AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | ‘अल्ला हूँ अकबर’ची घोषणा देणाऱ्या मुस्कानला दिले 5 लाख! कुणी दिलं बक्षिस?

Hijab controversy : या व्हिडीओमध्ये मुस्कान खान ही विद्यार्थीनी आपली दुचाकी कॉलेजच्या आवारात पार्क करते. यानंतर ही विद्यार्थीनी कॉलेजमध्ये प्रवेश करण्यासाठी इमारतीच्या दिशेनं चालू लागते. दरम्यान, मुस्कानला घेराव घालण्याचा प्रयत्न होतो.

Video | 'अल्ला हूँ अकबर'ची घोषणा देणाऱ्या मुस्कानला दिले 5 लाख! कुणी दिलं बक्षिस?
मुस्कान खान या विद्यार्थीनीला 5 लाखांचं बक्षिस
| Edited By: | Updated on: Feb 09, 2022 | 11:21 AM
Share

कर्नाटक : कर्नाटकातील एक व्हिडीओ (Karnatak Video) मंगळवारी समोर आला होता. एक हिजाब (Hijab) घातलेल्या मुलीला अडवणारे, तिच्यावर चिथावणीखोर आणि भडकावू घोषणा देणाऱ्या तरुणांचा हा व्हिडीओ मंगळवारी तुफान गाजला. या व्हिडीओतील ज्या मुलीला तरुणांनी जय श्री रामच्या घोषणा देत हिजाबविरोधात निदर्शनं केली, त्या मुलीला आता पाच लाख रुपयांचं बक्षिस (5 Lakh Rs Reward) जाहीर करण्यात आलं आहे. जय श्री रामच्या घोषणांमधून कॉलेजात प्रवेश करत जाणारी ही मुलगीही अल्ला हूँ अकबरच्या घोषणा देताना दिसली होती. हात उंचावून तिनं आपला खाक्या घोषणेतून दाखवून दिला होता. कर्नाटकात हिजाब विरद्ध भगवा असा संघर्ष पेटलेला असतानाच आता या विद्यार्थीनीला एकानं चक्क पाच लाख रुपयांचं बक्षिस दिलंय. जमीयत उलेमा-ए-हिंद या संस्थेकडून हे बक्षिस जाहीर करण्यात आलंय.

जय श्री रामचा नारा देणाऱ्या या विद्यार्थीनीचं नाव मुस्कान खान असं आहे. तिच्या बहादुरीवर खूश होऊन जमीयत उलेमा-ए-हिंद या संघटनेच्या वतीनं मुस्कानला पाच लाख रुपयांचं बक्षिस जाहीर करण्यात आलंय. तसंच तिच्या उज्ज्वल भविष्यसाठीही तिला शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. तिला प्रोत्साहित करण्यासाठी पाच लाख रुपयांचं बक्षिस देत असल्याचं या संघटनेनं म्हटलंय.

नेमकं काय घडलं होतं?

1 मिनिट 40 सेकंदाचा कर्नाटकातील व्हिडीओ मंगळवार समोर आला. या व्हिडीओमध्ये मुस्कान खान ही विद्यार्थीनी आपली दुचाकी कॉलेजच्या आवारात पार्क करते. यानंतर ही विद्यार्थीनी कॉलेजमध्ये प्रवेश करण्यासाठी इमारतीच्या दिशेनं चालू लागते. दरम्यान, मुस्कानला घेराव घालण्याचा प्रयत्न होतो. भगवे शेले (saffron scarves) घेऊन असलेले काही विद्यार्थी बुरखा (hijab) घातलेल्या मुस्कानसमोर जोरदार घोषणाबाजी करतात. जय श्री रामची नारे लगावले जातात. कॉलेजमधील विद्यार्थ्यांचा (Karnataka Collage Students) आवेश प्रचंड असतो.

मुस्कानही मग आपल्या भाषेत या विद्यार्थ्यांच्या घोषणाबाजीला उत्तर देण्याचा प्रयत्न करताना दिसते. अल्ला हू अकबर असं म्हणत मुस्कान तिला छेडणाऱ्या विद्यार्थ्यांना उत्तर देण्याचा प्रयत्न करताना दिसते. एकटी असलेली मुस्कारन बुरखा घालून या आक्रमक झालेल्या मुलांच्या विरोधाला न जुमानता हिंमतीनं कॉलेजच्या दिशेने जाते. कॉलेजमधीलच काही जणही या विद्यार्थीनीली सुरक्षित आत घेऊन जाण्यासाठी तिच्या आजूबाजूला दिसून येतात. मात्र या सगळ्यात विद्यार्थ्यांच्या जय श्री रामच्या घोषणा कुठेही थांबलेल्या नाहीत.

