उ. प्रदेश धुमसतंय, प्रयागराजमध्ये जुम्म्याच्या नमाजानंतर परिस्थिती नियंत्रणाबाहेर, दगडफेकीत पोलीस अधिकारी जखमी

प्रयागराजमध्ये झालेल्या दगडफेकीत मोठे पोलीस अधिकारी जखमी झाले आहेत. काही घरांमधून पोलिसांवर दगडफेक झाल्याची माहिती आहे. पोलिसांनीही त्या दगडफेकीला प्रत्युत्तर दिले. पोलिसांच्या बंदोबस्तानंतरही जमाव ऐकण्यास तयार नसल्याचे दिसले.

उ. प्रदेश धुमसतंय, प्रयागराजमध्ये जुम्म्याच्या नमाजानंतर परिस्थिती नियंत्रणाबाहेर, दगडफेकीत पोलीस अधिकारी जखमी
Violence in UPImage Credit source: social media
Follow us
| Updated on: Jun 10, 2022 | 4:24 PM

लखनौ– कानपुरात गेल्या शुक्रवारी झालेल्या हिंसाचारानंतर, आज पहिल्यांदा जुम्म्याची नमाज(Jumma prayer in UP)पढण्यात आली. यासाठी संपूर्ण राज्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला होता. मात्र तरीही उ. प्रदेशातील तीन शहरांत नमाजानंतर तीव्र आंदोलन करण्यात आले. प्रयागराजमध्ये हिंसाचार (Violence in Praygraj)झाला आहे. नमाज झाल्यानंतर, जमावाने निदर्शने केली आणि जोरदार दगडफेक केली. परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली, पोलीस अधिकारी जखमी (police officers injured)झाले. पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला. रस्त्यावर हिंसाचार सुरु असल्याची माहितीही मिळते आहे.

दगडफेकीत पोलीस अधिकारी जखमी

प्रयागराजमध्ये झालेल्या दगडफेकीत मोठे पोलीस अधिकारी जखमी झाले आहेत. काही घरांमधून पोलिसांवर दगडफेक झाल्याची माहिती आहे. पोलिसांनीही त्या दगडफेकीला प्रत्युत्तर दिले. पोलिसांच्या बंदोबस्तानंतरही जमाव ऐकण्यास तयार नसल्याचे दिसले. पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. पोलीस अधीक्षकांच्या गाडीचीही तोडफोड करण्यात आल्याची माहिती आहे.

सहारनपूरमध्येही दगडफेक

सहारनपूरमध्येही जुम्म्याच्या नमाजानंतर अल्लाहू अकबर अशी घोषणाबाजी करण्यात आली. दहशतीत आसपासची दुकाने बंद करण्यात आली त्यानंतर या ठिकाणी दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत. हे प्रकरण चिघळतंय हे लक्षात आ्यानंतर राज्याच्या गृहविभागाने प्रत्येक ठिकाणाहून नमाजानंतर काय झाले याचा अहवाल मागवला आहे. सहारनपूरमध्ये हिंसाचार करणाऱ्यांवर पोलिसांना लाठीमार करावा लागला आहे. त्यानंतर मुस्लिम समाजाकडून दगडफेक करण्यात आली. सहारनपूरमध्ये पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीतच मोठा गोंधळ करण्यात आला. आता परिस्थिती नियंत्रणात आहे. ,

हे सुद्धा वाचा

देवबंदमध्येही पडसाद

देवबंदमध्ये मुस्लीम बाजार आणि दुकाने बंद करण्यात आली. रशिदीया मशिदीत जुम्म्याच्या नमाजानंतर अचानक काही मदरशांतील विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी केली, त्यांच्या हातात पोस्टर्स आणि बॅनर्स होते. प्रकरण वाढते आहे हे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी लाठीमार केला, त्यानंतर गोँधळ उडाला. पोलिसांनी या विद्यार्थ्यांना हाकलून लावले.

संपूर्ण राज्यात कडेकोट सुरक्षा

या तिन्ही ठिकाणी हिंसाचाराच्या घटना झाल्याची माहिती आहे. यासह कानपूर, लखनौत कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बारबंकीत दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. यात मुस्लीम समाजातील दुकानदारांचा समावेश आहे. पीलीभीत, उन्नावमध्येही सुरक्षा वाढवण्यात आली आहे. वाराणसीतही कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Non Stop LIVE Update
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.