AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गर्भपाताच्या गोळ्या, रक्तस्त्राव, पीजी गेस्ट हाऊसमध्ये बॉयफ्रेंडच्या रुममध्ये तरुणीसोबत काय घडलं?

प्रेम ही खूप सुंदर भावना आहे. पण प्रेमात काही गोष्टींचं भान, मर्यादा पाळणं गरजेच असतं. नाहीतर होत्याचं नव्हतं व्हायला वेळ लागत नाही. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

गर्भपाताच्या गोळ्या, रक्तस्त्राव, पीजी गेस्ट हाऊसमध्ये बॉयफ्रेंडच्या रुममध्ये तरुणीसोबत काय घडलं?
Representative Image Image Credit source: freepik
| Updated on: Jun 12, 2026 | 12:02 PM
Share

प्रेम ही खूप सुंदर भावना आहे. प्रेमामुळे माणसाच्या मनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. प्रेमातले सुरुवातीचे दिवस तर आयुष्यातली एक सुंदर आठवण असते. तो किंवा ती यांच्यासाठी आपण सगळ्या जगाशी लढायला तयार असतो. पण प्रेमात काही गोष्टींचं भान, मर्यादा पाळणं गरजेच असतं. एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नर्सिंगची विद्यार्थीनी बेशुद्ध अवस्थेत, रक्ताच्या थारोळ्यात प्रियकराच्या खोली बाहेर शिड्यांवर सापडली. तिला तात्काळ जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं. तिथे उपचारा दरम्यान तिचा मृत्यू झाला. या मुलीचा प्रियकर सुद्धा नर्सिंग कॉलेजचा विद्यार्थी आहे. पोलिस त्या मुलाला ताब्यात घेऊन त्याची चौकशी करत आहेत. उत्तर प्रदेशच्या वाराणसी जिल्ह्यात अकथा भागात ही घटना घडली.

अकथा भागात एक पेइंग गेस्ट हाऊस आहे. नर्सिंगची विद्यार्थिनी बेशुद्ध अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पीजीच्या शिड्यांवर सापडल्यानंतर एकच खळबळ उडाली. ही मुलगी नेहमीच पीजीमध्ये राहणाऱ्या बॉयफ्रेंडला भेटायला यायची. मुलगा सुद्धा नर्सिंगचे शिक्षण घेत आहे. युवतीचे वडिल उत्तर प्रदेश पोलीस दलात शिपाई आहेत. घटनास्थळापासून काही अंतरावर एका क्वार्टरमध्ये मुलगी आई सोबत रहायची.

बॉयफ्रेंड समीरला ताब्यात घेतलं

युवती दोन लंच बॉक्स घेऊन घरातून निघाली होती. पीजीमध्ये असं काय घडलं की युवती रक्तबंबाळ अवस्थेत शिड्यांवर सापडली. युवती गर्भवती असल्याने प्रियकराने तिला गर्भनिरोधक गोळ्या दिल्या असाव्यात असा संशय आहे. त्यामुळे तिची तब्येत बिघडली. अधिक रक्तस्त्राव झाल्यामुळे तिचा मृत्यू झाला असावा. पोलिसांनी बॉयफ्रेंड समीरला ताब्यात घेतलं आहे. पोस्टमार्टम रिपोर्टची प्रतिक्षा आहे.

पोस्टमार्टम रिपोर्टची प्रतिक्षा

सारनाथचे ACP विदूष सक्सेना यांनी सांगितलं की, नर्सिंगची विद्यार्थिनी नर्सिंग कॉलेज जवळ पीजीमध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळली. तात्काळ मुलीला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं. पण उपचारादरम्यान डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. डॉक्टरांना शरीरावर कुठेही जखमा आढळल्या नाहीत. पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतरच नेमकं कारण स्पष्ट होईल. पोलिसांनी त्या मुलाला ताब्यात घेऊन त्याची चौकशी सुरु केली आहे.

Follow Us
पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
Pune Dry Day : पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
मला चांगली मराठी येते, भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
Sanjay Dutt | मला चांगली मराठी येते, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा व्हिडिओ बघाच
Lalbaugcha Raja First Look 2026 | ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा संपूर्ण व्हिडिओ बघाच
ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPI...
PM Modi | ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये PM मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPIपर्यंत भारताच्या प्रगतीचा पाढाच वाचला
विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! व्हिडिओ होतोय व्हायरल
Virat Kohli Meets Eknath Shinde | विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! क्रिकेट अन् राजकारणातील दोन दिग्गज एकाच फ्रेममध्ये; व्हिडिओ होतोय व्हायरल
एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले
Yogesh Kadam | एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले; मनोज जरांगेंना केलं आवाहन
जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी....
Manoj Jarange | जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी मिळणार की ब्रेक लागणार?
छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत
CM Devendra Fadnavis | छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत; मुख्यमंत्री फडणवीसांचा नेमका कोणाला टोला?
सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा सदावर्तेंवर पुन्हा घणाघात
Ambadas Danve vs Gunaratna Sadavarte | सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा गुणरत्न सदावर्तेंवर पुन्हा घणाघात; पुढे म्हणाले...
आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता...
Atul Bhatkhalkar On Aaditya | आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता संतापलाच