'टू प्लस टू' वार्तासाठी अमेरिकेचे संरक्षण आणि परराष्ट्रमंत्री भारतात दाखल, भारती-चीन तणावाच्या मुद्द्यावर होणार चर्चा

भारत-चीन तणाव आणि अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारत आणि अमेरिकेत एक महत्वपूर्ण बैठक होत आहे. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ आणि संरक्षणमंत्री मार्क एस्पर आज नवी दिल्लीत दाखल झाले आहेत. या बैठकीनंतर ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेणार आहेत.

'टू प्लस टू' वार्तासाठी अमेरिकेचे संरक्षण आणि परराष्ट्रमंत्री भारतात दाखल, भारती-चीन तणावाच्या मुद्द्यावर होणार चर्चा

नवी दिल्ली: अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ आणि संरक्षणमंत्री मार्क एस्पर आज नवी दिल्लीत दाखल झाले. भारत-चीन तणाव आणि अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारत आणि अमेरिकेत एक महत्वपूर्ण बैठक होत आहे. भारताकडून संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर हे या बैठकीत सहभागी होणार आहेत. ही ‘टू प्लस टू’ वार्ता उद्या होणार आहे. ( US secretary of state arrives in India for two plus two talks )


भारत आणि अमेरिकेदरम्यान होत असलेल्या या बैठकीवर बोलताना अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ म्हणाले, की दोन वर्षात ही दुसरी ‘टू प्लस टू’ वार्ता आहे. यामुळं भारत आणि अमेरिका यांच्यातील राजनैतिक आणि सुरक्षेच्या मुद्द्यावर चर्चेसाठी कटीबद्ध असल्याचं दिसतं. उद्या दुपारी सव्वा तीन वाजता अमेरिकेचे संरक्षणमंत्री मार्क टी. एस्पर आणि भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यात द्विपक्षीय चर्चा होईल. त्यानंतर संध्याकाळी ७ वाजता दोन्ही देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांची चर्चा होणार आहे.

 ‘टू प्लस टू’ वार्तामध्ये चीनच्या मुद्द्यावरही चर्चा

या ‘टू प्लस टू’ वार्तामध्ये भारत आणि अमेरिकेदरम्यान अनेक विषयांवर चर्चा होणार आहे. त्यात द्विपक्षीय आणि जागतिक मुद्द्यांचाही समावेश असणार आहे. यात प्रामुख्यानं हिंद आणि प्रशांत महासागरात चीनच्या वाढत्या प्रभावावरही चर्चा होणार आहे. त्याचबरोबर पूर्व लडाखमधील चीनचा आक्रमक पवित्राही या चर्चेतील मुद्दा असेल.

माईक पॉम्पिओ आणि मार्क एस्पर आपले समकक्ष राजनाथ सिंह आणि एस. जयशंकर यांच्याशी चर्चा झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेणार आहेत. अमेरिकेचे संरक्षणमंत्री मार्क एस्पर यांना भारतीय सैन्याकडून रायसीना हिल्सच्या साऊथ ब्लॉकमध्ये दुपारी गार्ड ऑफ ऑनर दिला जाणार आहे.

संबंधित बातम्या:

अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष निवडणुकीचा प्रचार शिगेला, ट्रम्प-बायडेन यांचे कोरोना लस मोफत देण्याचे आश्वासन

भारत चीनमधील वाढता तणाव, अमेरिकेचे दोन मंत्री भारत दौऱ्यावर येणार

US secretary of state arrives in India for two plus two talks

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *