
युद्धामुळे मध्य पूर्वेत मोठा तणाव निर्माण झाला आहे. इराणने स्ट्रीट ऑफ होर्मूज बंद केल्यानं जगभरात मोठी इंधन टंचाई निर्माण झाली आहे. स्ट्रीट ऑफ होर्मूज बंद असल्यामुळे अमेरिकेवर देखील दबाव वाढला आहे. इराणने पुन्हा एकदा ही सामुद्रधुनी वाहतुकीसाठी सुरू करावी यासाठी अमेरिकेकडून वारंवार इराणला धमकावलं जातं आहे. मात्र आता अमेरिका आणि इस्त्रायलला घाम फोडणारी बातमी समोर आली आहे. या युद्धामुळे आधीच अडचणीत आलेल्या अमेरिकेच्या अडचणी आता आणखी वाढण्याची शक्यता आहे. आता या युद्धात हुती बंडखोरांची एन्ट्री झाली आहे. यमनमधील हुती समुदायाने या युद्धात इराणला पाठिंबा दिला आहे. यामुळे आता इराणची ताकद वाढली आहे.
हुती बंडखोरांनी इराणला या युद्धात आपला पाठिंबा दिला आहे. हुती बंडखोर इराणकडून सैन्य, तसेच आर्थिक मदत घेत असतात, त्याबदल्यात त्यांनी या युद्धात आता इराणला थेट पाठिंबा दिला असून, युद्धात उतरण्याची धमकी दिली आहे. जर इस्त्रायल आणि अमेरिका सोडून दुसरा कोणताही नवा देश या युद्धात उतरला तसेच लाल समुद्राचा उपयोग जर इराणविरोधातील युद्धात करण्यात आला तर आम्ही थेट युद्धात उतरून असा इशारा हुती बंडखोरांनी दिला आहे.
दरम्यान याला इराणच्या सैन्यांकडून देखील पुष्टी देण्यात आली आहे, यमनमध्ये मिसाईल हल्ला झाला आहे. यामुळे यमनच्या बीएर्सशेबा शहरात युद्धाचा अलार्म वाजला आहे. हुती समुदायाने युद्धात केलेल्या हस्तक्षेपामुळे अरबी द्वीपकल्पात आता युद्धाची नवी आघाडी उघडू शकते असं इराणने म्हटलं आहे. दरम्यान हुती बंडखोर जर या युद्धात सक्रिय झाले तर संपूर्ण जगाचं टेन्शन वाढणार आहे.
कारण जर हुती बंडखोर या युद्धात उतरले तर ते सर्वात आधी लाल समुद्रातील बाब-अल-मांदेबची सामुद्रधुनी बंद करतील. ही सामुद्रधुनी बंद केल्यास जवळपास अर्ध्या जगाचा व्यापार पूर्णपणे ठप्प होईल, याचा सर्वात जास्त फटका हा युरोपियन राष्ट्रांना बसेल, आधीच स्ट्रीट ऑफ होमूर्ज बंद आहे, त्यानंतर आता जर बाब-अल-मांदेबची सामुद्रधुनी बंद झाली तर जगभरात मोठा हाहाकार उडण्याची शक्यता आहे.