घनदाट जंगलात वसलय गाव, पुरुषांना नो एन्ट्री, महिला करतात ही कामं, ऐकताच तुम्हालाही बसेल धक्का
घनदाट जंगलात महिलांनी असं एक गाव तयार केलं आहे, ज्या गावात फक्त महिलाचं राहतात, या गावात पुरुषांना एन्ट्री देखील दिली जात नाही. मात्र या गावचे नियम हे खूपच वेगळे आहेत. तुम्हालाही ऐकून धक्का बसेल.

तुम्हाला माहिती आहे का, की एक गाव असं देखील आहे, जिथे फक्त महिलांचचं राज्य चालतं. जिथे पुरुषांनी तयार केलेले कोणतेही नियम पाळले जात नाहीत, हे असं गाव आहे, ज्या गावात फक्त महिलाच राहतात, त्यांनी आपल्यासाठी स्वतंत्र नियम आणि कायदे तयार केले आहेत. अतिशय दुर्गम आणि घनदाट जंगलामध्ये या महिलांनी आपल्यासाठी एक स्वतंत्र गाव वसवलं आहे, या गावात सर्व प्रकारच्या सुख सुविधा देखील उपलब्ध आहेत. या गावाला वुमन्स लँड असं म्हटलं जातं. हे गाव या महिलांनी 1970 साली वसवलं, संसाराचे सर्व नियम मोडत निसर्गाच्या कुशीमध्ये राहण्याची ज्यांची इच्छा आहे, अशा सर्व महिलांचं या गावात स्वागत केलं जातं. महिलांच्या या कृतीकडे एक क्रांतीकारक प्रयोग म्हणून पाहिलं जातं. या गावात ज्या महिला राहतात त्या सर्व काम स्वत: करतात, इथे कोणीच नोकर किंवा मालक नाहीये.
हे गाव अमेरिकेच्या ओरेगॉन प्रांतातील दुर्गम डोंगर रांगामध्ये असलेल्या अतिशय घनदाट जंगलामध्ये आहे. येथील महिला स्वत:ची सुरक्षा स्वत: करतात. या गावात पुरुषांना प्रवेश दिला जात नाही. या गावाला वुमन्स लँड म्हणून देखील ओळखलं जातं. या गावाचे नियम जगापेक्षा खूपच वेगळे आहेत. जर या गावातील महिलांना एखाद्या पुरुषाला भेटायचं असेल तर गावाबाहेर जाऊन भेटावं लागतं. पुरुषांना या गावात प्रवेश दिला जात नाही.
या गावाचे नियम हे खूपच विचित्र आहेत. त्यामुळे या गावात येण्यापूर्वी महिला हजारदा विचार करतात, ज्या महिलांना या गावात कायम स्वरुपी राहण्याची इच्छा आहे, त्या महिला आधी या गावात पाहुण्या म्हणून काही काळ राहतात, त्यानंतर त्यांना जर या गावाचे सर्व नियम मान्य असतील तर अशा महिलांना या गावचं सदस्य केलं जातं, जेव्हा एखादी महिला या गावाची सदस्य होते, तेव्हा तिला येथील सर्व प्रथा परंपरांचं पालन करावं लागतं. येथील प्रथेनुसार त्या महिलेला आपली सर्व कामे स्वयंपाक बनवण्यापासून ते जंगलातून लाकडं आणण्यापर्यंत स्वत:ची कामं स्वत:लाच करावी लागतात. इथे कोणीही नोकर नसतो, आणि कोणीही मालक नसतो. तसेच या गावात वीज, पाणी, नळ अशा कोणत्याच भौतिक सोयी सुविधा नसतात.
