AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! शेवटी इराणचा संयम सुटला, जर आमच्यावर पुन्हा हल्ला झाला तर आता थेट अणू बॉम्ब.., अमेरिकेला हादरवणारी धमकी

इराण आणि अमेरिकेमध्ये युद्धविराम झाला असला तरी देखील संघर्ष सुरूच आहे. त्यानंतर आता इराणकडून अमेरिकेला मोठी धमकी देण्यात आली आहे, ज्यामुळे संपूर्ण जगभरात मोठी खळबळ उडाली आहे.

मोठी बातमी! शेवटी इराणचा संयम सुटला, जर आमच्यावर पुन्हा हल्ला झाला तर आता थेट अणू बॉम्ब.., अमेरिकेला हादरवणारी धमकी
US-Iran conflictImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 12, 2026 | 8:36 PM
Share

इराण आणि अमेरिकेमध्ये जरी युद्धविराम झाला असला तरी देखील दोन्ही देशांमध्ये अजूनही संघर्ष सुरूच आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणने आधीच स्ट्रेट ऑफ होर्मूज बंद केला होता, त्यानंतर अमेरिकेनं देखील स्ट्रेट ऑफ होर्मूजवर नाकेबंदी केली आहे. दरम्यान स्ट्रेट ऑफ होर्मूज सध्या व्यापारी जहाजांच्या वाहतुकीसाठी बंद असल्यामुळे संपूर्ण जगावर मोठं ऊर्जा संकट निर्माण झालं आहे. त्यातच इराण आणि अमेरिकेमध्ये यु्द्धविराम सुरू असताना देखील एकमेकांच्या जहाजांवर हल्ले सुरूच आहेत. आता एक मोठी बातमी समोर आली असून, इराणने अमेरिकेला हादरवणारी धमकी दिली आहे. इराणच्या संसद प्रवक्त्याने अमेरिकेला इशारा दिला आहे. जर आता अमेरिकेनं आमच्यावर पुन्हा हल्ला केला तर आम्ही आमच्याकडे असलेलं यूरेनियम 90 टक्क्यांपर्यंत शुद्ध करू शकतो, आणि 90 टक्के शुद्ध युरेनियम हे अणूबॉम्बच्या समान मानलं जातं. असा इशारा इराणचे संसद प्रवक्ता इब्राहिम रजाई यांनी अमेरिकेला दिला आहे. यामुळे आता मोठी खळबळ उडाली आहे.

रजाई हे इराणच्या राष्ट्रीय सुरक्षा आणि परराष्ट्र धोरण विभागाचे देखील प्रवक्ता आहे. त्यांनी ट्विट करत अमेरिकेला इशारा दिला आहे. जर अमेरिकेनं आता आमच्यावर हल्ला केला तर आम्ही आमच्याकडे असलेलं युरेनियम 90 टक्के शुद्ध करू शकतो, असं, त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. ही इराणकडून अमेरिकेसाठी आलेली मोठी धमकी माण्यात येत आहे. दरम्यान गेल्यावर्षी इराण आणि इस्त्रायलमध्ये मोठं युद्ध झालं होतं, याच युद्धाच्या दरम्यान अमेरिकेनं इराणच्या अणु तळांवर बॉम्ब हल्ला केला होता. त्यानंतर ट्रम्प यांनी असा दावा देखील केला होता की, इराणच्या अणु तळांचं मोठं नुकसान झालं आहे, युरेनियम साठवण्याची त्यांची क्षमता नष्ट झाली आहे, मात्र त्यानंतर आता पहिल्यांदाच इराणकडून अमेरिकेला मोठी धमकी देण्यात आली आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वी हे युद्ध थांबवाव यासाठी अमेरिकेनं इराणला पुन्हा एकदा पाकिस्तानच्या माध्यमातून एक प्रस्तावर पाठवला होता. त्या प्रस्तावाला उत्तर देण्यासाठी अमेरिकेनं इराणला 48 तासांचा वेळ दिला होता. त्यानंतर इराणने पाकिस्तानच्या माध्यमातून आपला प्रस्ताव अमेरिकेकडे पाठवला आहे. अमेरिकेला आमचा 14 सुत्री कार्यक्रम मान्य करण्याशिवाय पर्याय नाही, असं आता इराणने म्हटलं आहे.

Follow Us
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले...
Video :  शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले ते हजारो कोटी रुपये थेट..राजकारण न करण्याचं आवाहन!
राज्यात दुष्काळ जाहीर होताच आदित्य ठाकरेंचे महत्त्वाचे विधान!
Video: दुष्काळ बाजूला ठेव, बांधावर जाऊन...राज्यात दुष्काळ जाहीर होताच आदित्य ठाकरेंचे महत्त्वाचे विधान!
हंडाभर पाण्यासाठी महिलांचा रोजचा संघर्ष; परभणीत दुष्काळाचं गडद सावट
Parbhani : पहाटे 4 वाजता उठायचं, 2.5 किमी... हंडाभर पाण्यासाठी महिलांचा रोजचा संघर्ष; परभणीत दुष्काळाचं गडद सावट, Video व्हायरल
स्क्रिप्ट रायटर, समुपदेशनाची गरज... शायना एन.सी. यांचा राऊतांवर पलटवार
Shaina NC : स्क्रिप्ट रायटर, समुपदेशनाची गरज म्हणत... शायना एन.सी. यांचा संजय राऊतांवर पलटवार