AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

FlyDubai Flight प्रकरणात ओमानी वैमानिकाच्या खुलाशाने डोक चक्रावेल, Plan B ऐकाल तर…

Flydubai Flight Incident: फ्लायदुबई प्रकरणाने जगात खळबळ उडाली आहे. या फ्लाईटमधील हल्ला प्रकरणाचा तपास सुरु आहे. या तपासात हा हल्ला ऑक्टोबरमध्ये नाही तर जुलैमध्ये होणार होता पण मग का झाला नाही यामागचे कारणही त्याने सांगितले आहे.

FlyDubai Flight प्रकरणात ओमानी वैमानिकाच्या खुलाशाने डोक चक्रावेल, Plan B ऐकाल तर...
| Updated on: Oct 05, 2026 | 10:27 AM
Share

Flydubai Flight: फ्लायदुबई प्रकरणाने जगात खळबळ उडाली आहे. या फ्लाईटमधील हल्ला प्रकरणाचा तपास सुरु आहे. या तपासात वेगवेगळ्या गोष्टी समोर आल्या आहेत. आता तपासात एक अशी गोष्ट समोर आली आहे ज्याने सर्वांनाच धक्का बसेल. हा हल्ला ऑक्टोबरमध्ये नाही तर जुलैमध्ये होणार होता.

ओमानचा वैमानिक हमाम अल-हमामी याने विमान इस्रायलमधील तेल अवीव येथे नेऊन बेन गुरियन विमानतळावर एखाद्या इमारतीवर किंवा दुसऱ्या विमानावर आदळवण्याची योजना आखली होती. कॅप्टन स्मिट मॉस्किटो यांच्या शौर्यामुळे ही योजना हाणून पाडण्यात आली. माध्यमांच्या वृत्तानुसार, अल-हमामीने अधिकाऱ्यांना दिलेल्या आपल्या जबाबात म्हटले आहे की, “विमान पाडण्याची माझी  योजना मला ऐनवेळी सुचलेली नव्हती. फ्लायदुबईमध्ये नोकरी मिळण्यापूर्वीच त्याने ही योजना आखली होती. मी तेल अवीवला विमानसेवा देणाऱ्या एअरलाइनचा शोध घेतला आणि याच कारणास्तव फ्लायदुबईची निवड केली.”

तपासानुसार, सह-वैमानिकाने कॉकपिटमध्येच कॅप्टन स्मित मछार यांना ठार मारून विमानाचा ताबा घेण्याची योजना आखली होती. उड्डाणादरम्यान त्याने कॅप्टन मछार यांच्यावर हल्ला केल्यामुळे ही योजना अयशस्वी झाली असली तरी, तरीही त्याला हवं ते करता आलेले नाही. असेही वृत्त आहे की, हा हल्ला विमान जॉर्डनवरून उडत असताना झाला. जखमी असूनही, कॅप्टन स्मित कॉकपिटमधून बाहेर पडण्यात यशस्वी झाले. त्यानंतर प्रवाशांनी त्वरीत परिस्थिती नियंत्रणात आणली आणि हल्लेखोराला ताब्यात घेण्यास मदत केली.

अहवालांनुसार, अल-हम्मामीने तपास अधिकाऱ्यांना असेही सांगितले की, “जर मला विमान इस्रायलला उडवता आले नसते तर माझ्याकडे प्लॅन बी होता बेन गुरियन विमानतळावर विमान पाडण्याची माझी योजना होती. जर तेही शक्य झाले नाही, तर जॉर्डनमधील एका अमेरिकी लष्करी तळावर विमान वळवण्याची माझी योजना होती. हा हल्ला खरं तर जुलैमध्ये करण्याचे नियोजित होते, पण काही कारणास्तव तेव्हा तो हल्ला करायाचा राहून गेला.” आणखी तपास सुरु असून आता काय काय माहिती समोर येते याकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे.

Follow Us
MPSC विद्यार्थ्यांसाठी राहुल गांधी मैदानात; पुण्यातील आंदोलनस्थळी...
MPSC विद्यार्थ्यांसाठी राहुल गांधी मैदानात; पुण्यातील आंदोलनस्थळी जाणार
पुणे बंदच पडले पाहिजे, अभिजीत दिपकेचं मोठं आवाहन; थेट म्हणाले, फोन करा
पुणे बंदच पडले पाहिजे, अभिजीत दिपकेचं मोठं आवाहन; थेट म्हणाले, फोन करा अन्...
महाविकास आघाडीत बिघाडी? ठाकरे गटाने मित्रपक्षाच्या विरुद्धच उमेदवार
महाविकास आघाडीत बिघाडी? ठाकरे गटाने मित्रपक्षाच्या विरुद्धच उभा केला उमेदवार, सामना'तून दिली माहिती
अजब! चक्क पोलिसांच्या गाडीत बसून आरोपीने बनवली रील, व्हिडिओ तुफान...
अजब! चक्क पोलिसांच्या गाडीत बसून आरोपीने बनवली रील, व्हिडिओ तुफान व्हायरल
निवडणुका 2024 मध्ये झाल्या अन् ज्ञानेश कुमार 2025 मध्ये पदावर आले...
निवडणुका 2024 मध्ये झाल्या आणि ज्ञानेश कुमार 2025 मध्ये पदावर आले, मग... CM फडणवीसांनी समीकरणच मांडलं
खासदार ओमराजे निंबाळकर आले अन् विद्यार्थ्यांनी थेट... पुण्यातील आंदोलन
खासदार ओमराजे निंबाळकर आले अन् विद्यार्थ्यांनी थेट... पुण्यातील आंदोलनादरम्यान नेमकं काय घडलं?
संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल, तरुणांच्या आंदोलनावर म्हणाले...
संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल, तरुणांच्या आंदोलनावर म्हणाले जंतर-मंतरचा पॅटर्न
नितेश राणेंकडून शरद पवार गटातील नेत्याचं कौतुक; म्हणाले, 'मी त्यांना..
नितेश राणेंकडून शरद पवार गटातील नेत्याचं कौतुक; म्हणाले, 'मी त्यांना शत्रू मानत नाही, ते माझे...
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा