादव यांनी जर्मनीच्या बरोबर ऐतिहासिक संबंधांना उजाळा दिला. ज्यात संस्कृत आण भारतीय संस्कृतीचे मोठे योगदान देखील सामील आहे.

जर्मनीमधील प्रमुख सहकार्य

1. तंत्रज्ञान आणि उद्योग:

– मध्य प्रदेशातील पायाभूत सुविधा आणि उद्योगांसाठी अभियांत्रिकी आणि यंत्रसामग्रीची प्रगती

– ईलेक्ट्रीक -वाहन तंत्रज्ञान आणि अक्षय ऊर्जा उपक्रम

– सिंचन, अन्न प्रक्रिया आणि कृषी तंत्रज्ञानामध्ये सहकार्य

2. कौशल्य विकास आणि रोजगार:

– बव्हेरियन अधिकाऱ्यांनी जर्मनीत भारतीय कुशल कामगारांची मागणी केली आहे, ज्यामुळे राज्यातील तरुणांसाठी संधी उपलब्ध झाली आहे

– ग्लोबल स्किल पार्कची स्थापना करणे आणि मध्य प्रदेश आणि जर्मन विद्यापीठांमधील भागीदारीला प्रोत्साहन देणे

3. पर्यटन:

– मध्य प्रदेशातील नैसर्गिक सौंदर्य भरपूर असून विस्तीर्ण अभयारण्यातील वाघ, बिबट्या, चित्ता आणि अलिकडे हत्ती यांचा समावेश केलेला आहे, परदेशी पर्यटकांचे एक आकर्षक डेस्टीनेशन बनले आहे. – पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा, हवाई संपर्क आणि उच्च दर्जाची हॉटेल्स, जर्मन पर्यटकांसाठी राज्याला आदर्श बनवतात

हरित ऊर्जा आणि स्थिरता

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय दृष्टीकोणातून अनुरुप हरित ऊर्जा आणि शून्य कार्बन उत्सर्जनाचे ध्यैय प्राप्त करण्यासाठी राज्य प्रतिबद्ध असल्याचे मुख्यमंत्र्‍यांनी म्हटले आहे. मध्य प्रदेशातील अक्षय ऊर्जेचे लक्ष गाठण्यासाठी जर्मनीचे तंत्रज्ञान वापरण्यावर त्यांनी भर दिला आहे.

फुटबॉलच्या माध्यमांतून विकास

मुख्यमंत्र्‍यांनी मध्य प्रदेशातील मिनी ब्राझील म्हटले जाणारे फुटबॉल प्रेमी गाव बिरचापूर गावाची दौऱ्यात उत्साहाने चर्चा केली. जर्मनी फुटबॉल प्रशिक्षकांकडे त्यांनी मध्य प्रदेशात खेळाडूंना प्रशिक्षणासाठी पाठवून फूटबॉलना प्रोत्साहन देण्याच्या योजनेची त्यांनी यावेळी चर्चा केली. फुटबॉल दोन देशांचे संबंध मजबूत करण्याबरोबरच खेळाच्या माध्यमातून युवकांना प्रेरित करण्याचा एक माध्यम बनेल असेही मोहन यादव यांनी म्हटले आहे.

राज्यसभेत काँग्रेस MPच्या बाकाखाली नोटाचं बंडल? सिंघवींनी आरोप फेटाळले
राज्यसभेत काँग्रेस MPच्या बाकाखाली नोटाचं बंडल? सिंघवींनी आरोप फेटाळले.
विधानसभा अध्यक्ष म्हणून नार्वेकरांना पुन्हा संधी मिळणार की पत्ता कट?
विधानसभा अध्यक्ष म्हणून नार्वेकरांना पुन्हा संधी मिळणार की पत्ता कट?.
एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंच्या FBला फॉलो, राजकीय वर्तुळात काय घडतय?
एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंच्या FBला फॉलो, राजकीय वर्तुळात काय घडतय?.
फडणवीस CM होताच सुप्रिया सुळेंनी 'लाडक्या बहिणीं'साठी केली मोठी मागणी
फडणवीस CM होताच सुप्रिया सुळेंनी 'लाडक्या बहिणीं'साठी केली मोठी मागणी.
'तिघांना शुभेच्छा पण आता नाटकबाजी बंद..', शपथविधी होताच जरांगे पेटले
'तिघांना शुभेच्छा पण आता नाटकबाजी बंद..', शपथविधी होताच जरांगे पेटले.
'शपथविधीला निमंत्रण दिल पण..', 'त्यांच्या' अनुपस्थितीवर फडणवीस म्हणाले
'शपथविधीला निमंत्रण दिल पण..', 'त्यांच्या' अनुपस्थितीवर फडणवीस म्हणाले.
महायुती आणि मविआतील दोन नेत्यांची गळाभेट... पुढे काय झालं बघा व्हिडीओ
महायुती आणि मविआतील दोन नेत्यांची गळाभेट... पुढे काय झालं बघा व्हिडीओ.
'कुठं गटाराचं नाव घेताय', चित्रा वाघांची कोणावर जिव्हारी लागणारी टीका?
'कुठं गटाराचं नाव घेताय', चित्रा वाघांची कोणावर जिव्हारी लागणारी टीका?.
उद्यापासून विशेष अधिवेशन, विधानसभेचं हंगामी अध्यक्षपद कोण भूषवणार?
उद्यापासून विशेष अधिवेशन, विधानसभेचं हंगामी अध्यक्षपद कोण भूषवणार?.
'तोंडाला सत्तेचं रक्त लागल्यानं काहींना शिकार सोडाविशी वाटत नाही'
'तोंडाला सत्तेचं रक्त लागल्यानं काहींना शिकार सोडाविशी वाटत नाही'.