AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Delhi Farmers Tractor Rally: दिल्लीत हिंसेचं ‘तांडव’, एका शेतकऱ्याचा मृत्यू, 18 पोलीस जखमी; हरियाणात हाय अ‍ॅलर्ट

दिल्लीत शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅली दरम्यान झालेल्या हिंसाचारात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. (Violence by the mob in Delhi leaves 18 policemen injured)

Delhi Farmers Tractor Rally: दिल्लीत हिंसेचं 'तांडव', एका शेतकऱ्याचा मृत्यू, 18 पोलीस जखमी; हरियाणात हाय अ‍ॅलर्ट
ट्रॅक्टर रॅली
| Updated on: Jan 26, 2021 | 7:24 PM
Share

नवी दिल्ली: दिल्लीत शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅली दरम्यान झालेल्या हिंसाचारात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. तसेच पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये झालेल्या धुमश्चक्रीमध्ये 18 पोलीस जखमी झाले असून त्यातील एकाची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेनंतर हरियाणाममध्ये हाय अ‍ॅलर्ट जारी करण्यात आला आहे. (Violence by the mob in Delhi leaves 18 policemen injured)

आज दुपारी लाल किल्लामार्गे शेतकऱ्यांची रॅली निघणार होती. पण ही रॅली रोखण्यात आली. शेतकऱ्यांनी आखून दिलेल्या मार्गावरून न जाता वेगळ्याच मार्गाने रॅली काढल्याने पोलिसांनी त्यांना अडवले होते. यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये वाद झाला आणि त्यामुळे हिंसा भडकली. या हिंसाचारात 18 पोलीस जखमी झाले आहेत. त्यातील एकाची प्रकृती चिंताजनक असून या सर्व पोलिसांना एलएनजेपी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

शेतकऱ्याचा मृत्यू

दरम्यान, ही हिंसा सुरू असतानाच एका शेतकऱ्याचा दुर्देवी मृत्यू झाला. डीडीयू रस्त्यावर सुरु असलेल्या ट्रॅक्टर मार्चमधील एक ट्रॅक्टर उलटून अपघात झाला. यात ट्रॅक्टर चालवणाऱ्या चालक आंदोलकाचा मृत्यू झालाय. नवनीत सिंह असं या मृत ट्रॅक्टर चालकाचं नाव आहे. तो 30 वर्षाचा असून उत्तराखंडचा रहिवासी आहे.

हरियाणात हाय अ‍ॅलर्ट

दिल्लीतील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर हरियाणात हाय अ‍ॅलर्ट जारी करण्यात आला आहे. पोलीस आता कोणत्याही प्रकारची रिस्क घेणार नाही. सरकारी कार्यालय, वाहनांसहीत राज्य सरकारच्या मालमत्तेचं नुकसान करून कुणीही कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केल्यास पोलीस बळाचा वापर करण्यासही मागे पुढे हटणार नाही, असा इशारा हरियाणाच्या डीजीपींनी दिला आहे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था ढासळणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. दंगल भडकवणाऱ्या आणि अफवांद्वारे दंगल भडकवणाऱ्यांवरही कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. (Violence by the mob in Delhi leaves 18 policemen injured)

सीसीटीव्ही फुटेज तपासणार

दरम्यान, दिल्लीतील हिंसक आंदोलनाची केंद्रीय गृहमंत्रालय आणि दिल्ली पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेल, क्राईम ब्रँच आणि तिन्ही झोनच्या स्पेशल पोलीस आयुक्तांची आज बैठक पार पडली. त्यात राजधानी दिल्लीत ज्या ज्या ठिकाणी हिंसक आंदोलन झालं. त्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज आमि ड्रोन फुटेज सीज करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. (Violence by the mob in Delhi leaves 18 policemen injured)

संबंधित बातम्या:

Delhi Farmers Tractor Rally LIVE | ट्रॅक्टर रॅलीमध्ये 18 पोलीस जखमी, एकाची प्रकृती गंभीर

लोकशाही मार्गाने सत्तेत येऊ शकत नसल्यानेच हिंसेला बळ; मुनगंटीवारांची विरोधकांवर टीका

Delhi Farmer Tractor Rally | शेतकरी चर्चेने थकून गेले, त्यांचा अंत पाहिला गेला, पण पंतप्रधानांनी साधी विचारपूस केली नाही : बाळासाहेब थोरात

(Violence by the mob in Delhi leaves 18 policemen injured)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.