AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ई-स्पोर्ट्सला प्रोत्साहन सोबत युजरचा पैसाही सुरक्षित राहणार, गेमिंग कंपन्यांसोबत आयटी मंत्र्यांची महत्वाची बैठक

माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव आणि सरकारी अधिकाऱ्यांनी ऑनलाईन गेमिंग उद्योगाच्या प्रतिनिधींशी आज ऑनलाईन बैठक घेतली. या बैठकीत ई-स्पोर्ट्स आणि सोशल गेमना प्रोत्साहन देण्यावर भर देण्यात आला. युजरच्या पैशांची संरक्षणासह इतर मुद्यांची चर्चा करण्यात आली.

ई-स्पोर्ट्सला प्रोत्साहन सोबत युजरचा पैसाही सुरक्षित राहणार, गेमिंग कंपन्यांसोबत आयटी मंत्र्यांची महत्वाची बैठक
ashwini-vaishnaw
| Updated on: Sep 01, 2025 | 5:15 PM
Share

देशात वेगाने वाढणाऱ्या ऑनलाईन गेमिंग सेक्टरला संदर्भात केंद्र सरकार महत्वाचे पाऊल उचलत आहे. या क्षेत्राला नियंत्रित करताना युजरला कोणतीही हानी पोहचायला नको म्हणून सरकारने सक्रिय पावले उचलली आहेत. या संदर्भात केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ऑनलाईन गेमिंग उद्योगातील प्रतिनिधींनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे एक सोमवारी एक बैठक घेतली. या बैठकीत विशेष करुन ई-स्पोर्ट्स ( म्हणजे इंटरनेटद्वारे खेळले जाणारे स्पर्धेचे खेळ ) आणि मित्रांसोबत खेळले जात असलेल्या सोशल गेम्सच्या विकासावर चर्चा झाली.

अलिकडच्या काळात ऑनलाईन गेम्स अत्यंत लोकप्रिय झाले आहेत. काही लोक यात सट्टा लावून खेळताना त्यांना मोठे नुकसान गोत आहे. याशिवाय काही फसवणूकीची प्रकरणे देखील उघड होत आहेत. त्यामुळे सरकारने या क्षेत्रास नियम लावण्यासाठी महत्वाची पावले उचलली आहेत. या बैठकीत खालील तीन महत्वाच्या मुद्यावर चर्चा करण्यात आली आहे.

ऑनलाईन गेमिंगला सुरक्षित कसे बनवले जाऊ शकते ?

जे वापरकर्ते पैसे लावून खेळत आहेत त्यांच्या पैशाची सुरक्षा कशी केली जाऊ शकते ?

गेमिंग कंपन्या भारतीय कायद्याचे कोणत्या पातळीपर्यंत पालन करीत आहेत ? त्याची पडताळणी कशी केली जाईल ?

सर्वसामान्य जनतेचे नुकसान होऊ नये

केंद्र सरकारचा हेतू या गेमिंग क्षेत्रास प्रोत्साहन देण्यात आहेच परंतू या सोबतयाद्वारे सर्वसामान्य जनतेलाही कोणते नुकसान होऊ नये हे पाहिले जाणार आहे. केंद्रीय मंत्र्यांनी सल्ला दिला आहे की गेमिंग कंपन्यांनी ग्राहकांनी लावलेल्या पैशांची सुरक्षितता निश्चित करण्यासाठी आवश्यक सावधानता बाळगली पाहिजे. अधिकाऱ्यांनी सांगितले की काही कंपन्या आधीपासूनच नवीन नियमांनुसार बदल करत आहेत.

उद्योग कायद्याचे पालन आणि सन्मान राखत, नियमांचे पालन करतानाच जनतेच्या पैशांचे संरक्षण खात्रीने व्हावे याची काळजी घेत जर हा उद्योग पुढे गेला तर त्याचे भविष्य उज्ज्वल होईल असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

हजारो रोजगार पैदा होत आहेत

आज ऑनलाईन गेमिंग सेक्टर देशभरात लाखो युवकांना रोजगार आणि उत्पन्न मिळवून देत आहे. तज्ज्ञांच्या मते जर या सेक्टरला योग्य दिशने पुढे आणले तर तरुणांना आणखी चांगल्या संधी मिळू शकतात. केवळ गेम खेळण्या पुरतेच मर्यादित न राहाता गेम डेव्हलपमेंट आणि तांत्रिक क्षेत्रात देखील हजारो रोजगार यामुळे पैदा होत आहेत.

दुखवटा सुरू असतानाच राजकीय घडामोडींना वेग...
दुखवटा सुरू असतानाच राजकीय घडामोडींना वेग....
संजय राऊत यांचा भाजपवर जोरदार हल्ला; बीजेपी हा मढ्याच्या टाळूवरचं...
संजय राऊत यांचा भाजपवर जोरदार हल्ला; बीजेपी हा मढ्याच्या टाळूवरचं....
सुनेत्रा पवारांचा महाराष्ट्राच्या राजकारणातील निर्णायक प्रवेश
सुनेत्रा पवारांचा महाराष्ट्राच्या राजकारणातील निर्णायक प्रवेश.
Sunetra Pawar : शरद पवार यांना न सांगताच सुनेत्रा पवार मुंबईत
Sunetra Pawar : शरद पवार यांना न सांगताच सुनेत्रा पवार मुंबईत.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत काय म्हणाले शरद पवार ?
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत काय म्हणाले शरद पवार ?.
सुनेत्रा पवारांच्या शपथविधीबाबत मला माहिती नाही - शरद पवार
सुनेत्रा पवारांच्या शपथविधीबाबत मला माहिती नाही - शरद पवार.
Sharad Pawar : सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबद्दल शरद पवारांची पहिली
Sharad Pawar : सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबद्दल शरद पवारांची पहिली.
अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवार राजकारणात पुन्हा सक्रिय
अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवार राजकारणात पुन्हा सक्रिय.
उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवारांच्या नावाची चर्चा; उद्या शपथविधी?
उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवारांच्या नावाची चर्चा; उद्या शपथविधी?.
Ajit Pawar Death Update : बारामतीत अजित पवारांच्या अस्थींचं विसर्जन
Ajit Pawar Death Update : बारामतीत अजित पवारांच्या अस्थींचं विसर्जन.