भीषण अपघात, रस्त्यावर विखुरलेले मृतदेह, आर्त किंकाळी…ट्रक-टेम्पोच्या धडकेत जागीच 12 ठार

आपल्या माणसांना गमावण्याच मोठ दु:ख होतं. नातेवाईकांनी हंबरडाच फोडला. समोर खूपच वेदनादायी दृश्य होतं. ही घटना पाहणाऱ्यांच्या काळाजाचा थरकाप उडाला. दुर्घटनेचे खूपच भयानक फोटो समोर आले आहेत. ट्रकच्या धडकेने टेम्पोचो तुकडे झाले.

भीषण अपघात, रस्त्यावर विखुरलेले मृतदेह, आर्त किंकाळी...ट्रक-टेम्पोच्या धडकेत जागीच 12 ठार
road accident truck hit tempo
Follow us
| Updated on: Jan 25, 2024 | 1:33 PM

नवी दिल्ली : एक भीषण अपघात झालाय. गुरुवारी सकाळी दाट धुक्यामुळे ट्रक आणि टेम्पोची टक्कर झाली. या अपघातात जागीच 12 लोकांचा मृत्यू झाला. रस्त्यावर सर्वत्र मृतदेह पडलेले होते. समोर खूपच वेदनादायी दृश्य होतं. ही घटना पाहणाऱ्यांच्या काळाजाचा थरकाप उडाला. आपल्या माणसांना गमावण्याच मोठ दु:ख होतं. नातेवाईकांनी हंबरडाच फोडला. उत्तर प्रदेशच्या शाहजहांपुरमध्ये हा भीषण अपघात झाला. अपघातात काहीजण गंभीररित्या जखमी झाले. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलय. अल्लाहगंजच्या फर्रुखाबाद मार्गावर ट्रक आणि टेम्पोचा हा अपघात झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, वेगात आलेल्या ट्रक आणि टेम्पोची समोरासमोर टक्कर झाली. टेम्पोमध्ये असलेले बहुतांश प्रवासी आपल्या प्राणाला मुकले. अपघाताची माहिती मिळताच, पोलीस प्रशासन घटनास्थळी पोहोचलं. पोलिसांनी जखमींना रुग्णालयात पोहोचवलं. सेहरा मऊच्या दक्षिणी भागात हा भीषण अपघात झाला.

टेम्पोचो तुकडे झाले

पोलीस दाखल होण्याआधी त्या मार्गावरुन जाणारे वाहन चालक आणि प्रवाशांनी बचाव कार्य सुरु केलं. दुर्घटनेचे खूपच भयानक फोटो समोर आले आहेत. ट्रकच्या धडकेने टेम्पोचो तुकडे झाले. टेम्पोचे हे विखुरलेले भाग रस्त्यावर पडले होते. भीषण रस्ते अपघातानंतर पोलिसांसह अन्य अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे. जखमींच्या उपचारासाठी अधिकाऱ्यांनी रुग्णालय प्रशासनाला आवश्यक आदेश दिले आहेत.

ट्रकने 100 मीटरपर्यंत नेलं फरफटत

दोन आठवड्यापूर्वी सुद्धा शाहजहांपुरमध्ये भीषण अपघात झाला होता. वेगात येणाऱ्या ट्रकने स्कुटीला चिरडलं होतं. स्कुटीवरील चालक ट्रकच्या चाकाखाली आला होता. 100 मीटर अंतरापर्यंत ट्रकने त्या व्यक्तीला फरफटत नेलं. या अपघातात स्कुटी चालकाचा मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरुन फरार झाला होता.

Delhi Election Result : आपच्या सत्तेला भाजपकडून सुरूंग
Delhi Election Result : आपच्या सत्तेला भाजपकडून सुरूंग.
जोपर्यंत अमित शाह तोपर्यंत शिंदे गट - संजय राऊत भडकले
जोपर्यंत अमित शाह तोपर्यंत शिंदे गट - संजय राऊत भडकले.
दिल्लीत कोणाची सत्ता येणार ? आजी-माजी मुख्यमंत्री पिछाडीवर
दिल्लीत कोणाची सत्ता येणार ? आजी-माजी मुख्यमंत्री पिछाडीवर.
दिल्लीत कांटे की टक्कर, आपचे तीन मोठे चेहरे पिछाडीवर
दिल्लीत कांटे की टक्कर, आपचे तीन मोठे चेहरे पिछाडीवर.
बीडचे SP कॉवत ॲक्शन मोडवर, पोलीस अधीक्षकांची 80 जणांना तंबी, कारण काय?
बीडचे SP कॉवत ॲक्शन मोडवर, पोलीस अधीक्षकांची 80 जणांना तंबी, कारण काय?.
तब्बल 'इतक्या' लाख लाडक्या बहिणी अपात्र, आदिती तटकरेंनी थेट दिला आकडा
तब्बल 'इतक्या' लाख लाडक्या बहिणी अपात्र, आदिती तटकरेंनी थेट दिला आकडा.
कोर्टाचा निर्णय येताच दमानियांची मोठी मागणी, करूणा शर्मांना तातडीने...
कोर्टाचा निर्णय येताच दमानियांची मोठी मागणी, करूणा शर्मांना तातडीने....
लोकलमधून उतरताना ओढणी दुसऱ्याच्या बॅगेत अडकली अन्..., बघा CCTV फुटेज
लोकलमधून उतरताना ओढणी दुसऱ्याच्या बॅगेत अडकली अन्..., बघा CCTV फुटेज.
'त्या काय मला न्याय देणार?' शर्मांची महिला आयोगाच्या अध्यक्षांवर टीका
'त्या काय मला न्याय देणार?' शर्मांची महिला आयोगाच्या अध्यक्षांवर टीका.
'हा निवडणूक आयोगाचा खेळ... इतके मतदार कसे वाढले?', राहुल गांधींचा सवाल
'हा निवडणूक आयोगाचा खेळ... इतके मतदार कसे वाढले?', राहुल गांधींचा सवाल.