AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताचं टेन्शन वाढलं? डोनाल्ड ट्रम्प यांचं पाकिस्तानबाबत मोठं वक्तव्य, नवी भूमिका काय?

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प वारंवार युटर्न घेताना दिसत आहेत, आता पुन्हा एकदा त्यांनी पाकिस्तानचं कौतुक करताना मोठं वक्तव्य केलं आहे, तसेच त्यांनी यावेळी भारताच्या व्यापारी धोरणावर नाराजी देखील व्यक्त केली आहे.

भारताचं टेन्शन वाढलं? डोनाल्ड ट्रम्प यांचं पाकिस्तानबाबत मोठं वक्तव्य, नवी भूमिका काय?
donald trump
| Updated on: May 19, 2025 | 5:41 PM
Share

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प वारंवार युटर्न घेताना दिसत आहेत, भारत आणि पाकिस्तानमध्ये आपण मध्यस्थी केल्याचा दावा त्यांनी केला होता. त्यानंतर त्यांनी युटर्न घेतला. मी मध्यस्थी नाही तर मदत केल्याचं त्यांनी म्हटलं. दरम्यान आता पुन्हा एकदा ट्रम्प यांनी आपली भूमिका बदलल्याचं पाहायला मिळत आहे, डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानचं तोंडभरून कौतुक केलं आहे. पाकिस्तानचे लोक बुद्धिमान आहेत, ते खूप चांगल्या वस्तू तयार करतात असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. पाकिस्तानच्या निर्यातीवर 29 टक्के टॅक्स लागण्याची शक्यता आहे, या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी पाकिस्ताननचं कौतुक केलं आहे.

मात्र दुसरीकडे ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारताच्या व्यापारी धोरणावरून नाराजी व्यक्त केली आहे. भारत हा जगातील सर्वाधिक कर आकारणारा देश असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. दुसरीकडे त्यांनी भारतासदंर्भात बोलताना मोठा गौप्यस्फोट देखील केला आहे. भारतानं अमेरिकन वस्तूंवरील सर्व कर रद्द करण्याची ऑफर दिली आहे, असा दावा ट्रम्प यांनी केला आहे. पाकिस्तानला अमेरिकेसोबत व्यापार करण्याची इच्छा आहे. पाकिस्तान अमेरिकेला 5 अब्ज डॉलरपेक्षाही जास्त वस्तुंची निर्यात करतो तर अमेरिकेडून केवळ 2.1 अब्ज डॉलरची आयात करतो असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे.

पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला होता, या दहशतवादी हल्ल्यामध्ये 26 जणांचा मृत्यू झाला, त्यानंतर भारतानं पाकिस्तानविरोधात कडक भूमिका घेतली, भारतानं पाकिस्तानवर केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये पाक व्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमधील 9 दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले, यामध्ये 100 पेक्षा अधिक दहशतवादी ठार झाले, त्यानंतर पाकिस्तानने देखील भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव चांगलाच वाढला होता, अखेर डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीमुळे भारत आणि पाकिस्तानने युद्धविरामाची घोषणा केली. तेव्हा देखील ट्रम्प यांनी व्यापाराबाबत असाच एक दावा केला होता, मात्र भारतानं हा दावा फेटाळून लावला, युद्ध विरामामध्ये कुठेही व्यापाराचा संबंध नसल्याचं भारतानं आधीच स्पष्ट केलं आहे.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.