AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उत्तरकाशीत फाटलं आभाळ, 20 सेकंदात सगळं उद्धवस्त, 60 लोक बेपत्ता ढगफुटीचा Video पाहून काळजाचा थरकाप

Heart breaking video of cloudburst : उत्तराखंडमध्ये आभाळ फाटलं आहे. अचानक पाण्याचा प्रचंड लोंढा आला. त्यात डोंगरातील माती, मलबा वाहून आला. हा थरार व्हिडिओत कैद झाला. यावेळी स्थानिकांच्या किंकाळ्यांना आसमंत व्यापून गेला. काय घडलं तिथं?

उत्तरकाशीत फाटलं आभाळ, 20 सेकंदात सगळं उद्धवस्त, 60 लोक बेपत्ता ढगफुटीचा Video पाहून काळजाचा थरकाप
ढगफुटीने सर्व उद्धवस्त
| Updated on: Aug 05, 2025 | 3:24 PM
Share

उत्तराखंडातील उत्तरकाशीत आभाळ फाटलं. गंगोत्री आणि मुखवा जवळील धराली गावाजवळ ढगफुटी झाली. त्यामुळे गावाला लागून असलेल्या नदीतून पाण्याचा प्रचंड लोंढा मातीच्या मलब्यासह गावात घुसला. हा थरार कॅमेऱ्यात कैद झाला. त्यावेळी गावकऱ्यांच्या किंकाळ्यांनी एकच गोंधळ उडालेला दिसतो. 20 सेंकदात या गावात सगळं कसं उद्धवस्त झालं. 12 लोक मलब्या खाली गाडल्या गेल्याची भीती आहे. तर 60 जण बेपत्ता असल्याचा दावा करण्यात येत आहे. या घटनेने गावकरी घाबरले. गेल्या काही वर्षांत ढगफुटी आणि जमीन खसण्याचे प्रकार वारंवार होत आहे. त्यामुळे अनेक जणांना प्राण गमवावा लागला आहे.

गंगोत्री धामजवळ भीतीचे वातावरण

ढगफुटीमुळे येथील छोट्या नदीत पुराची लाट आली. माती, मलबा मोठ्या प्रमाणात गावात येऊन धडकला. किनाऱ्यावरील घरांना त्याची धडक बसली. अवघ्या 20 सेकंदात सगळ काही उद्धवस्त झाल्याचे दिसून येते. हाती आलेल्या माहितीनुसार, 60 लोक बेपत्ता झालेला आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकाने या नैसर्गिक संकटाची पुष्टी केली आहे. तातडीने याठिकाणी मदत आणि पुनर्वसनची टीम दाखल झाल्याची माहिती समोर येत आहे. गेल्या काही वर्षांपासून वारंवार अशा घटना घडत असल्याने प्रशासन आणि टीम अलर्ट मोडवर असते. पण या घटनेने नागरीक चांगलेच धास्तावले आहे. कसलीही जीवितहानी होऊ नये यासाठी नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

धराली गाव हे गंगोत्री धाम आणि गंगा नदीच्या उगमाच्या अगदी जवळ आहे. या भागात ढगफुटीमुळे लोक भयभीत झाले आहेत. प्रशासनाने नागरिकांना लागलीच सुरक्षितस्थळी जाण्याचे आवाहन केले आहे. अजून मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ नये यासाठी आपत्ती व्यवस्थापनाची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. कोणत्याही प्रकारची मोठी घटना होऊ नये यासाठी प्रशासन अलर्ट मोडवर आहे. नागरिकांनी पाण्याच्या प्रवाहाकडे जाऊ नये असे आवाहन प्रसासनाकडून करण्यात आले आहेत.

सीएम धामी ने जताया दुख

मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी या घटनेवर दुःख व्यक्त केले आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर त्यांनी भावनांना वाट मोकळी करून दिली. धराली येथे ढगफुटी झाल्याने मोठे नुकसान झाले. हे दुःख न पेलवणारं आहे. मदत आणि पुनर्वसन कार्यासाठी SDRF, NDRF, जिल्हा प्रशासन आणि इतर मदत कार्य करणारी पथकं शर्थीने प्रयत्न करत आहेत. मी या घटनेवर लक्ष ठेऊन असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.