पाहा मुस्कानचा घोषणा देतानाचा व्हिडीओ :

कर्नाटक सरकार सतर्क

कर्नाटकातील या प्रकारानंतर सरकारही सतर्क झालं आहे. हा वाद आणखी पेटण्याची शक्यता असल्यानं अखेर कर्नाटक सरकारनं सावध पवित्रा घेत शाळा तीन दिवस बंद ठेवण्याचेही आदेश देण्यात आले आहे. हिजाब विरुद्ध भगवा असा हा वाद पेटलाय. कर्नाटक उच्च न्यालायताय याप्रकरणी सध्या सुनावणीदेखील सुरु आहे.

वाद सुरु कुठून झाला?

जानेवारीत उडुपीच्या एका सरकारी महाविद्यालयात सहा विद्यार्थीनींना हिजाब घालून महाविद्यालयात येण्यास मज्जाव करण्यात आला होता. मात्र, महाविद्यालयाने परवानगी दिली नाही असं सांगितलं गेलं. त्यानंतर हा ट्रेंड निघून गेला. तसेच दुसऱ्या महाविद्यालयातही विद्यार्थीनी हिजाब घालून जाऊ लागल्या. त्याला विरोध म्हणून काही विद्यार्थीनींनी भगवा स्कार्फ घालून महाविद्यालयात जायला सुरवात केली. त्यानंतर त्याला राजकीय वळण मिळालं आणि वादाला सुरुवात झाली.

संबंधित बातम्या :

कर्नाटकातील ‘हिजाब वादा’चे पडसाद आता मुंबईत! मुंब्रा आणि मदनपुरा भागात मुस्लिम महिलांकडून निदर्शनं आणि सह्यांची मोहीम

Karnataka Hijab| शैक्षणिक संस्थेत तिरंग्याच्या जागी भगवा फडकवला, जय श्रीरामचा नारा, कलम 144 लागू!

Arunachal Pradesh : अरुणाचल प्रदेशमधील हिमवादळात 7 जवान शहीद; दोन दिवसांपासून सुरू होतं रेस्क्यू ऑपरेशन

स्लॅब कोसळून 1 ठार, 2 जखमी; CM फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश
स्लॅब कोसळून 1 ठार, 2 जखमी; CM फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश.
हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी, CM फडणवीस संतापले...
हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी, CM फडणवीस संतापले....
जमीन मोजणीदरम्यान वाद; राऊतांनी ट्विट केला नार्वेकरांचा व्हिडिओ
जमीन मोजणीदरम्यान वाद; राऊतांनी ट्विट केला नार्वेकरांचा व्हिडिओ.
सोयाबीन-कापूस आयात होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका
सोयाबीन-कापूस आयात होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका.
दादांची इच्छा पूर्ण करायची होती, पण...
दादांची इच्छा पूर्ण करायची होती, पण....
दादांचे 70% आमदार विलिनीकरणाच्या बाजूनं?
दादांचे 70% आमदार विलिनीकरणाच्या बाजूनं?.
भुजबळांचा संताप आणि संकेत... विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मोठी अपडेट काय?
भुजबळांचा संताप आणि संकेत... विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मोठी अपडेट काय?.
दादर मार्केट गुलाबांच्या रंगात रंगले; व्हॅलेंटाईन डेसाठी...
दादर मार्केट गुलाबांच्या रंगात रंगले; व्हॅलेंटाईन डेसाठी....
बंद दाराआड, भिंतीआड जे बोललं जातं, त्यावर का बोलू? संजय राऊतांचा सवाल
बंद दाराआड, भिंतीआड जे बोललं जातं, त्यावर का बोलू? संजय राऊतांचा सवाल.
VSR कंपनीचे बेनामी मालक कोण? संजय राऊत यांच्या सवालाने खळबळ
VSR कंपनीचे बेनामी मालक कोण? संजय राऊत यांच्या सवालाने खळबळ.