
पहलगाम हल्ल्यात 26 जणांची निष्पाप नागरिकांचा बळी गेल्यानंतर भारताने त्याचं जोरदार प्रत्युत्तर दिलं. पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये असलेले 9 दहशतवादी ठिकाणं उद्ध्वस्त केलं. यानंतर पाकिस्तानकडून नापाक कृत्य सुरु केलं. भारतावर विशेषत: नागरी वस्ती असलेल्या ठिकाणांवर हल्ला केला. पण भारताने प्रत्येक हल्ल्याचं प्रत्युत्तर दिलं. त्यामुळे पाकिस्तानची पळता भूई थोडी झाली होती. भारताचा आक्रमक पवित्रा पाहता पाकिस्तानची सर्वच बाजूने कोंडी झाली होती. दोन्ही देशात तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे युद्ध पेटणार की काय? असं वाटत होतं. पण या दोन्ही देशांमध्ये महासत्ता असलेल्या अमेरिकेने यशस्वी बोलणी केली. दोन्ही देशात सीजफायर झाल्याची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली. यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे जागतिक पातळीवर मध्यस्थी करणारे नेते म्हणून उदयास आले आहेत. भारत पाकिस्तानच नाही तर एकूण पाच युद्धांमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. डोनाल्ड ट्र्म्प यांनी कोण कोणत्या युद्धात तडतोड केली ते जाणून घ्या
रशिया आणि युक्रेन यांच्यात दीर्घकालीन युद्ध सुरु होतं. डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी आल्यानंतर त्यांनी या दोन्ही देशात यशस्वी मध्यस्थी केली. व्हाईट हाऊसमद्ये युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की आणि अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांच्यात आक्रमक चर्चा झाली. त्यानंतर झेलेन्स्की बैठक सोडून निघून गेले. पण त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी झेलेन्स्की यांना कठोर शब्दात सुनावलं. झेलेन्स्की यांनी ही आपली चूक मान्य केली आणि अमेरिकेसोबत करार केला. यानंतर युद्ध थांबवण्यासाठी रशिया आणि युक्रेनमध्ये अनेक करार झाले आहेत.
इस्राईल हा देश छोटा आहे पण आपल्या देशावरील हल्ले परतवून लावण्यात यशस्वी ठरला आहे. पण यावेळी हमासने इस्राईलवर जोरदार हल्ले चढवले. हे सर्व हल्ले इस्राईलने परतवून लावले. इतकंच काय तर फिलिस्तानच्या काही भागांवर जोरदार हल्ले केले. यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी केली. इस्राईलने हल्ले थांबवले. तसेच हमासनेही इस्राईली ओलिसांना सोडवण्यास सहमती दर्शवली.
इस्राईल आणि इराण यांच्यातही युद्ध पेटलं होतं. दोन्ही देशात युद्ध पेटलं होतं. अनेकदा या देशात सीजफायर झालं याच वर्षी एप्रिल महिन्यात इराण आणि इस्राईल आमनेसामने आले होते. या युद्धजन्य स्थितीची तीव्रता पाहून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी केली. त्यामुळे दोन्ही देशातील युद्ध टळलं.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हुती बंडखोरांवर हवाई हल्ले थांबवण्याचे आदेश दिले होते. हुती बंडखोरांनी अमेरिकन अधिकाऱ्यांना लढणार नसल्याचे संकेत दिले होते. यानंतर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हुती बंडखोरांवर हवाई हल्ले करणार नसल्याचं स्पष्ट केलं.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात 7 मे पासून युद्धजन्य स्थिती निर्माण झाली होती. या तणावपूर्ण स्थितीमुळे युद्ध होते की काय अशी भीती वाटत होती. 4 दिवस ही स्थिती होती. अखेर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यशस्वी मध्यस्थी केली. दोन्ही देशांनी सीजफायरची घोषणा केली आहे.