AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काँग्रेसचा उत्तराखंडातही पंजाब पॅटर्न?, दलित मुख्यमंत्री देणार?; हरीश रावत यांचं टेन्शन वाढलं

पंजाबपाठोपाठ आता उत्तराखंडमध्येही मुख्यमंत्री बदलाचे वारे वाहताना दिसत आहेत. पंजाबच्या धर्तीवरच उत्तराखंडमध्येही दलित मुख्यमंत्री देण्याचे काँग्रेसकडून संकेत मिळत आहेत. (Yashpal Arya for CM in Uttarakhand)

काँग्रेसचा उत्तराखंडातही पंजाब पॅटर्न?, दलित मुख्यमंत्री देणार?; हरीश रावत यांचं टेन्शन वाढलं
Yashpal Arya
| Edited By: | Updated on: Dec 24, 2021 | 3:22 PM
Share

नवी दिल्ली: पंजाबपाठोपाठ आता उत्तराखंडमध्येही मुख्यमंत्री बदलाचे वारे वाहताना दिसत आहेत. पंजाबच्या धर्तीवरच उत्तराखंडमध्येही दलित मुख्यमंत्री देण्याचे काँग्रेसकडून संकेत मिळत आहेत. काँग्रेसमधील दलित नेते यशपाल आर्य यांचं उत्तराखंडच्या मुख्यमंत्रीपदासाठी नाव स्पर्धेत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी पंजाबचाच फॉर्म्युला उत्तराखंडमध्ये राबविण्याचा निर्णय घेतल्याने मुख्यमंत्रीपदाची आस लावून असलेले माजी मुख्यमंत्री आणि पंजाबचे काँग्रेस प्रभारी हरीश रावत यांचं टेन्शन वाढलं आहे.

दलित नेते यशपाल आर्य आणि त्यांच्या मुलाने भाजपला सोडचिठ्ठी देऊन नुकताच काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे उत्तराखंडमध्ये दलित सीएम होण्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. आर्य यांच्या काँग्रेस प्रवेशामुळे पुन्हा सत्ता कायम राखण्यासाठी धडपड करणाऱ्या भाजपला मोठा झटका बसला आहे. तर मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असलेल्या हरीश रावत यांनाही या निर्णयामुळे मोठा फटका बसला आहे.

तीन बैठकांनंतर चर्चा

गांधी कुटुंबीयांशी चर्चा केल्यानंतर आर्य यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर रावत हे एआयसीसी कार्यालयात पोहोचले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राहुल गांधींनाही आर्य यांना काँग्रेसमध्ये घ्यायचं होतं. त्यानंतर या दोन्ही नेत्यांमध्ये तीन बैठका झाल्या. त्यानंतर आर्य यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. उत्तराखंडमध्ये काँग्रेसला सत्तेत यायचं आहे. त्यामुळेच आर्य यांना पक्षात घेण्यात आलं आहे. दुसरीकडे आम आदमी पार्टीही उत्तराखंडमध्ये प्रवेश करत असून आपले पाय रोवण्याचा प्रयत्न करत आहे.

2013मध्ये आलेल्या विनाशकारी महापुरानंतर विजय बहुगणा यांना पद सोडावं लागलं होतं. त्यानंतर 2014मध्ये हरीश रावत यांच्याकडे राज्याची सूत्रे देण्यात आली होती. 2016मध्ये 9 आमदार भाजपमध्ये गेल्यानंतर रावत यांचं सरकार कोसळलं. त्यावेळी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. नंतर 2017मध्ये निवडणुका झाल्या आणि भाजप सत्तेत आली.

रावत यांना टेन्शन का?

आर्य यांच्यापाठोपाठ भाजपमधून अजून काही नेते काँग्रेसमध्ये येऊ इच्छित आहेत. त्यामुळे रावत यांचं टेन्शन वाढलं आहे. तसेच आर्य हे रावत यांचे प्रतिस्पर्धी असल्याचं मानलं जात आहे. रावत हेच मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असतील असं रावत समर्थकांना वाटत आहे. त्यामुळेच पंजाबच्या प्रभारीपदावरून मुक्त करण्याची मागणी रावत यांनी केली होती. मात्र, सोनिया गांधी यांच्या आदेशामुळे ते या पदावर कायम आहेत.

लोकसभेचा प्लान

पंजाबमध्ये काँग्रेसने चरणजीत सिंग चन्नी यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची सूत्रे दिली. 2024मध्येही काँग्रेस हा फॉर्म्युला वापरण्याची चिन्हे आहेत. उत्तराखंडमध्ये दलितांची संख्या 23 टक्के आहे. तर हरीश रावत हे ठाकूर समुदायातून येतात. उत्तराखंडात ठाकूरांची लोकसंख्या 25 टक्के आहे. त्याकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही. मात्र, पंजाबमध्ये जो डाव टाकला गेला, तोच डाव उत्तराखंडमध्ये टाकण्याच्या मूडमध्ये काँग्रेस आहे.

संबंधित बातम्या:

गोव्याचा मुख्यमंत्रीही बदलणार भाजप? शहांच्या घरी बैठक, मुख्यमंत्र्यांच्या दोन संभाव्य नावावरही चर्चा

वडिलांवर विश्वास ठेवून 12 वर्षांच्या मुलाने दार उघडलं, त्यानंतर त्याने मृत्यूचा थरार डोळ्यादेखत पाहिला

Weather Forecast : परतीचा पाऊस 26 ऑक्टोबरपासून पुन्हा बरसणार, शेतकऱ्यांना सतर्कतेचं आवाहन

(Yashpal Arya for CM in Uttarakhand)

पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप.
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा.
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही.
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब.
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत.
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका.
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?.
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य.
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.