AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आधी झूम कॉलवर 900 कर्मचाऱ्यांना काढले, आता CEOवरच आली नोकरी शोधण्याची वेळ

भारतीय वंशाचे विशाल गर्ग एका झूम कॉलद्वारे ९०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकल्यानंतर प्रसिद्धीच्या झोतात आले होते. त्यांच्या या निर्णयामुळे कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणावर विरोध झाला आणि अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी राजीनामा दिला. मात्र, गर्ग सीईओ पदावर कायम राहिले. आता त्यांनाही आपली नोकरी गमवावी लागली आहे.

आधी झूम कॉलवर 900 कर्मचाऱ्यांना काढले, आता CEOवरच आली नोकरी शोधण्याची वेळ
Vishal GargImage Credit source: tv9 Marathi
| Updated on: Aug 16, 2026 | 12:39 PM
Share

२०२१ मधील तो प्रसंग तुम्हाला आठवतो का, ज्यात एका सीईओने ४ मिनिटांच्या निर्दयी झूम कॉलवर एका झटक्यात ९०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकले होते. तो क्रूर फतवा ऐकवणारे भारतीय वंशाचे चर्चित आणि विवादास्पद सीईओ विशाल गर्ग आज स्वतः त्याच वेदनेतून जात आहेत. डिजिटल मॉर्गेज लेंडर कंपनी बेटर होम अँड फायनान्सच्या बोर्डाने गर्ग यांना कंपनीतून काढून टाकले आहे. जो बॉस कधी कर्मचाऱ्यांना न विचारता काढून टाकत असे, आज तो कंपनीत राहण्यासाठी केवळ १ डॉलर म्हणजे सुमारे ₹९० वार्षिक टोकन पगारावर कामनर ठेवण्याची विनंती करत आहे. पण बोर्ड त्यांना कोणत्याही किंमतीवर ठेवायला तयार नाही.

नेमकं काय घडलं?

२०२१ मध्ये ख्रिसमसच्या अगदी आधी विशाल गर्ग यांनी कंपनीच्या कर्मचाऱ्यांची सामूहिक झूम मीटिंग बोलावली आणि अत्यंत थंड स्वरात म्हटले की, जर तुम्ही या कॉलवर असाल, तर तुम्ही त्या दुर्दैवी लोकांपैकी एक आहात ज्यांना तत्काळ नोकरीतून काढले जात आहे. केवळ ४ मिनिटांत ९०० कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. या कॉलचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच कंपनीच्या संवाद, जनसंपर्क आणि मार्केटिंग विभागातील अनेक ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी विरोध म्हणून राजीनामे दिले. त्यानंतर गर्ग यांना जबरदस्तीने सुट्टीवर पाठवण्यात आले. कंपनीतील टॉक्सिक वर्क कल्चर उघड झाल्यानंतर कंपनीच्या प्रतिष्ठेला मोठा फटका बसला.

विशाल गर्ग यांनी सीईओ पदावरून काढून टाकताच आरोप केला आहे की त्यांच्यासोबत विश्वासघात झाला आहे. त्यांचे म्हणणे आहे की हेज फंड मॅनेजर डॅनियल लुईस यांनी आधी खर्च कमी करण्याच्या आणि कंपनी वाचवण्याच्या नावाखाली त्यांचा विश्वास जिंकला. लुईस यांनी सोशल मीडियावर कंपनीच्या रणनीतीची आणि गर्ग यांची खूप प्रशंसा केली. त्यामुळे प्रभावित होऊन गर्ग यांनी २७ जुलैला त्यांना स्वतःच्याच कंपनीच्या बोर्डमध्ये सामील करून घेतले. आता गर्ग यांचे म्हणणे आहे की बोर्डमध्ये प्रवेश घेताच केवळ ७ दिवसांत लुईस यांनी इतर डायरेक्टर्सना आपल्या बाजूला वळवले आणि गर्ग यांना सीईओ पदाचा राजीनामा देण्यास भाग पाडले. ३ ऑगस्टला लुईस यांनी स्वतः कंपनीची सूत्रे हाती घेतली.

कायदेशीर कारवाईची तयारी करत आहेत गर्ग

अचानक पद गमावल्यानंतर विशाल गर्ग शांत बसण्याच्या मूडमध्ये नाहीत. त्यांनी शक्य ते सर्व प्रयत्न सुरू केले आहेत. त्यांनी प्रसिद्ध अमेरिकन वकील अॅलेक्स स्पायरो यांची नियुक्ती केली आहे आणि विशेष क्लास-बी व्होटिंग राइट्स असलेल्या प्रमुख भागधारकांचा पाठिंबा मिळवण्यात गुंतले आहेत. गर्ग यांनी बोर्डसमोर औपचारिक प्रस्ताव ठेवला आहे की जोपर्यंत कंपनी नफ्यात येत नाही तोपर्यंत ते केवळ १ डॉलर वार्षिक पगारावर काम करतील. बोर्डाने त्यांचा हा प्रस्ताव फेटाळून लावला आहे.

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...