Uttarkashi Tunnel Rescue | 41 मजुरांच्या सुटकेचा क्षण आला जवळ, थोड्याच वेळात येईल चांगली बातमी

Uttarkashi Tunnel Rescue | मागच्या 12 दिवसांपासून उत्तराखंडच्या उत्तरकाशी सिलक्यारा टनेलमध्ये 41 मजूर अडकले आहेत. या मजुरांच्या सुटकेसाठी अथक प्रयत्न सुरु होते. त्या प्रयत्नांना आता यश येताना दिसतय. काही तासात मजुरांची सुखरुप सुटका झाल्याची बातमी येऊ शकते. सगळ्या देशवासियांच्या नजरा याकडे लागल्या आहेत.

Uttarkashi Tunnel Rescue | 41 मजुरांच्या सुटकेचा क्षण आला जवळ, थोड्याच वेळात येईल चांगली बातमी
Uttarkashi Tunnel Rescue
Follow us
| Updated on: Nov 23, 2023 | 7:59 AM

Uttarkashi Tunnel Rescue | उत्तराखंडच्या उत्तरकाशी सिलक्यारा टनेलमध्ये मागच्या 12 दिवसांपासून 41 मजूर अडकले आहेत. या सगळ्या मजूरांना आज नवीन आयुष्य मिळू शकतं. NDRF ची टीम भुयाराच्या आता पोहोचली आहे. 12 नोव्हेंबरला भुयाराच काम सुरु असताना एक भाग कोसळला, तेव्हापासून हे सगळे मजूर तिथे अडकून पडले आहेत. अथक प्रयत्नानंतर बचावपथक या मजूरांपर्यंत पोहोचलं आहे. त्यामुळे आजचा दिवस या मजुरांसाठी दिवाळीपेक्षा कमी नसेल. महत्त्वाच म्हणजे हे सर्व मजूर सुरक्षित आहेत. या मजुरांचे कुटुंबीय चिंतेत आहेत. त्यांच्या सुरक्षित सुटकेसाठी पूजा-अर्चा, प्रार्थना सुरु आहेत. मंगळवारी या मजुरांचा भुयारातील पहिला फोटो समोर आला होता. त्यावरुन हे सर्व मजूर सुरक्षित असल्याच स्पष्ट झालं. घटनास्थळी सर्व सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. सर्वकाही ठरल्याप्रमाणे सुरळीत पार पडलं, पुढच्या दोन-तीन तासात हे मजूर टनेलच्या बाहेर येतील.

रेस्क्यू ऑपरेशन टीमचे सदस्य गिरीश सिंह रावत यांनी सांगितलं की, रेस्क्यू ऑपरेशन शेवटच्या टप्प्यात आहे. 1-2 तासात रिझल्ट मिळेल, अशी अपेक्षा आहे. मजूरांना बाहेर काढण्यासाठी पाइपलाइन टाकण्यात आली आहे. ढिगाऱ्यामधील स्टीलच तुकडे कापून बाजूला करण्यात आले आहेत. टनेलमध्ये ड्रिलिंगच काम जोरात सुरु आहे. सकाळी 8 वाजेपर्यंत ऑपरेशन पूर्ण होऊ शकतं. घटनास्थळी रुग्णवाहिकेसह सर्व गाड्या आहेत. नॅशनल व्हॅक्सीन व्हॅन सुद्धा तिथे आहे. मागच्या दोन दिवसांपासून सरळ ऐवजी आडव्या ड्रिलिंगची स्ट्रॅटजी आखण्यात आली होती. ढिगाऱ्याचा महत्त्वाचा भाग कापून बाजूला हटवण्यात यश आलय. त्यामुळे मजुरांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग सुकर झाला.

सुटकेची स्ट्रॅटजी काय आहे?

900 एमएमचे पाईप 60 मीटर आतपर्यंत सोडायचे. त्याआधारे मजूर बाहेर येऊ शकतात. आता पाईप मजूरांपर्यंत पोहोचण्यात फक्त काही मीटरच अंतर बाकी आहे. विविध यंत्रणा या रेस्क्यु मिशनमध्ये आहेत. NDRF च्या टीमने संध्याकाळी भुयारात प्रवेश केला. 12 रुग्णावाहिका, 15 डॉक्टर्सची टीम आणि 40 बेडच हॉस्पिटल सुसज्ज आहे. अमेरिकन बनावटीची ऑगर मशीन शुक्रवारी दुपारी टणक पुष्ठभागाला धडकली. त्यानंतर ड्रिलिंग बंद करण्यात आलं होतं. ड्रिलिंग थांबवताना 22 मीटरपर्यंत ढिगारा हटवून त्यात 6 मीटर लांबीचे 900 मिलीमीटर व्यासाचे चार पाइप टाकण्यात आले होते.

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.