
उत्तर प्रदेश सोलर एनर्जी आणि गहू खरेदीत चांगलं काम करत आहे. तसेच येत्या काळात सौर ऊर्जा आणि गहू खरेदीत उत्तर प्रदेश अजून चांगलं काम करेल, असा दावा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला आहे. ग्राहक, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज उत्तर प्रदेशातील पीएम सूर्य घर मोफत वीज योजना, पीएम कुसुम योजना आणि रबी विपणन वर्ष 2025-26च्या अंतर्गत गहू खरेदीची आढावा बैठक घेतली. यावेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जोशी यांचं स्वागत केलं. यावेळी ते बोलत होते.
यावेळी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी उत्तर प्रदेशाच्या चांगल्या कामगिरीचं कौतुक करत योगी आदित्यनाथ यांचं अभिनंदनही केलं. प्रदेश सरकार वाढत्या ऊर्जेच्या मागणीनुसार काम करतानाच संपूर्ण देशासाठी एक मॉडल बनत आहे, असं प्रल्हाद जोशी म्हणाले. यावेळी जोशी आणि आदित्यनात यांनी केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना केल्या.
उत्तर प्रदेशात ऊर्जा क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी निरंतर प्रयत्न सुरू आहेत. त्यामुलेच उत्तर प्रदेशात सौर ऊर्जा निर्मितीला 2022 मध्ये सुरुवात करण्यात आली. या अंतर्गत कमी खर्चाची सौर ऊर्जा सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवल्या गेली. या शिवाय उत्तर प्रदेश जैव ऊर्जा धोरण 2022 आणि उत्तर प्रदेश ग्रीन हायड्रोझन धोरण 2024 सुद्धा सुरू करण्यात आली आहे, असं योगी म्हणाले.
राज्याने सोलर पॉलिसीच्या अंतर्गत 2027 पर्यंत सोलर उत्पादनात 22 हजार मेगावॅटहून अधिक निर्धारित लक्ष्य ठेवलं आहे. त्या अंतर्गत सोलर पार्कांचा विकास, कृषी फिडर आणि खासगी ऑन ग्रीड पंपांच्या सोलरायजेशनला प्रोत्सान देणं, एक्सप्रेसवे आणि रेल्वे ट्रॅकच्या शेजारी सौर ऊर्जा संयंत्रे बसवण्यासाठी प्रोत्साहन देण्यासह सौर ऊर्जा उपकरणांच्या निर्मिती उद्योगाला चालना देणे आणि सौर परियोजनेसाठी ट्रान्समिशन नेटवर्क मजबूत करण्यात येत आहे, असंही त्यांनी सांगितलं.
उत्तर प्रदेशात पीएम सूर्य घर योजनेच्या अंतर्गत 10 लाखाहून अधिक अर्ज आले आहेत. त्यात एक लाखाहून अधिक इन्स्टॉलेशन पूर्ण करण्यात आले आहेत, असंही त्यांनी स्पष्ट केलं. तसेच ज्या ज्या लोकांनी अर्ज केले आहेत, त्यांना एक व्यापक मोहीम हाती घेऊन लवकरात लवकर सौर ऊर्जा एनर्जीशी जोडून घेण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
आता प्रत्येक महिन्याला 11 हजाराहून अधिक इन्स्टॉलेशन केलं जात आहे. यात 2025-26 मध्ये वाढवून सरासरी 22 हजाराहून अधिक करण्यात आलं आहे. जनपदवार, डिस्कॉमवार, नगर निगम, नगर पालिकेला वितरणाचं टार्गेट दिलं आहे. हे काम प्रभावीपणे व्हावं म्हणून त्याचा आढावा घेण्यासाठी सीएम डॅशबोर्डसोबत त्याला इंटीग्रेटेड करण्यात आलं आहे.
पोर्टलवरील मार्च 2025 पर्यंतच्या 10.73 लाख अर्जांना फोन करून वेंडर्स यादी देण्यात आली आहे. तसेच सोलर रुफटॉप बसवण्यात आले आहेत. आवश्यकतेनुसार वेंडर्सची संख्या वाढली आहे. आमचा फोकस ट्रेनिंगवर आहे. अधिकाधिक सूर्य मित्रांना इन्स्टॉलेशनसाठी तयार केलं जावं यासाठी आमचा प्रयत्न आहे. यासाठी पॉलिटेक्निकच्या माध्यमातूनही ट्रेनिंग दिली जात आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.