AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अल्लाह हू अकबर.. जय श्री राम! माझ्या बॅगेत बॉम्ब आहे; विमान प्रवाशांमध्ये उडाला एकच गोंधळ

इंडिगोच्या फ्लाइटमध्ये एका कॅनेडियन नागरिकाने शनिवारी मध्यरात्री बॉम्ब असल्याची अफवा पसरवली, त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक करून चौकशी सुरू केली आहे.

अल्लाह हू अकबर.. जय श्री राम! माझ्या बॅगेत बॉम्ब आहे; विमान प्रवाशांमध्ये उडाला एकच गोंधळ
Indigo FlightImage Credit source: Tv9 Bharatvarsh
| Updated on: Apr 27, 2025 | 7:02 PM
Share

उत्तर प्रदेशातील वाराणसीहून बेंगलुरूला जाणाऱ्या फ्लाइटमध्ये बॉम्ब असल्याची अफवा पसरली होती. त्यानंतर विमानतळावर एकच गोंधळ उडाला. मध्यरात्रीपासून ते पहाटेपर्यंत फ्लाइट थांबवण्यात आली. या काळात फ्लाइट आणि धावपट्टीची तपासणी करण्यात आली. कॅनेडियन नागरिक योहानाथन निशिकांत याने बॉम्ब असल्याची माहिती दिली होती, तो स्वतः त्या फ्लाइटमध्ये होता. तीन तासांच्या तपासणीनंतर ही माहिती अफवा असल्याचे सिद्ध झाले आणि फ्लाइट बेंगलुरूसाठी रवाना करण्यात आली. योहानाथन निशिकांत याला विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी फूलपूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे.

कॅनेडियन नागरिक योहानाथन निशिकांत याला फूलपूर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी अटक करून चौकशी सुरू केली आहे. शनिवारी मध्यरात्री इंडिगो एअरलाइन्सच्या फ्लाइट क्रमांक 6E-499 ही नियोजित वेळेपेक्षा थोडी उशिरा, रात्री 10:24 वाजता उड्डाण करणार होती. याचवेळी कॅनेडियन नागरिक योहानाथन आपली सीट सोडून पुढे जाऊन बसला होता. जेव्हा क्रू मेंबर्सनी त्याला परत आपल्या सीटवर जाण्यास सांगितले, तेव्हा तो संतापला आणि ओरडत म्हणाला की माझ्या बॅगेत बॉम्ब आहे.

वाचा: मुस्लीम अभिनेत्याने केले दोन हिंदू मुलींशी लग्न, १२ वर्षांनी मोठ्या मुलीवर प्रेम; आता आहे १२०० कोटींचा मालक

सुरक्षा यंत्रणेने तपास मोहीम राबवली

एवढेच नाही, धमकी दिल्यानंतर हा प्रवासी जोरजोरात ‘अल्लाह हू अकबर’, ‘जय श्री राम’ आणि ‘हर हर महादेव’ अशा घोषणा देऊ लागला. प्रवाशाच्या या कृतीमुळे विमानात दहशतीचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर तातडीने पायलटने फ्लाइट धावपट्टीवरून परत वळवण्याचा निर्णय घेतला आणि याबाबतची माहिती एअर ट्रॅफिक कंट्रोलला दिली. विमान परत एप्रनवर आणले गेले आणि फ्लाइट रिकामी करण्यात आली. त्यानंतर सुरक्षा यंत्रणेने संपूर्ण फ्लाइटसह विमानतळाची सखोल तपासणी केली.

कॅनेडियन नागरिक अटकेत

सुमारे तीन तास चाललेल्या तपास मोहिमेनंतर फ्लाइटमध्ये बॉम्ब असल्याची बाब अफवा असल्याचे सिद्ध झाले. ही माहिती अफवा ठरल्यानंतर प्रवाशांना दिलासा मिळाला. पहाटेची फ्लाइट बेंगलुरूसाठी रवाना झाली. विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी कॅनेडियन नागरिक योहानाथन निशिकांत याची तासन्तास चौकशी केल्यानंतर त्याला फूलपूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे. पोलिसांनी योहानाथनविरुद्ध गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली आहे. त्याने असे का आणि कोणाच्या सांगण्यावरून केले याचा तपास केला जात आहे.

निवडणुकीपूर्वी अंबरनाथमध्ये थरार, BJP उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार
निवडणुकीपूर्वी अंबरनाथमध्ये थरार, BJP उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार.
नाशिकचा कारभार, गोंधळ बेसुमार.... पालिका अधिकाऱ्यांना महाजनांनी झापलं
नाशिकचा कारभार, गोंधळ बेसुमार.... पालिका अधिकाऱ्यांना महाजनांनी झापलं.
दोन्ही राष्ट्रवादीचे नेते अमित शहांच्या भेटीला.. दिल्लीत राजकीय खलबतं!
दोन्ही राष्ट्रवादीचे नेते अमित शहांच्या भेटीला.. दिल्लीत राजकीय खलबतं!.
मुंबईत काँग्रेसशिवाय ठाकरे बंधूंची युती, 2 दिवसात काय होणार घोषणा?
मुंबईत काँग्रेसशिवाय ठाकरे बंधूंची युती, 2 दिवसात काय होणार घोषणा?.
विधानसभेत विरोधात, महापालिका निवडणुकीत NCP चे दोन्ही गट एकत्र येणार?
विधानसभेत विरोधात, महापालिका निवडणुकीत NCP चे दोन्ही गट एकत्र येणार?.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक, पहिल्या फेरीत 142 जागांवर तोडगा
BMC साठी महायुतीची पहिली बैठक, पहिल्या फेरीत 142 जागांवर तोडगा.
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.