विधानसभेत पाकिस्तानी महिला नेत्याची ‘आशिकी’, Video व्हायरल; कोण आहे ही बाला?

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानची रसद बंद केली असतानाच पाकिस्तानी महिला आमदार हिना परवेज बट यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत त्या विधानसभेत भाषण करताना दिसत आहेत. त्यांच्या भाषणाबरोबरच त्यांच्या कपड्यांचेही कौतुक विधानसभा अध्यक्षांनी केले आहे.

विधानसभेत पाकिस्तानी महिला नेत्याची आशिकी, Video व्हायरल; कोण आहे ही बाला?
Hina Parvez
Image Credit source: Tv9 Bharatvarsh
| Updated on: Apr 28, 2025 | 5:04 PM

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानची रसद बंद केली आहे. त्यामुळे पाकिस्तानची चांगलीच भंबरी उडाली आहे. पाकिस्तानवर एकीकडे युद्धाचे ढग जमा झालेले असतानाच दुसरीकडे मात्र पाकिस्तानी महिला नेत्याची लव्ह स्टोरी व्हायरल झाली आहे. सोशल मीडियावर या व्हिडीओने चांगलाचा धुमाकूळ घातला आहे. ही महिला आमदार विधानसभेत तिचं म्हणणं मांडत आहे. आपलं म्हणणं मांडतानाच आपल्या बोलण्याने आणि कपड्यांनी विधानसभा अध्यक्षांचं मनही ही महिला आमदार जिंकताना दिसत आहे.

हिना परवेज बट असं या महिला आमदाराचं नाव आहे. त्यांचीच लव्ह स्टोरी सध्या व्हायरल होत आहे. विधानसभा अध्यक्ष मलिक अहमद खान यांनी आधी या महिला आमदाराच्या प्रश्नाचं कौतुक केलं. त्यानंतर तिच्या कपड्यांचं कौतुक केलं. “You are wearing very beatifull dress.” असं विधानसभा अध्यक्ष भर सभागृहात म्हणाले. विधानसभा अध्यक्षांचं हे उद्गार ऐकताच हिना हसायला लागल्या. त्यानंतर संपूर्ण सभागृहाने टाळ्या वाजवून स्वागत केलं.

वाचा: अल्लाह हू अकबर.. जय श्री राम! माझ्या बॅगेत बॉम्ब आहे; विमान प्रवाशांमध्ये उडाला एकच गोंधळ

त्यांच्या या व्हिडीओला सोशल मीडियामध्ये चांगलेच लाइक्स मिळत आहेत. तसेच नेटकरी प्रचंड कमेंट्स करत आहेत. हिना यांच्या सौंदर्याचं कौतुक होत आहे. हिना या पाकिस्तानच्या सत्ताधीर PMLN पक्षाच्या आमदार आहेत. आपल्या छोट्याश्या राजकीय करिअरमध्ये त्यांनी चांगलंच नाव कमावलं आहे. तसेच त्या अनेक वादातही अडकल्या आहेत.

कोण आहे हिना परवेज बट?

हिना परवेज बट पाकिस्तानच्या खास नेत्यांपैकी एक आहेत. पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज (PML-N) या पक्षाच्या त्या सदस्या आहेत. त्या सध्या पंजाब प्रांतीय विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या आहेत. पंजाब वुमन प्रोटेक्शन अथॉरिटीच्या त्या चेअरपर्सन आहेत. 19 जानेवारी 1982मध्ये लाहोरमध्ये त्यांचा जन्म झाला. 2013मध्ये त्यांनी पंजाब विधानसभेच्या महिलांसाठी राखीव असलेल्या मतदारसंघातून त्यांचं राजकीय करिअर सुरू झालं. 2018मध्ये त्या दुसऱ्यांदा विजयी झाल्या. महिलांचे अधिकार आणि सशक्तीकरणावर त्या काम करत असतात. पण त्यांचं राजकीय सक्रियपण नेहमीच वादातीत राहिलं आहे.

ड्रेसिंगचा अफलातून सेन्स

हिना यांना ड्रेसिंगचा प्रचंड सेन्स आहे. त्या अत्यंत क्लासी सूट आणि ड्रेस परिधान करतात. त्यामुळे त्या तरुणांमध्ये तर आहेतच, पण महिलांमध्येही लोकप्रिय आहेत. त्या सोशल मीडियावर वेगवेगळ्या अंदाजात फोटो शेअर करत असतात. त्यावर सोशल मीडियातून लाइक्सचा पाऊस पडत असतो.