AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इराणकडून आता हादरवणारी धमकी, जगभरात मोठी खळबळ, अमेरिकेच्या अडचणी वाढल्या

गेल्या चार आठवड्यापासून युद्ध सुरू आहे. इराणकडून आता पुन्हा एकदा मोठी धमकी देण्यात आली आहे, या धमकीमुळे मोठी खळबळ उडाली आहे. अमेरिकेच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

इराणकडून आता हादरवणारी धमकी, जगभरात मोठी खळबळ, अमेरिकेच्या अडचणी वाढल्या
Massoud PejeshkianImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 28, 2026 | 5:29 PM
Share

अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमध्ये गेल्या चार आठवड्यापासून युद्ध सुरू आहे. या युद्धामध्ये इराणचं प्रचंड नुकसान झालं आहे. इराण पूर्णपणे उद्ध्वस्त झालं आहे. तर दुसरीकडे इराणच्या मिसाईल हल्ल्यांमुळे इस्त्रायलला घाम फुटला आहे. इराण या युद्धामध्ये केवळ इस्त्रायल आणि अमेरिकेलाच लक्ष्य करत नाहीये, तर ज्या -ज्या आखाती देशांमध्ये अमेरिकेची सैन्य तळं आहेत, त्या देशांना देखील इराणकडून टार्गेट केलं जात आहे. अशा देशांवर देखील इराणकडून मिसाईल हल्ले सुरू आहेत. दरम्यान आता एक मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे इराणने ज्या -ज्या आखाती देशांमध्ये अमेरिकेची सैन्य तळं आहेत, अशा सर्व देशांना स्पष्ट शब्दात संदेश जारी केला आहे, यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

इराणचे राष्ट्रपती मसूद पेजेश्कियान यांनी म्हटलं आहे की, ज्या -ज्या देशांमध्ये अमेरिकेची सैन्य तळं आहेत, अशा सर्वच देशांना आम्ही लक्ष्य करणार आहोत. साऊदी अरेबिया, कुवेत, कतार, युएई या सारख्या देशांना जर आमच्या हल्ल्यांपासून वाचायचं असेल तर त्यांनी अमेरिकेच्या सैनिकांना आपल्या देशातून बाहेर काढावं. दरम्यान इराणच्या या इशाऱ्यापूर्वी इराणकडून सुरू असलेल्या हल्ल्यांविरोधात आखाती देशांनी नाराजी व्यक्त केली होती, तसेच जर हल्ले सुरू राहिले तर प्रत्युत्तर म्हणून आम्ही देखील हल्ले करू अशी धमकी दिली होती, त्यानंतर आता इराणकडून सर्व आखाती देशांना इशारा देण्यात आला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर इराणाचा इशारा महत्त्वाचा मानला जात आहे.

मसूद पेजेश्कियान यांनी यासंदर्भात आपल्या ट्विटर अकाउंटवर एक पोस्ट केली आहे. ज्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, आम्ही वारंवार हेच सांगत आलो आहोत, की आमच्याकडून पहिला हल्ला होणार नाही. परंतु जर तुम्ही आमच्या आर्थिक केंद्रांना निशाणा बनवण्याचा प्रयत्न केला तर त्याचं प्रत्युत्तर दिलं जाईल. आखाती देशांना आमच्या हल्ल्यांपासून वाचायचं असेल तर त्यांनी अमेरिकेच्या सैन्यांना देशातून बाहेर काढावं.

Follow Us
MPSC विद्यार्थ्यांसाठी राहुल गांधी मैदानात; पुण्यातील आंदोलनस्थळी...
MPSC विद्यार्थ्यांसाठी राहुल गांधी मैदानात; पुण्यातील आंदोलनस्थळी जाणार
पुणे बंदच पडले पाहिजे, अभिजीत दिपकेचं मोठं आवाहन; थेट म्हणाले, फोन करा
पुणे बंदच पडले पाहिजे, अभिजीत दिपकेचं मोठं आवाहन; थेट म्हणाले, फोन करा अन्...
महाविकास आघाडीत बिघाडी? ठाकरे गटाने मित्रपक्षाच्या विरुद्धच उमेदवार
महाविकास आघाडीत बिघाडी? ठाकरे गटाने मित्रपक्षाच्या विरुद्धच उभा केला उमेदवार, सामना'तून दिली माहिती
अजब! चक्क पोलिसांच्या गाडीत बसून आरोपीने बनवली रील, व्हिडिओ तुफान...
अजब! चक्क पोलिसांच्या गाडीत बसून आरोपीने बनवली रील, व्हिडिओ तुफान व्हायरल
निवडणुका 2024 मध्ये झाल्या अन् ज्ञानेश कुमार 2025 मध्ये पदावर आले...
निवडणुका 2024 मध्ये झाल्या आणि ज्ञानेश कुमार 2025 मध्ये पदावर आले, मग... CM फडणवीसांनी समीकरणच मांडलं
खासदार ओमराजे निंबाळकर आले अन् विद्यार्थ्यांनी थेट... पुण्यातील आंदोलन
खासदार ओमराजे निंबाळकर आले अन् विद्यार्थ्यांनी थेट... पुण्यातील आंदोलनादरम्यान नेमकं काय घडलं?
संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल, तरुणांच्या आंदोलनावर म्हणाले...
संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल, तरुणांच्या आंदोलनावर म्हणाले जंतर-मंतरचा पॅटर्न
नितेश राणेंकडून शरद पवार गटातील नेत्याचं कौतुक; म्हणाले, 'मी त्यांना..
नितेश राणेंकडून शरद पवार गटातील नेत्याचं कौतुक; म्हणाले, 'मी त्यांना शत्रू मानत नाही, ते माझे...
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा