देशातलं असं स्टेशन ज्या फक्त महिलाच चालवणार, केंद्रीय मंत्री किशन रेड्डी काय म्हणाले?
अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत बेगमपेट रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास करण्यात आला असून हे स्टेशन पूर्णपणे महिलांकडून चालवलं जाणार आहे. केंद्रीय मंत्री किशन रेड्डी यांनी या उद्घाटनानिमित्त तेलंगणासाठी वाढीव रेल्वे निधी आणि इतर महत्वाच्या योजनांची माहिती दिली. हे स्थानक नारीशक्तीचे प्रतीक असून, देशातील एक महत्त्वाचा प्रयोग आहे.

अमृत भारत स्टेशनच्या अंतर्गत बेगमपेट रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास करण्यात आला आहे. विशेष म्हणजे आता केवळ महिलांद्वाराच हे स्टेशन चालवलं जाणार आहे. देशातील हा एक महत्त्वाचा प्रयोग असणार आहे. आज या पुनर्विकसित स्टेशनचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी केंद्रीय मंत्री किशन रेड्डी यांनी या स्टेशनच्या कार्यावर प्रकाश टाकला. तसेच स्टेशनच्या विकासासाठी आलेल्या खर्चावर आणि सरकारच्या आगामी योजनांवरही रेड्डी यांनी भाष्य केलं. तसेच हे स्टेशनचा कारभार फक्त महिलाच चालवणार असल्याचंही रेड्डी यांनी स्पष्ट केलं.
केंद्रीय मंत्री किशन रेड्डी यांनी यावेळी महत्त्वाचे मुद्दे मांडले. यंदा रेल्वे बजटमध्ये तेलंगणासाठी 5,337 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्याशिवाय 42,219 कोटींच्या योजना सध्या प्रगतिपथावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोमुरवेली रेल्वे स्टेशनच्या निर्मितीला मंजुरी दिली आहे. हे रेल्वे स्टेशन यंदा दसऱ्याच्या वेळी कोमुरवेली मल्लन्ना भक्तांना समर्पित केलं जाणार आहे, असं किशन रेड्डी यांनी सांगितलं.
मोदींच्या नेतृत्वात कामांना सुरुवात
पूर्वीच्या सरकारच्या हलगर्जीपणामुळे एमएमटीएस फेज–2 प्रकल्पाला 6–7 वर्षांची विलंब झाला. राज्य सरकारकडून कोणताही पाठिंबा न मिळाल्यानंतरही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सुमारे 1,000 कोटींच्या खर्चाने एमएमटीएस फेज–2 च्या कामांना सुरूवात झाली. या दगिरीगुट्टासाठी एमएमटीएससाठी मंजुरी देण्यात आली असून 400 कोटींच्या निधीने लवकरच कामे सुरू होतील, असं रेड्डी यांनी स्पष्ट केलं.

Kishan Reddy
केंद्रीय मंत्री किशन रेड्डी यांच्या भाषणातील मुद्दे
राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या 300व्या जयंतीच्या निमित्ताने या स्टेशनचे उद्घाटन होणे हे नारीशक्तीला समर्पित असलेले अभिमानास्पद पाऊल आहे.
संपूर्ण देशभरात 1,300 हून अधिक रेल्वे स्थानकांचे एकत्रित पुनर्विकास सुरू असून ही प्रक्रिया जगात कुठेही अशा प्रमाणात झालेली नाही. ही अभूतपूर्व कामगिरी आहे.
तेलंगणामध्ये 40 रेल्वे स्थानकांचे एकत्रित पुनर्विकास सुरू आहे, जे 2026 पर्यंत स्थानिक संस्कृती आणि परंपरा दर्शवणारे स्वरूप धारण करतील.
सिकंदराबाद रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास ₹720 कोटींच्या निधीने केला जात आहे.
नांपल्ली (हैदराबाद) रेल्वे स्थानकासाठी केंद्र सरकारने ₹350 कोटींचा निधी मंजूर केला आहे. येत्या वर्षी या दोन्ही स्थानकांचे पुन्हा उद्घाटन होणार आहे.
रेल्वे अपघात रोखण्यासाठी वापरण्यात येणारी ‘कवच’ तंत्रज्ञान तेलंगणामध्ये 617 किमी क्षेत्रामध्ये लागू करण्यात आली आहे.
121 मानवरहित फाटक बंद करण्यात आले आहेत आणि 203 नवीन रोड अंडर ब्रिजेस (RUBs), 43 रोड ओव्हर ब्रिजेस (ROBs), व 45 फूट ओव्हर ब्रिजेस (FOBs) बांधण्यात आले आहेत.
काझीपेट येथे ₹580 कोटींच्या खर्चाने रेल्वे उत्पादन युनिट स्थापन करण्यात येत आहे. काही नेत्यांनी यावर टीका केली, पण उद्घाटन समारंभाला उपस्थित राहिले नाहीत.
तेलंगणातील 174 रेल्वे स्थानकांवर हाय-स्पीड वाय-फाय सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. 88 स्टॉल्स देखील उभारण्यात आले आहेत.

Begumpet Railway Station
चारलापल्ली आणि सिकंदराबाद रेल्वे स्थानकाच्या विस्तारासाठी जमिनीचे अधिग्रहण अद्याप प्रलंबित आहे. या कामांची गती वाढविण्यासाठी राज्य सरकारने सहकार्य करावे, अशी विनंती करण्यात आली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली येत्या चार वर्षांत तेलंगणामध्ये रेल्वे क्षेत्रात क्रांतिकारी विकास होणार आहे.
त्यांनी सांगितले की, “फक्त ट्विटरवर टीका करणाऱ्या माजी मंत्र्यांनी वास्तव समजून घ्यावे. गरज भासल्यास मी त्यांना पत्र पाठवीन.”
केंद्र सरकारकडून हजारो कोटी रुपयांचा निधी तेलंगणामधील रेल्वे नेटवर्कच्या विकासासाठी दिला जात आहे.
या प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि सर्व रेल्वे कर्मचाऱ्यांचे मन:पूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.
