AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भीतीच्या वातावरणामुळे 35 हजार उद्योजकांनी देश सोडला; बंगालच्या अर्थमंत्र्यांचा मोठा गौप्यस्फोट

पश्चिम बंगालचे अर्थमंत्री अमित मित्रा यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. देशातील भीतीच्या वातावरणामुळे 35 हजार उद्योजकांनी देश सोडला आहे. (35,000 Indian entrepreneurs left country under Modi govt, says Amit Mitra)

भीतीच्या वातावरणामुळे 35 हजार उद्योजकांनी देश सोडला; बंगालच्या अर्थमंत्र्यांचा मोठा गौप्यस्फोट
amit mitra
| Edited By: | Updated on: Oct 22, 2021 | 6:28 PM
Share

कोलकाता: पश्चिम बंगालचे अर्थमंत्री अमित मित्रा यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. देशातील भीतीच्या वातावरणामुळे 35 हजार उद्योजकांनी देश सोडला आहे, असा दावा करतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर संसदेत श्वेतपत्रिका काढली पाहिजे, अशी मागणी अमित मित्रा यांनी केली आहे.

अमित मित्रा यांनी ट्विट करून हा गौप्यस्फोट केला आहे. 2014 ते 2020 या सहा वर्षाच्या काळात 35 हजार उद्योजक, व्यापाऱ्यांनी देश सोडला आहे. भीतीच्या वातावरणामुळेच उद्योजक आणि व्यापारी देश सोडत आहेत, असं मित्रा यांनी सांगितलं. देश सोडून गेलेले हे सर्व उद्योजक हाय नेटवर्थ इंडिव्हिज्युअल म्हणजे श्रीमंत लोक आहे. आता ते अनिवासी भारतीय बनले आहेत, असंही त्यांनी सांगितलं.

देश सोडणाऱ्यांमध्ये भारत नंबर वन

मित्रा यांनी सलग ट्विट करून दावा केला आहे. जगात पलायन करणाऱ्यांमध्ये भारत नंबर वन आहे. कारण काय? देशात भीतीचं वातावरण आहे? पंतप्रधानांनी आपल्या सत्ताकाळातील या उद्योजकांच्या पलायनवर एक श्वेतपत्रिकाच काढली पाहिजे, असं एका ट्विटमध्ये त्यांनी म्हटलं आहे.

देश सोडणाऱ्यांची आकडेवारी

तर, मोर्गन स्टॅनलीच्या एका रिपोर्टनुसार, 2014 ते 2018 दरम्यान 23 हजार हाय नेटवर्थ उद्योजकांनी भारत सोडला आहे. ही जगातील सर्वात वाईट स्थिती आहे. ग्लोबल वेल्थ मायग्रेशनच्या अहवालानुसार, 2019मध्ये 7 हजार आणि 2020मध्ये पाच हजार उद्योजकांनी देश सोडला आहे, असं त्यांनी दुसऱ्या ट्विटमध्ये नमूद केलं आहे.

गोयल यांच्यावर टीका

यावेळी मित्रा यांनी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्यावरही टीका केली आहे. पीयूष गोयल यांचं 19 मिनिटाचं ते भाषण ऐका. त्यात त्यांनी भारतीय उद्योग विश्वाला देश हिताच्या विरोधी असल्याचं म्हटलं आहे. म्हणजे ते त्यांना राष्ट्रविरोधी ठरवत आहेत. अशाच प्रकारच्या भीतीच्या वातावरणामुळे उद्योजक देश सोडून जात आहेत. एवढं घडूनही मोदींनी गोयल यांना फटकारले नाही. कारण काय? असा सवालही त्यांनी केला आहे.

संबंधित बातम्या:

Jammu Kashmir Poonch encounter : पुंछमध्ये गोळीबार सुरुच, 13 वर्षानंतर सर्वाधिक काळ सर्च ऑपरेशन, अतिरेक्यांच्या खात्म्यासाठी सैन्यदलाचं प्लॅनिंग

कोरोनाविरोधातील युद्ध अजून संपलेलं नाही, सण-उत्सवाच्या काळात सतर्क राहा; मोदींचं देशवासियांना आवाहन

Corona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये घट, सक्रिय रुग्णसंख्येतही घसरण

(35,000 Indian entrepreneurs left country under Modi govt, says Amit Mitra)

मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.