UP Elections: प्रियंका गांधींनी केला प्रतिज्ञा यात्रांचा शुभारंभ, कोणत्या आहेत कॉंग्रेसच्या सात प्रतिज्ञा?

शनिवारी बाराबंकी येथून तीन प्रतिज्ञा यात्रांचा शुभारंभ केला. या यात्रा पक्षाने 2022 निवडणुकीच्या पार्शवभूमीवर घेतलेल्या प्रतिज्ञा लोकांपर्यंत पोहवण्याच काम करतील.

UP Elections: प्रियंका गांधींनी केला प्रतिज्ञा यात्रांचा शुभारंभ, कोणत्या आहेत कॉंग्रेसच्या सात प्रतिज्ञा?
| Edited By: | Updated on: Dec 24, 2021 | 3:03 PM

मुंबईः येणाऱ्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसने विवीध स्तरावर तयारी सुरू केली आहे. कॉंग्रसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी  (Priyanka Gandhi) यांनी शनिवारी बाराबंकी येथून तीन प्रतिज्ञा यात्रांचा शुभारंभ केला. या यात्रा पक्षाने 2022 (Uttar Presdesh Elections 2022) निवडणुकीच्या पार्शवभूमीवर घेतलेल्या प्रतिज्ञा लोकांपर्यंत पोहचवण्याच काम करतील. (UP elections congress starts pratigya yatra)

यात्रांचा मार्ग

या यात्रा बाराबंकी ते बुंदेलखंड, शरणपूर ते मथुरा आणि वाराणसी ते रायबरेली – ऑक्टोबर 23 नव्हेंबर 1 च्या दर्म्यान होतील. वाराणसी ते रायबरेली यात्रा अवधमार्गे जाईल आणि याचं नेतृत्व खासदार प्रमोद तिवारी करतील. बाराबंकी ते बुंदेलखंड मार्गाचं नेतृत्व खासदार पी पुनीया करतील. तर शरणपूर ते मथुरा यात्रा राज्याच्या पश्चिमेकढून जाईल ज्याचे नेतृत्व पूर्व केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद आणि पक्षाचे नेते आचार्य प्रमोद कृषण्म करतील.

एकूण सात प्रतिज्ञा

पक्षेच्या पहिल्या प्रतिज्ञेत 40 टक्के जागा महिला उमेदवारांना देण्याचा निर्णय घेतलेला आहे. ज्या मुलींनी इंटरमिडीएटच्या परीक्षा उत्तीर्ण केल्या आहेत त्यांना स्मार्ट फोन देण्याचा निर्णयही घेतलेला आहे. एकूण सात ठराव मंजूर केले आहेत.

बाकीच्या ठरावांमध्ये विद्दार्थ्यांना स्कूटी, शेतकरी कर्ज माफी, कोरोना काळातील वीज बील माफी, कोरोना महामारीमुळे आर्थिक फटका बसलेल्या परिवारांना 25,000 रुपये, 20 लाख लोकांना नोकरी इत्यादी निर्णय आहेत.

आज दिल्लीत बैठक

कॉंग्रेसच्या निवडणूक कमिटीची बैठक आज आयोजीत करण्यात आली आहे. या बैठकीत निवडणुकीच्या उमेदवारांच्या नावांची चर्चा होईल. ही बैठक कॉंग्रेस अध्यक्ष सोनीया गांधी यांच्या नवी दिल्लीच्या निवास्थानी होणार आहे. कॉंग्रसने 150 जागांसाठी संभव्य उमेदवारांची नावं काढलेली आहेत. या 150 विधानसभा जागांसाठी कॉंग्रेस नियंत्रण कक्षाने 78 विभाग केले आहेत.

ट्रेनींग कॅंप

क़ॉंग्रेसने एक ट्रेनींग कॅंपदेखील सुरू केला आहे. ट्रेनींग कॅंप- “प्रशिक्षण से पराक्रम तक” या नावाने सुरू केले आहे जिथे कार्यकरते जील्हा आणि ब्लॉक पातळीवर ट्रेनींग घेतिल.

इतर बातम्या 

काँग्रेसचा उत्तराखंडातही पंजाब पॅटर्न?, दलित मुख्यमंत्री देणार?; हरीश रावत यांचं टेन्शन वाढलं

गोव्याचा मुख्यमंत्रीही बदलणार भाजप? शहांच्या घरी बैठक, मुख्यमंत्र्यांच्या दोन संभाव्य नावावरही चर्चा

भीतीच्या वातावरणामुळे 35 हजार उद्योजकांनी देश सोडला; बंगालच्या अर्थमंत्र्यांचा मोठा गौप्यस्फोट

(UP elections congress starts pratigya yatra)