बाराव्या वर्षी घरात घेतली अमेरिकेच्या अध्यक्षपदाची शपथ, सत्तराव्या वर्षी स्वप्न साकार, ट्रम्प यांचा रोमांचक प्रवास

डोनाल्ड ट्रम्प यांच्या शालेय जीवनादरम्यान असं काही घडलं की त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होण्याचा निश्चय केला.

US President Donald Trump, बाराव्या वर्षी घरात घेतली अमेरिकेच्या अध्यक्षपदाची शपथ, सत्तराव्या वर्षी स्वप्न साकार, ट्रम्प यांचा रोमांचक प्रवास

नवी दिल्ली : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे 24 आणि 25 फेब्रुवारीला दोन दिवसीय भारत दौऱ्यावर (US President Donald Trump) आहेत. डोनाल्ड ट्रम्प हे पत्नी मेलानिया, मुलगी इवांका ट्रम्प आणि जावई जेरेड कुशनरसोबत भारत दौऱ्यावर आहेत. यादरम्यान, ट्रम्प यांच्या स्वागतासाठी अहमदाबादमध्ये मोठी तयारी करण्यात आली आहे. मात्र, जगाच्या सर्वात बलाढ्य देशाचे राष्ट्राध्यक्ष होण्याची ट्रम्प यांची कहाणी ते 12 वर्षांचे असतानाच सुरु झाली होती.

डोनाल्ड ट्रम्प यांना खेळाची खूप आवड होती. मात्र, ट्रम्प  (US President Donald Trump) यांच्या शालेय जीवनादरम्यान असं काही घडलं, की त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होण्याचा निश्चय केला. त्यावेळी ट्रम्प केवळ 12 वर्षांचे होते. पहिल्या वर्गापासून ते पदवीपर्यंत ट्रम्प यांचे मित्र असलेले पॉल यांनी ट्रम्प यांच्या आयुष्यातील ती घटना सांगितली आहे.

ट्रम्प यांचा जन्म एक रिअल इस्टेट व्यावसायिक कुटुंबात झाला. लहानपणापासूनच ट्रम्प यांना अभ्यासापेक्षा खेळाची जास्त आवड होती. ट्रम्प यांच्या Kew-Forest शाळेत एक कार्यक्रम होणार होता. ट्रम्प यांची या कार्यक्रमात भाग घेण्याची खूप इच्छा होती. मात्र, ट्रम्प यांच्या खोडकर स्वभावामुळे ट्रायल मॅचमध्ये सर्वोकृष्ट कामगिरी करुनही त्यांना संघात घेतलं गेलं नाही.

ट्रम्प यांना बेसबॉल हा खेळ खूप आवडतो आणि ते चांगले खेळाडू होते. पण जेव्हा त्यांना संघात स्थान देण्यात आलं नाही. तेव्हा ते नाराज झाले. रागाभरलेल्या ट्रम्प यांनी त्याच वेळी निश्चय केला की, “एक दिवस ते खूप प्रसिद्ध होतील, तेव्हा सर्व त्यांचा आदर करतील. मग त्यासाठी अमिरेकेचे अध्यक्ष का नाही व्हावं लागेल”. यानंतर अनेक दिवसांपर्यंत ट्रम्प यांनी टीव्हीसमोर उभं राहत राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेण्याचा सराव केला होता, असं पॉल यांनी सांगितलं.

13 वर्षांच्या वयात ट्रम्प यांना मिलिट्री शाळेत टचाकण्यात आलं. इथे न्यूयॉर्क मिलिट्री अकादमीत त्यांनी अनेक वर्ष कठोर शिस्तीत काढावी लागली (US President Donald Trump). मात्र, तरीही ट्रम्प यांच्यावर यासर्वांचा तितका फरक पडला नाही.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *