अरेरे! कोरोनाच्या नियमांमुळे पोलिसांकडून 200 किलो जिलेबी आणि 1050 सामोसे जप्त

राज्यासह देशभरात कोरोनाने थैमान घातलं आहे. त्यामुळे पोलिसांकडून कडक कारवाई करण्यात येत आहे (UP Unnao Police seized 2 quintal jalebi and 1050 samosa).

अरेरे! कोरोनाच्या नियमांमुळे पोलिसांकडून 200 किलो जिलेबी आणि 1050 सामोसे जप्त
Follow us
| Updated on: Apr 11, 2021 | 4:25 PM
लखनऊ : राज्यासह देशभरात कोरोनाने प्रचंड थैमान घातलं आहे. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात थोड्याअधिक प्रमाणात कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. मात्र, तरीही बरेच नागरिक कोरोना नियमांचं पालन करताना दिसत नाही. अशा नागरिकांना आता पोलीस आणि प्रशासनाकडून योग्य उत्तर मिळताना दिसत आहे. उत्तर प्रदेशच्या उन्नावमध्ये तर पोलिसांनी नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात धडक कारवाई करत तेथील दोन क्विंटल जिलेबी आणि 1050 समोसे जप्त केले आहेत (UP Unnao Police seized 2 quintal jalebi and 1050 samosa).
नेमकं प्रकरण काय?
उत्तर प्रदेशात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. याच निवडणुकांची रणधुमाळी सध्या तिथे बघायला मिळत आहे. मतदारांना आकर्षित करावं, आपल्या बाजूने त्यांनी मतदान करावं यासाठी उमेदवार अनेक शक्कल लढवत असतात. काही उमेदवार प्रचार करत घरोघरी जाऊन लोकांच्या भेटीगाठी घेतात. तर काही उमेदवार वेगवेगळ्या प्रकारचे आश्वासनं देतात. मतदारांना आकर्षित करण्यासाठी तसाच काहीसा वेगळा प्रयोग उन्नावच्या एका ग्रामपंचायत निवडणुकीला उभ्या असलेल्या एका उमेदवाराने करण्याचा प्रयत्न केला.
हसनगंज ग्रामपंचायतीच्या उमेदवाराचा वेगळा प्रयोग
उन्नावच्या हसनगंज ग्रामपंचायत निवडणुकीला तेथील एका उमेदवाराने मतदारांसाठी जिलेबी आणि समोसे वाटपाचा बेत आखला होता. त्याने तशी तयारी केली. त्याने मोठा मंडप बांधला. चार ते पाच आचारींना जिलेबी आणि समोसे बनवण्याचं निमंत्रण दिले. त्यांनी ते निमंत्रण स्वीकारलं आणि ते कामासाठी आले. आचारींनी मस्तपैकी जिलेबी, समोसे बनवले. जिलेबी आणि समोश्यांचा खमंग सुगंध परिसरात दरवळत होता. वातावरणात सर्वत्र आनंद पसरलेला होता. पण अचानक याबाबतची माहिती पोलिसांना मिळाली.
पोलिसांकडून जिलेबी आणि समोसे जप्त
पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत कारवाई करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी तयार केलेली सर्व जिलेबी जप्त केली. ही जिलेबी जवळपास दोन क्विंटल होती. याशिवाय 1050 समोसे तयार होते. पोलिसांनी संपूर्ण समोसे जप्त केले. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी केलेल्या या कारवाईची सध्या संपूर्ण देशभरात चर्चा आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणताही कार्यक्रम, सणवार जरुर साजरी करावा, पण कोरोना नियमांचंही पालन करावं. नाहीतर अशाचप्रकारे कारवाई होऊ शकते.

हेही वाचा : 5 सेकंदात चितपट ! शिंगावर उचलताच सिंहाला पळता भूई थोडी, व्हिडीओ पाहाच

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.